गाज सागराची — "मालवणमय"...

Submitted by जिप्सी on 6 January, 2013 - 00:12

=======================================================================
=======================================================================
आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
- कुसुमाग्रज
=======================================================================
=======================================================================
आमचे FB मित्र श्री मधुकर धुरी यांनी केलेले मालवणचे अप्रतिम वर्णनः
(सदर वर्णन इथे देण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद मधुकर Happy )
मालवणची भौगोलिक रचना खास आहे. पश्‍चिमेला अथांग अरबी समुद्र. पूर्वेला कासारटाक्‍याची घाटी. उत्तरेला गड नदीची खाडी, तर दक्षिणेला कर्ली नदीची खाडी. या दोन्ही नद्या समुद्राला मिळण्याआधी समुद्राला समांतर वाहतात. त्यातून जमिनीची एक चिंचोळी पट्टी तयार झाली आहे. शंभरएक मीटर रुंदीची. या चिंचोळ्या पट्टीच्या पश्‍चिमेला आहे समुद्रकिनारा, तर पूर्वेला नदी किनारा. एका बाजूला समुद्राची गाज, तर दुसऱ्या बाजूला माडांच्या बनातून वाहणारी शांत नदी. कर्ली नदीच्या चिंचोळ्या पट्टीत तारकर्ली वसलंय. नदीच्या मुखाजवळ आहे देवबाग, तर समोरच्या किनार्‍यावर आहे भोगवे. गडनदीच्या पट्टीतलं गाव तोंडवळी, मुखाजवळ आहे तळाशील आणि दुसऱ्या किनाऱ्यावर वसलंय रेवंडी. मालवणच्या दक्षिणेला सात किलोमीटरवर आहे तारकर्ली. लांबच लांब विस्तीर्ण समुद्रकिनारा तारकर्लीला लाभलेला आहे. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय. तारकर्लीपासून पाच किलोमीटर दक्षिणेला असणार्‍या देवबागपर्यंत कर्ली नदी समुद्राला भेटायला वाहत येते. तारकर्ली ते देवबाग गाडीरस्ता उपलब्ध आहे. देवबागला बोटीत बसायचं आणि कर्ली नदी समुद्राला मिळते त्याच्या दुसर्‍या किनार्‍यावर असणार्‍या भोगवे बीचवर उतरायचं. देवबाग भोगवे सफरीदरम्यान शेकडो सीगल पक्षी तुम्हाला पाहायला मिळतात. भोगवे किनारा पाहून झाला, की पुन्हा बोटीत बसायचं, निघायचं निवतीकडे. समुद्रकिनारी टेकडीवर निवतीचा किल्ला आहे बीचला लागूनच. निवती, भोगवे दोन्ही समुद्रकिनारे अतिशय रमणीय व सुंदर आहेत. देवबागहून बोटीने या किनार्‍याना भेट देण्यात विशेष मजा आहे. या बोट सफरीचं अजून एक आकर्षण आहे, ते म्हणजे डॉल्फिन. निवतीजवळच्या समुद्रात डॉल्फिन हमखास बघायला मिळतात आणि देवबागचे बोटवाले तुम्हाला डॉल्फिन दाखविल्याशिवाय हार मानत नाहीत. मात्र तुम्ही नेमकी वेळ गाठायला हवी आणि थोडीफार नशिबाने साथ द्यायला हवी. तीन-चार तासांच्या या सफरीचं 10 जणांचं मिळून 800 रु. भाडं आहे. तुमचे स्वतःचे 10 जण नसतील, तर मात्र दरडोई अधिक खर्च सोसायची तयारी हवी. देवबाग, तारकर्ली करीत कर्ली नदीतून लक्ष्मीनारायणाचं सुप्रसिद्ध मंदिर असणाऱ्या वालावलपर्यंत जर तुम्हाला बोटिंग करण्याची संधी मिळाली, तर मात्र सोन्याहून पिवळं; पण त्यासाठी योग्य ती किंमत मोजायची तयारी हवी. देवबागची नदी व समुद्रकिनारा दृष्ट लागण्याइतका स्वच्छ व नितळ पाण्याचा आहे. देवबाग कर्ली नदीइतकाच सुंदर किनारा आहे तळाशील गड नदीचा. गड नदी समुद्राला भेटायला येते ती तोंडवलीपासून. तळाशीलपर्यंत समुद्राला समांतर वाहते. मालवण, हडी, तोंडवली, तळाशील असा गाडीरस्ता उपलब्ध आहे. नदीच्या एका बाजूला तोंडवली, तळाशील, तर दुसऱ्या बाजूला ओझर, रेवंडी, कोळंब आहे. ओझरची ब्रह्मानंद स्वामींची असणारी गुहा व पाण्याचा झरा बघण्यासारखा आहे. ओझरजवळ आहे रेवंडी. मालवणचा सुपुत्र "वस्त्रहरण'कार मच्छिंद्र कांबळींचं गाव. गावात भद्रकालीचं मंदिर आहे. रेवंडीतल्या तरीवरून तळाशीलला बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली, की बांद्याच्या पुढे ओसाड बेट आहे. त्यावरून गड नदीच्या मुखाचं सुंदर दर्शन होतं. रेवंडीतूनसुद्धा गड नदी समुद्राला मिळते ती जागा बघण्यासारखी आहे. तोंडवळीचा सुरूचा किनारा, तळाशीलचा माडांच्या चिंचोळ्या पट्टीचा किनारा खास बघण्यासारखा. खुद्द मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. तिथला मासळीबाजार, अनेक मंदिरं, रॉक गार्डन, चिवळा आणि त्याला लागून असलेला कोळंबचा समुद्रकिनारा अशा ठिकाणी सहज जाता येतं. महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेलं मालवण गाव. इथे येऊन सिंधुदुर्ग किल्ला न पाहिला तर काय पाहिलं? मालवणच्या जेटीवरून किल्ल्यात जायला बोटी उपलब्ध आहेत. राजाराम महाराजांनी स्थापन केलेलं महाराजांचं मंदिर, फांदी असणारं माडाचं झाड, दुधबाव, दहीबाव, महाराजांच्या हाताचा व पायाचा ठसा, राणीची वेळा इत्यादी पाहताना वेळ कसा पटकन निघून जातो. मालवणला रेल्वे स्टेशन नाही. रेल्वे पकडण्यासाठी कुडाळला जावं लागतं. मालवणहून कुडाळला जाताना रस्त्यात धामापूर लागतं. धामापूरचा तलाव मन प्रसन्न करणारा आहे. तलावात बोटिंगची सोय आहे. झाडीभरला हा तलाव नुसत्या दर्शनानेच तुम्हाला ताजतवानं करतो. आठवडाभराची सुट्टी असेल, तर मालवणनंतरचा मुक्काम करायचा सावंतवाडी अथवा वेंगुर्ल्याला. त्याशिवाय देवगड अथवा कणकवली असासुद्धा पर्याय आहे. आठवड्याची सुट्टी नसली, तर कोकण रेल्वे आहेच तुम्हाला झटपट मालवणला पोहोचायला. मगे येतालास ना? येवा, कोकण आपलाच आसा!
=======================================================================
=======================================================================

