ऊकळी..

Submitted by योग on 24 December, 2012 - 09:17

एक ऊकळी आत फुटली आहे..

ओतून, सांडून, संपलेले,
युगायुगांचे प्राक्तन प्यालेले,
शिल्लक निव्वळ वाफेच्या आटून जाण्याची वाट पहात,
ऊरलेले वांझोटे बुडबुडे..

गोठावे का फुटावे? या प्रश्णाचे ऊत्तर शोधणारे..
एकमेकांशी पुटपुटणारे..

त्यांना जन्म देणार्‍या तेजस्वीतेच्या नशिबी मात्र-
त्याच परिघातली तीच घुसमट
चटके खात करपून गेलेले बरबट
दगडांना पाझर फोडण्याची फरफट
मुडद्यांच्या विटाळांना लाजवणारी नजरांची गुरफट
चाटून पुसून ऊरलेले खरकट
षंढ शब्दांची सांत्वना बुरसट.

तरिही तिला पेटायचे आहे..

हा विखार अधिक जीवघेणा
की
विकार लाजीरवाणा..?

अवस्था आणि व्यवस्थेच्या मधिल षंढ कुंपण
तेही बोचत नाही...
त्यावर नंगेच बसून मग
ठोकलेल्या आरोळ्या,
वचनांच्या चारोळ्या,
संस्कृतीचे फुत्कार,
अस्तित्वाचे चित्कार,

..आपलाच आपल्यावर सामूहीक बलात्कार!

आता,
डोळ्यात तांबडे फक्त 'डाग' फुटतात
तिच्या ऊजाडण्या आधी
अन मावळण्याच्या वेळी
गर्भातल्या अंधार पोकळीत
माणुसकीची नाळ केव्हाच तुटली आहे..

एक ऊकळी आत फुटली आहे...

"सेक्स ईज नॉट बिटवीन टू लेग्ज
ईट्स इन द ब्रेन"- कुणी शहाणा सांगून गेला..
अणू, रेणू, अ‍ॅटम ते आयटम,
सगळीकडे 'तेच' आहे
दोन पायांमधली जागा तरी मेंदूसाठी 'पेच' आहे.
भोगकळसाखाली घोरत पडलेले देव्हारे
त्यांना बोच ना निर्माल्याची..
लुळे, पांगळे, जन्मजात होती
शोभेला माळ कण्यांची..
स्त्रीलिंगी सत्तेचे नपुंसकलिंगी सरदार
देती करोडोंच्या जखमांवर एक पगडी ऊधार
'एकावर एक फ्री' ची चटक लागली आहे,
तरिही तिला पेटायचे आहे,

एक ऊकळी आत फुटली आहे...

जुन्या आवृत्या, नविन निवृत्त्या,
ठोका, मारा, झोडा, राडा प्रवृत्त्या..
मि अन्ना मि फन्ना
प्लास्टिक जिभांचा पाढा नन्ना.
नुसत्याच चेहेर्‍यांची पुस्तके निघाली
'अंगठे' दाखवून अर्थपूर्ण माजली
माझी गाडी, तुझी गाडी,
देशाच्या रस्त्यांची ऊघडी अक्कलमाडी
शतकानुशतके नुसती विक्रमी शतके
जळून खाक पोटांना तीस रूपयाची लक्तरे..
'आधार' विकायची आता लाईन लागली आहे

तरिही तिला पेटायचे आहे,
एक ऊकळी आत फुटली आहे..

माणुसकी सर्वदा व्हेंटीलेटरवर आहे
ईंद्रियांच्या भोकांत ड्रेनेक्स ची गोळी आहे
गंजल्या, कुरतडल्या वीर्य जाळ्या
पिढ्यानपिढ्या नुसत्या वंध्य पाळ्या
अशाश्वताचा माज सिंघम आहे
जगण्या मरण्याची किंमत कंडम आहे..
आला नाताळ, होऊ नाठाळ
फुंकून टाकू आतला जाळ.
विझवण्याची अशीच सवय लागली आहे...

तरिही तिला पेटायचे आहे,

एक ऊकळी आत फुटली आहे..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

!

..

>>नाही आवडली
हरकत नाही... 'आवडण्यासाठी' (ईथे कधी) लिहीलेले नाही.. निव्वळ व्यक्त होण्यासाठी!