लेखकाचे/लेखिकेचे जुने लेखन पाहण्याची सोय पुन्हा सुरु

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

पाउलखुणांमधला उपविभाग, लेखकाचे/लेखिकेचे लेखन दाखवण्याची सोय पुन्हा सुरु केली आहे. कुठल्याही मायबोलीकराच्या व्यक्तिरेखेत जाऊन "लेखन" या टॅबवर टिचकी मारून हे पूर्वीप्रमाणेच पाहता येईल. मूळ मालकाला स्वतःचे अप्रकाशित लेखन पहायची जी सोय होती ती तशीच या टॅबवर जाऊन पाहता येईल.

एकाच व्यक्तीच्या सगळ्या प्रतिक्रिया पाहण्याची सोय अजूनही बंद ठेवली आहे.

विषय: 
प्रकार: 

>>>> एकाच व्यक्तीच्या सगळ्या प्रतिक्रिया पाहण्याची सोय अजूनही बंद ठेवली आहे. <<<
अरेच्च्या? अशीही सोय होती का? मला माहितच नव्हते, नैतर माझ्या सगळ्या स्वगतात्मक हात हातभर लाम्बलचक पोस्ट्स मी पीडीएफ करुन सेव्हल्या अस्त्या! Happy असो. नेक्स्ट टाईम.
धन्यवाद.

अरेच्च्या? अशीही सोय होती का? मला माहितच नव्हते,

लिंबुटिंबु
ड्युआय ओळखण्याचा तो राजमार्ग होता Wink
( चोराच्या उलट्या बोंबा )

धन्यवाद अ‍ॅडमीन.

>>>> एकाच व्यक्तीच्या सगळ्या प्रतिक्रिया पाहण्याची सोय अजूनही बंद ठेवली आहे. >>>> अशी सोय होती हेच माहित नव्हते. आता सुरू केलीत की कशी वापरायची ते ही सांगा प्लीज.

मामी अशी सोय होतीपण आणि नव्हतीपण (पाऊलखुणा >> "प्रतिसाद" आणि "फक्त लेखन" असे २ टॅब होते :)). त्या प्रतिसाद टॅबचा काही उपयोग नव्हता कारण यात त्या व्यक्तीने दिलेल्या प्रतिसादांच्या बाफंची फक्त भलीमोठी यादी दिसायची. त्या यादीतल्या बाफवर टिचकी मारली तरी डायरेक्ट त्या व्यक्तीच्या प्रतिसादावर जाता येत नव्हते तर बाफच्या सुरूवातीला जायचो. थोडक्यात त्या व्यक्तीने त्या बाफवर काय लिहीलेय हे त्या शे दोनशे प्रतिसादातून आपल्यालाच शोधून घ्यावे लागायचे.
कोणाच्याही प्रोफाईलमध्ये गेले की आता "लेखन" हा टॅब दिसेल तिथे त्या व्यक्तीने सुरू केलेले धागे, स्वतः लिहीलेले साहित्य यांची यादी दिसेल.

ओक्के रुनी, गॉट इट.
जुनी मायबोली असतानापासूनची माझी एक मागणी आहे/होती ती म्हणजे वेगवेगळ्या धाग्यान्वर टाकलेल्या माझ्या सर्व पोस्ट्स जर मला संकलित करुन मिळाल्या तर हव्या होत्या. पण तसे शक्य दिसत नाहीये असे वाटते. Happy असो.

माझे लेखनमध्येही फक्त नावांचे मथळे दिसतील असे केले तरी चालेल असे वाटते. त्यातील मजकूरामुळे जास्ती जागा व्यापली जात असावी का ? आपलेच लिखाण असल्याने केवळ नावावरूनही आपल्याला कळते सदर बीबी कशाचा आहे ते !

त्या प्रतिसादचा उपयोग एवढाच होता की काल आपण कुठे काय प्रतिसाद दिला असेल तिथे आज कुणी काही लिहिलंय का हे कळावं. म्हणजे मी तरी लॉगिन केल्यावर पाखु मधे जाऊन तेच बघायचे. (साधारण पूर्वीच्या लास्ट १/३/७ डे सारखं मी वापरायचे हे)
भविष्यात शक्य झालंच फारसे प्रॉब्लेम न होता तर स्वतःचे पाखु - प्रतिसाद पेज स्वतःला फक्त दिसल्यास बरे पडेल.

