जुळ्या भिंतीची नवलाई हि तर तेलबैलाची खुबी
एकाच दिवसात सर झाले मावळ प्रांतातील दोन ट्रेक
सरत्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा ट्रेकमय ब्रेक
(पावसाळ्यातील प्रचि)
"कलशात ठेवलेल्या श्रीफळासारखा" दिसणार्या तुंगने प्रथमदर्शनीच मन मोहुन घेतले होते. मावळसृष्टीला, तिकोना, पवनाला जाताना याचे दर्शन व्हायचे. पण भेटण्याचा योग काही आला नाही. सुधागड, हडसर झाल्यावर हॅट्रीक म्हणुन तुंगचा बेत होता पण काहि कारणाने जमले नाही. शेवटी १५ डिसेंबरच्या विकांताला तुंगचा बेत ठरला. पण त्याच दिवशी बहुतेक कामाला जायचे असल्याने बेत बारगळण्याची लक्षणं दिसत होती. तसं शनिवारी माझं काम फक्त अर्ध्या तासाचंच असल्याने पूर्ण दिवस फुकट घालवण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे एका सहकार्याला comp-off चे आमिष दाखवून माझ्या जागी शनिवारी येण्यासाठी तयार केले. (अर्थात त्या दिवशीचे काम सोमवारवर गेल्याने दोघांनाही ऑफिसला जाण्याची गरज लागली नाही. ) आणि तुंगचा बेत ठरला. तसा तुंग हा किल्ला कमी चढण आणि घेर्याचा असल्याने ३-४ तासात सहज आटपुन होईल आणि त्याला जोडुनच एका दिवसातच "तेलबैला" करायचा का? असा विचार आला.
आयत्यावेळी बेत ठरल्याने जास्त कुणालाच न विचारता मी आणि दिपक असे दोघेच जण जाण्याचे ठरले.
त्याप्रमाणेच मी मुंबईहुन लोणावळ्याला एसटीने आणि पुण्याहुन दिपक बाईकने येण्याचे आणि पुढे दोघेही बाईकने प्रथम तुंग आणि नंतर तेलबैला करायचा असा प्लान पक्का झाला.
प्रचि ०१
लोणावळाहुन भूशी डॅम, आयएनएस शिवाजी साखरपठार मार्गे घुसळखांब फाटा आणि तेथुन पुढे तुंगी गाव. अॅम्बी व्हॅलीमुळे घुसळखांबपर्यंत रस्ता एकदम चकाचक आणि त्यापुढे अर्धा रस्ता चांगला आणि पुढचा खराब. लोणावळ्याहुन साधारण अर्धा-पाऊणतासात आम्ही तुंग गावच्या पायथ्याशी असलेल्या तुंगवाडीत आलो. तेथुन मारूती मंदिराच्या जवळील वाटेने साधारण पाऊण-एक तासात गडमाथ्यावर पोहचलो. सकाळीच चढाईला सुरूवात केल्याने एकदम फ्रेश वाटत होते. गडाचा घेरा तसा कमी असल्याने तासाभरात सगळा गड पाहुन होतो. पुढे वर बालेकिल्ल्याला जाणारी वाट किंचित अवघड आहे. बालेकिल्यावर गडाची अधिष्ठात्री देवी श्री तुंगाईचे एक छोटेसे मंदिर आणि जमिनीत खोदलेली गुहा आहे.
प्रचि ०२
पायथ्यापासुन दिसणारा तुंगचा बुरूजगडाचा इतिहास: (विकिहुन साभार)
पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गेचालणा-या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड ,विसापूर ,पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.
गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोडाच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाटेत थोडाच अंतरावर हनुमान मंदिर लागते.पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे.बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्या शिवाय इतर ऋतूत २ ते ३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकारे एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते.
