मोकळा श्वास घेऊ दे

Submitted by Saee_Sathe on 2 January, 2013 - 04:13

आई मलाही जगायचं आहे
मलाही हे जग पहायचं आहे
प्रत्येक वाईट गोष्टीशी लढत
मलाही पुढे जायचं आहे

आई येऊ देशील का मला जगात
बघु देशील का हे सगळं
की जन्माला येण्या अगोदरच
करून टाकशील मला वेगळं

आई थांबवशील का गं कधीतरी
माझ्यावर होणारा अन्याय
वचन दे आता मला
मिळवून देशील न्याय

मी बनेन तुझा मुलगा
मी धरेन तुझा हात
आतातरी सांग मला
देशील का माझी साथ

मुलगाच असतो तो
जो मुलींवर अन्याय करतो
स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांमधे
अश्रुंचीही भर पाडतो

काय म्हणून आम्हीच फक्त
हे सगळं सहन करायचं
तुमच्या पापांमुळे
आम्ही कशाला बळी पडायचं ?

आमचा जिव घेण्याआधी
स्वत:ला विचारून बघा
आम्हीही तुमच्याच मुली आहोत
आमचा बळी देऊ नका


उठ आता आई
लवकर जागी हो
तुझ्या बाळावर अन्याय करणा-याला
चांगला धडा शिकव

नको मारू मला
मलाही आता जगू दे
बाकी काहीच नको
मला मोकळा श्वास घेऊ दे

- मृण्मयी शैलेंद्र

- crying girl.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई,
कवितेतून तुझे विचार कळले,महिलांवरील अत्याचाराविरूध्द एक छोटी मुलगी काहीतरी लिहितेय्,बर वाटलं.
भावना पोहचल्या.

Happy

छान कविता सई.

मी बनेन तुझा मुलगा
मी धरेन तुझा हात
आतातरी सांग मला
देशील का माझी साथ >>> पण कशाला मुलगा बनायच ? मुलगी होऊनच हात धरायचा Happy