सरलष्कर हंबीरराव मोहिते ३२५ व्या स्मृतिदिनानिमित्त दुर्गवीर परिवार तर्फे आदरांजली

Submitted by मी दुर्गवीर on 24 December, 2012 - 09:35

आपुल्या वंशावरी तू दिव्य कीर्तीची ध्वजा
यातुनी घेतील स्फूर्ती कोटी वीरांच्या प्रजा
मरण कैसे हे म्हणू मी ? मूर्त ही चिरंजीवता.....
सुरेश देशपांडे

nnnnn.jpg

या ओळी खरच या वीरपुरुषाला लागू पडतात. मराठ्यांचे सरलष्कर हंबीरराव (हंसाजी) मोहिते ह्यांची १६ डिसेंबर हि पुण्यतिथी. १६ डिसेंबर १६८७ साली मराठी साम्राज्यासाठी अथक जीव वेचलेल्या ह्या वीरपुरुषाला रणांगणात वीरमरण आले.

;;;.jpg

भगवा पाठीशी लाऊन निघाले दुर्गवीर त्या महाविरास नमन करण्यास ................

त्यांच्या ३२५ व्या पुण्यतिथीनिमित्त दुर्गवीर प्रतिष्ठान परिवाराकडून त्यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहण्यात आली.
jjjj.jpgjjjjj.jpgjjjjjjjjjjjjjjjjj_0.jpg
प्रथम समाधी स्थळाची साफ-सफाई करण्यात आली.समाधीस्थळ आणि आजूबाजूची जागा पाण्याने स्वच्छ करण्यात आली.

ttttt.jpg
नंतर समाधी वर हार-फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली.दुर्गवीर प्रतिष्ठान - साताऱ्याचे मावळे यात जातीने सहभागी झाले.
rrr.jpg
तसेच यावेळी हंबीरराव मोहिते समाधी समितीचे पदाधिकारी आणि तळबीड ग्रामस्थ हि उपस्थित होते.

mmmmm.jpg
हंबीरराव मोहिते समाधी समितीचे पदाधिकारी आणि तळबीड ग्रामस्थ यांच्या हस्ते फुल व हारवाहून आदरांजली देण्यात आली
यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी आपल्या हातून अशी सेवा नेहमी घडावी असा मनोदय व्यक्त केला.तसेच हाती घेतलेली दुर्गसंवर्धन-संरक्षण वर्धनगड सातारा मोहीम तसेच हाती घेतलेले कोणतेही शिव्कार्य शिवप्रभूंच्या आशीर्वादाने व आपल्या प्रेरणेने फत्ते व्हावी यासाठी प्रार्थना केली.
hhhh.jpg

नाही दंभ नाही अहंकार
आम्ही शिवरायांचे करितो कार्य !
दुर्गवीरचे मावळे आम्ही
रक्तात आमच्या शिवकार्य !!
सातारा येथील दुर्गवीर मावळे

ggggggggggggggggg.jpg
सरलष्कर हंबीरराव मोहिते ह्यांच्याविषयी थोडेसे: हंबीरराव मोहिते ह्यांचे खरे नाव हंसाजी. हंबीरराव हि पदवी त्यांना शिवछत्रपतींनी दिली. महाराणी सोयराबाई ह्यांचे ते भाऊ. प्रखर पराक्रमी अशा ह्या वीराने प्रतापगडाखाली आफ्जुल्ल्याच्या सैन्याची दाणादाण उडवली होती. ह्या लढाईत त्यांनी ६०० हून अधिक शत्रूसैन्या कापून काढले. हा पराक्रम गाजवणारी त्यांची तलवार आजही प्रतापगडच्या भवानी मंदिरात पहावयास मिळते. राज्याभिषेकाच्या वेळी सरसेनापती प्रतापराव गुजर ह्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी महाराजांनी हंबीररावाची निवड केली, ते त्यांच्या नात्यामुळे नाही तर ह्या वीराचे अतुलनीय शौर्य आणि स्वराज्याठाई असलेल्या निष्ठेने. शिवछत्रपतींच्या निधनानंतरच्या वादळी काळात शम्भूराजेंना साथ देऊन त्यांनी अफाट कर्तृत्व गाजवले. १६ डिसेंबर १६८७ साली वाई सातारा येथील लढाईत तोफगोळा लागून वीरत्व प्राप्त झाले

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुर्गवेडा,

या धडाडीच्या योध्यास भावपूर्ण आदरांजली. हे मराठा साम्राज्ञी ताराबाईंचे वडील ना?

तसेच तळेबीडवाल्या आणि दुर्गावीर मावळ्यांना शिवकार्य हाती घेतल्याबद्दल विनम्र अभिवादन.

आ.न.
-गा.पै.

असे वीर होऊन गेले
म्हणूनच आम्ही आज ताठ मानेने जगायला शिल्लक आहोत.

[शेवटच्या परिच्छेदातील मजकुराला धरून एक शंका, अफजलखानाच्या वधानन्तरच्या लढाईत केंजळ गावाजवळ बन्दुकीची गोळी लागून कोण धारातिर्थी पडले? सेनाप्रमुखान्पैकीच ते एक होते, केंजळ गाव वाईजवळच आहे. मला नेमके नाव/संदर्भ काहीच आठवत नाही Sad केवळ आशय आठवतोय. कृपया जाणकारांनी खुलासा करावा.]

मराठ्यांच्या सर्व सेनापतींपैकी माझे सर्वात आवडते... Happy

सरलष्कर कसा असावा याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे हंबिरराव...

सरलष्कर हंबीरराव याना मानाचा मुजरा.
पुण्याहुन कोल्हापुरला जाताना तळबीड जवळ आलं की उत्स्फुर्तपणे नजर उजवीकडे वळते.
तिकडे किल्लाही दिसतो आणि मनोमन प्रणाम घातला जातो.

nnnnnnnn.jpg
रोहित बंधू ...
गावात लागलेली हा माहिती फलक यात १६८७ या तारेखेची नोंद आहे व काही पुस्तकात पण उल्लेख आहे ..

ओके. माझ्याकडे आत्ता संदर्भ हाताशी नाहियेत. मी बघतो. Happy

लिंबू... मी माहिती काढतो. मला आत्तातरी ठावूक नाही.. Happy