पाऊलखुणा अत्यंत उपयोगी होत्या. पुन्हा सुरु करता आल्या तर बरे होईल. रुनी, त्या व्यक्तिच्या प्रतिसादावर थेट उडी मारता येईल असे झाले तर अजुनच छान.

धन्यवाद रूनी.

हो, पाखुंचा उपयोग व्हायचा. पण मुळातच मायबोलीवर पहिल्यांदा आल्यावर काही दिवस प्रचंड गोंध़ळायला होतं. हितगूज आणि गुलमोहोर मध्ये कन्फ्युजनला फुल्ल स्कोप आहे. शिवाय नविन लेखन करण्याची वाटही सोपी नाही. एकदा सवय झाली की मग काही वाटत नाही पण अनेक दिवस चाचपडण्यात आणि धडपडण्यात जातात. गृप सार्वजनिक करणे वगैरे सुद्धा नजरेतून सहज निसटू शकते. मायबोली जरा अजून युजर फ्रेंडली करता येईल असं वाटतं.

<<माझे लेखनमध्येही फक्त नावांचे मथळे दिसतील असे केले तरी चालेल असे वाटते. त्यातील मजकूरामुळे जास्ती जागा व्यापली जात असावी का ? आपलेच लिखाण असल्याने केवळ नावावरूनही आपल्याला कळते सदर बीबी कशाचा आहे ते >>

हो पण आपल्याला अन्य सभासदाचे लेखन शोधायचे असेल तर?

हो पण आपल्याला अन्य सभासदाचे लेखन शोधायचे असेल तर? >>>
तर त्या त्या सभासदाच्या प्रोफाइलमध्ये जायचे आणि "लेखन" टॅब बघायचा तिथे त्या आयडीने स्वतःच्या नावाने सुरू केलेले सगळे धागे दिसतील. हां आता तुम्ही जर त्या व्यक्तीचे इतरांच्या धाग्यावरचे "प्रतिसाद" शोधत असाल तर ते मात्र सापडणार नाहीत.

भविष्यात शक्य झालंच फारसे प्रॉब्लेम न होता तर स्वतःचे पाखु - प्रतिसाद पेज स्वतःला फक्त दिसल्यास बरे पडेल>>>> १००% अनुमोदन

रूनी धन्यवाद. लेखन-पाउलखुणांमध्ये नुसतेच मथळे दिसणे अन्य सदस्याच्या लेखनाबाबत पुरेसे नाही, आता मजकुराचाही भाग दिसतो ए योग्यच आहे, असे सुचवायचे होते.

माझे सदस्यत्वापासूनचे, म्हणजे २००२ पासूनचे जुन्या गुलमोहरावरील फक्त सर्व लेखन कुठे ऊपलब्ध होईल..? २००४-०५ च्या कार्तिक महिन्याच्या आधीच्या कुठल्याच लिंक्स काम करत नाहीत. शिवाय बरेचसे जुने लिखाण नविन माबो वर कॉपी पेस्ट केल्यास विचीत्र अक्षरे ऊमटतात.. ते पूर्वीचे देव्/शिवाजी मधिल लेखन आता नव्या माबो वर मायग्रेट करणे हे शक्य आहे का? किमान "रंगीबेरंगी" सभासद्त्व असलेल्यांसाठी तरी..?

२००४-०५ च्या कार्तिक महिन्याच्या आधीच्या कुठल्याच लिंक्स काम करत नाहीत. <<
बर्‍याच गोष्टी आगकोल्ह्यात चालत नाहीत पण इंटरनेट एक्स्प्लोरर मधे चालतायत.

इथल्या प्रतिसाद बॉक्सवर निळं सफरचंद दिसतंय का? त्याचा वापर करून तुला जुना मजकूर युनिकोडमधे आणता येईल.

>>बर्‍याच गोष्टी आगकोल्ह्यात चालत नाहीत पण इंटरनेट एक्स्प्लोरर मधे चालतायत.

माझ्याकडे कायम आय्.ई. च आहे.. तोच वापरतो.. मी विंडोज वापरतो..