मी एका छोट्या (वय ६ वर्ष ) मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत शोधत आहे.

Submitted by शांत on 30 December, 2012 - 23:41

मी एका छोट्या (वय ६ वर्ष ) मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत शोधत आहे.
नाव: सई चंद्रकांत कोकरे
वय: ५ वर्ष १० महिने
वडिलांचे नाव: चंद्रकांत बाळासो कोकरे
व्यवसाय: शेती व टेंपो चालक
उत्पन्न: ७० हजार रुपये वार्षिक
कुटुंबातील व्यक्ती: ७ (आई, वडील, स्वत:, भाऊ, बायको, सई {रुग्ण }, मुलगा )
पत्ता: मु. पो. पणदरे (हनुमानवाडी) ता. बारामती पुणे, ४१३११०.
मुलीचा आजार/व्यंग: सई लहान पनापासुन मूक बधीर आहे. तिच्या आई वडिलांना जेव्हा तिच्या व्यंगा बद्दल समजले तेव्हा त्यांनी पुण्यातील के.ई. एम. रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. परंतु डॉक्टरांच्या म्हणण्या नुसार सई फक्त २० टक्के ऐकू शकते त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा खर्च जवळपास ८ लाख रुपये सांगण्यात आला आहे. सई चे कुटुंब तिच्यासाठी जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमवू शकतील.
जर आपल्या ओळखीतले कोणी संस्थान सई ला मदत करू शकत असेल तर त्यानी कृपया मला pra1895@gmail.com इकडे संपर्क करावा. लागणारी सर्व माहिती मी त्यांना देईल.
वयक्तिक मदतीकरता ही pra1895@gmail.com इकडे संपर्क करावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे सुप्रीम लायन्स क्लब येथे संपर्क साधा..... अश्या रुग्णांना ते मदत करतात.

President: Lion Shriram Bhalerao
Email: bhaleraosd@gmail.com
Mobile: +91 81493 20200

Secretary: Lion Abhay Inamdar
Email: abhay3inamdar@yahoo.co.in
Mobile: +91 98230 28628

ओके.

पुणे केईएम खासगी हॉस्पिटल आहे. तिथे खर्च जास्त येणे सहाजिक आहे.

इम्प्लाण्ट ४ लाखापर्यंत मिळतो. मुंबई केईएम / नायर दोन्ही सरकारी आहेत. तिथे फक्त इम्प्लाण्टचा खर्च लागेल. पेशंटची आर्थिक परिस्थिती पहाता बाकी खर्च फुकट होईल (पिवळे कार्ड) नायर व केईएम मुंबई दोन्ही कडील कॉक्लिअर इम्प्लाण्टचा अनुभव चांगला आहे.

या उप्पर स्थानिक आमदारांची चिठ्ठी (शिफारस पत्र) आणल्यास या दोन्ही हॉस्पिटलचे 'एम.एस.डब्ल्यू.' उर्फ मेडिकल सोशल वर्कर यांचे मदतीने सरकारकडून सुमारे २-२.५ लाख रुपये मिळू शकतात. तात्पर्य आपल्याला फक्त २ लाखापर्यंत रक्कम उभी करावी लागू शकते.

***
सगळ्यात महत्वाचे. २०% ऐकू येत असताना कुणी इम्प्लाण्ट सांगितला असेल तर तो फसवणूकीचा प्रकार आहे अशी दाट शंका मला आहे. दोन्ही कान ०% असताना साठीच हे ऑपरेशन करावे असे ईएनटी तज्ञ सांगतात. नायरला जाऊन सेकंड ओपिनियन घ्याच. तिथला ईएनटी विभाग चांगला आहे असे मला ठाऊक आहे. कदाचित नुसते ऐकण्याचे मशीन बसवून व रिहॅबिलिटेशनने उत्तम फरक पडेल.

या व्यतिरिक्त इतके खर्चिक दुसरे कोणतेच कानाचे ऑपरेशन मला तरी ठाऊक नाही. म्हणून कॉक्लिअर इम्प्लाण्ट असेल असे गृहित धरून लिहिले आहे.

हे किमती बद्दल :
https://www.google.co.in/search?q=cochlear+implant+cost+in+india&ie=utf-...

कॉक्लिअर इम्प्लान्ट
बरोबर हेच !! आभारी आहे तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे!

डॉ.कैलास गायकवाड आभारी आहे मी ह्यांना नक्की संपर्क करेन !!

मांडके हिअरिंग मध्ये २.५ वर्षापूर्वी BERA टेस्ट केली होती. तेव्हा पासून सई ऐकण्याचे मशीन वापरते + तिच्यावर मूक बधिर शाळेत शिक्षण वर्ग चालू आहेत परंतु त्याचा काही फायदा होत नाहीये असे दिसून आल्यावर कॉक्लिअर इम्प्लान्ट च्या निष्कर्षावर तिचे पालक आले आहेत...

दिलेल्या माहितीबद्दल आत्यंतिक धन्यवाद !!

(ता. क. वर्गणी करून खासगी हॉस्पिटलची लठ्ठ फी भरण्याच्या मी विरोधात आहे) > सहमत

महिंद्रा ट्र्स्ट तर्फे गरजुंना मोफत हे कॉक्लिअर इम्प्लान्ट करुन दिले जाते. पण याची पुर्ण माहिती माझ्याकडे नाहीय. माहिती मिळवुन येथे टाकते.

परंतु त्याचा काही फायदा होत नाहीये असे दिसून आल्यावर..
<<
फायदा न होण्याची इतरही कारणे असू शकतात. जसे रिहॅब सेंटरच्या अ-परिपूर्णतेपासून पेशंटच्या मेंदूची वाढ कितपत झाली आहे. इथपर्यंत.
कॉक्लिअर इम्प्लांटने जादू होईल व ती सरळ नॉर्मल ऐकू लागेल अशी अशी आशा बाळगणे चुकीचे आहे. काहीच नाही पेक्षा बरे, असे असेल तेव्हा ते काम करतात. नायरला जाऊन एकदा सेकंड ओपिन्यन घ्याच असे सुचवितो.

एकदा हेहे नजरेखालून घाला.

नायारचे मी तिचा घरच्याना आत्ताच फोन करून सांगितले आहे.. पाहूयात ते काय ठरवतात ते.. मी माझ्या परीने त्यांना सगळे समजावून सांगण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे...

साधना जरुर काळवा..

नायर मध्ये इम्प्लान्टचा खर्च ५ ते १० लाख असुन, इतर तपासण्यान्चा खर्च सुमारे ५हजार रुपये आहे. शस्त्रक्रिया मोफत.
हिन्दुजा होस्पिटलमध्ये पण सगळ्यात स्वस्त इम्प्लान्ट ५.५ लाखान्चा आहे. मदत मिळाल्यास ६- ६.५ पर्यन्त शस्त्रक्रिया होउ शकते.
दोन्ही कडचे रीझल्टस चान्गले आहेत.

पत्ता: मु. पो. पणदरे (हनुमानवाडी) ता. बारामती पुणे, ४१३११०.

>>> कशाला इथे-तिथे मदत मागताय. Happy साहेब आहेत की.

मी आताच महिंद्रा फाऊंडेशनला फोन करुन विचारले. कंपनीच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त कंपनीने ५ वर्षांखालिल ६० मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांटचा खर्च उचलला होता. सध्या त्यांच्याकडे अशी स्किम नाहीय.:(

तेव्हा ह्या इम्प्लांटचा खर्च ५ लाख होता, जो कंपनी थेट हॉस्पिटलला भरत असे.