सान्निध्य सागराचे आकाश पांघराया
या रम्य भूप्रदेशी मित्रांसवे पुन्हा या

गेल्यावेळेसच्या कोकण भटकंतीतील वरील निमंत्रणाचा मान ठेवून, नाताळ आणि वर्षाअखेरीस जोडुन आलेल्या सुट्ट्यांचा फायदा घेत पुन्हा एकदा कोकण भटकंती करून आलो. नविन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, मुंबईच्या कोलाहलापासुन दूर कोकणातील "मालवण" या ठिकाणी आम्ही पाचजण - मी, संदेश, राहुल, प्रतिक आणि आमची "स्विफ्टुकली" Happy गेलो होतो. यावेळेस आम्ही मुंबई ते मालवण व्हाया कोल्हापूर (गगनबावडा, करूळ घाट) असा प्रवास केला. मालवणचा मासळी बाजार/लिलाव, रॉक गार्डन, देवबाग, किल्ले निवती, निवती रॉक्स, मेढा निवती, सागरतीर्थ (आरवली - वेंगुर्ला), तोंडवळी-तळाशील समुद्रकिनारा अशी या वेळची आमची भटकंती होती. संदेश याचे घर मालवणातील देऊळवाडा येथे होते, पण आम्ही चौघेजण मात्र त्याच्या सड्यावरच्या घरात, (कोकणी भाषेत मांगर) कुंभारमाठ येथे राहणार होतो. जहां तक नजर जायेगी वहा तक सिर्फ और सिर्फ आंब्याची झाडे आणि त्यात फक्त एकच संदेशचं घर. आजुबाजुला एकही घर नाही कि कोलाहल नाही. फक्त आम्ही चौघे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात सड्यावरून आंब्याच्या मोहराचा सुवास घेत चालतानाचा अनुभव वर्णनातीत आहे.

आमच्यातील एकही जण ३१ डिसेंबर "सेलिब्रेट" करणारा नसल्याने मालवणला समुद्राची गाज ऐकत जुन्या वर्षाला निरोप आणि नविन वर्षाचे स्वागत असा बेत होता. पण नेमकं त्याचवेळेस मालवण (खासकरून तारकर्ली) पर्यटकांनी जबरदस्त गजबजलं होतं. मालवणचे रस्ते, बाजारपेठ, हॉटेल्स पर्यटकांनी ओसंडुन वाहत होते. नेमका याच वेळी मालवणात आम्हाला "सांताक्लॉज" भेटला आणि आमच्या ज्या ज्या इच्छा (शांत निवांत, पर्यटकांची गजबज नसलेला समुद्रकिनारा, मनसोक्त फोटोग्राफी, गरमागरम खमंग मत्स्याहारी जेवण) होत्या त्या त्याने पूर्ण केल्या. Proud

आता हाच सांताक्लॉज तुम्हाला मालवणची सफर घडवून आणणार आहे Happy तर मग येताय ना त्याच्यासोबत समुद्राची हि गाज ऐकायला? Happy

सर्वांची उत्सुकता ताणुन ठेवण्यासाठी सांताक्लॉजने या सिरीजमधल्या ठिकाणांची नावे न सांगण्याचे बजावले आहे. Proud त्यामुळे सगळ्यांनी आपआपले अंदाज बांधा. यातील फोटो त्या त्या भागात येणार असल्याने त्या त्या ठिकाणांची नावे समजतीलच. मालवण ठिकाण मध्यवर्ती ठेवून इतर भटकंती केल्याने या मालिकेचे नाव "मालवणमय". Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
पुढच्या भागात "सांताक्लॉज" तुम्हाला मालवणच्या मासळी बाजारात घेऊन जाणार आहे. Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द नाहीत!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ही कुठ्ली ठिकाणं ते लिहशील का?
प्रचि ४ आणि ५ रामेश्वर किंवा सातेरी देवळाजवळपासच आहे का?

अप्रतिम !!!
[ आमचं पूर्वसंचित कीं आमचं बालपण बरचसं स्वर्गाच्या इथल्या ह्या प्रतिकृतितच खेळण्या- बागडण्यात गेलं ! त्या आठवणींच्याच शिदोरीवर तर सारं आयुष्यच आनंदमय होतंय !!! पुनःप्रत्ययाचा आगळा आनंद तीव्रतेने दिल्याबद्दल, जिप्सीजी , धन्यवाद. ]

१५ वा फोटो फ्रेम किंवा कॅलेंडर फोटो आहे.. मस्तच...

कुसुमाग्रजांची कविता खूप वर्षांनी वाचली. Happy

हम्मsss...

न-कळवता कोकण-सफर करुन आलाय्स... त्रिवार निशेद...
इसकी सजा मिलेगी... जरूर मिलेगी...
Proud

काल आणि आज (५-६ जानेवारी-२०१३) 'रंगासेठ' तुझ्याच मागावर 'जीवाचं-मालवण' करायला गेलेत...
Happy

प्रचि-२२ - आरसेमहाल (आता त्याला 'कचेरी' म्हणून देखिल ओळखतात) च्या मागच्या बाजूचा आहे...

अतिसुंदर.. हा माहेर आजोळीचा स्वर्ग असाच सुंदर राहो. आभार या फोटोंसाठी अन कुसुमाग्रजांच्या कवितेसाठी.

जबरी रे ... सगळे प्रचि एक से एक.

गणपती बाप्पाच्या प्रचितली सिमेट्री भावली. प्रचि २४ मस्तच Happy

पहिली प्रचि व ती कमळाची प्रचि दोन्ही एखादया पुस्तकाचे कव्हर पेज म्हणुन शोभुन दिसतील
आणि रिद्धीसिद्धीगणेशाचे चित्र तर अंत्यत देखणे एकदम फ्रेम करण्यासारखे

सुरेख!
एकापेक्षा एक सरस प्रकाशचित्रे आणि रसिक रसग्रणामुळे मालवणास आणखीनच सुरस केले आहेस.
दिवसेंदिवस तुझ्या आविष्कारांचा नेमकेपणा वर्धिष्णू आहे.
तो असाच प्रतिपश्चंद्रलेखेव विकसत राहो.

Pages