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
महिन्द्रा रीसॉर्टबालेकिल्ला
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४जमिनीत खोदलेली गुहा आणि त्यामध्ये असलेले छिद्र
प्रचि १५
प्रचि १६बालेकिल्ल्यावरून दिसणारी तुंगवाडी (तुंगी)
प्रचि १७बालेकिल्ल्याहुन दिसणारा परीसर
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
साधारण तासादिडतासात सगळा किल्ला व्यवस्थित पाहुन झाला. बालेकिल्ल्याच्या खाली असलेल्या गणपती मंदिराजवळ घरून आणलेली शिदोरी सोडली. सकाळी सकाळी आमच्या बहिणाबाईंनी मस्तपैकी पिठल्याच्या वड्या, शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या करून दिल्या होत्या, त्यासोबत मी कांदाही घेतला. मग काय दोघांनी मस्तपैकी फडशा पाडला.
प्रचि २२
जेऊन झाल्यावर काहीवेळातच किल्याच्या पायथ्याशी आलो. दुपारचे साडेबारा वाजले होते. किलोमीटरचा अंदाज येत नसल्याने तेलबैलाला जायचे कि नाही हे ठरत नव्हतं. दुपारच कडक उनही त्याला कारण होतंच म्हणा. शेवटी मायबोलीकर स्वच्छंदी (मनोज)ला फोन केला आणि तुंगवाडी ते तेलबैला अंतर किती त्याचा अंदाज घेतला. मनोजच्या म्हणण्यानुसार तेलबैलाचा रस्ता तितकासा चांगला नसल्याने आम्ही फक्त आंबावणे गावापर्यंत बाईकन नेऊन परत फिरणार होतो. पण मनोजने सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही फक्त वृतांताच वाचलेली तेलबैला, सालतर, सालतर खिंड, भांबुर्डे, एकोले हि गावे निदान पाहुन तर येऊ अस माझ आणि दिपकच मत ठरलं. मनोजकडुन व्यवस्थित रस्त्याची माहिती घेतली आणि तेलबैलाकडे निघालो.
प्रचि २३
अॅम्बी व्हॅलीपर्यंत रस्ता एकदम चकाचक होता पण पुढे सालतरला जाणारा रस्ता खराब. शेवटी तेलबैला गावात जायचे आणि गावातुनच तेलबैलाच्या जुळ्या भिंती पाहायच्या असं दोघांच ठरलं. मनोजने सांगितल्याप्रमाणे सालतर खिंड ओलांडल्यावर लगेचच तेलबैला फाटा लागला. तेथुन साधारण साडेतीन किमी अंतरावर तेलबैला गाव आणि मग सह्याद्रीनवल असलेल्या त्या जुळ्या भिंतीची वाट. पण ते साडेतीन किलोमीटर म्हणजे अक्षरशः कसरत होती. शेवटी एकदाचे तेलबैला गावात पोहचलोच. पण म्हणतात ना सह्याद्रीची ओढच वेगळी आणि त्याच ओढीने आम्ही दोघेही त्या जुळ्या भिंतीच्या कुशीत शिरायला निघालो.
प्रचि २४
प्रचि २५
लोकसत्तामध्ये आलेला श्री अभिजीत बेल्हेकर यांच्या लेखातील तेलबैलाचे वर्णन.
‘डाइक’ अश्मरचना
ज्वालामुखीतून तयार झालेला आपला सह्य़ाद्री ‘डेक्कन ट्रॅप’ (पायर्या-पायर्यांच्या कठीण खडकांची रचना) पद्धतीचा आहे. या रांगांमध्ये मध्येच कुठेतरी वर उसळलेले सुळके, कातळभिंती दिसतात. भू-शास्त्रीय भाषेत अशा सुळक्यांना ‘व्होल्कॅनिक प्लग’ तर कातळभिंतींना ‘डाइक’ म्हणतात. तेलबैलाच्या या अजस्त्र भिंती म्हणजे या ‘डाइक’चीच अफलातून रचना आहे. समुद्रसपाटीपासून तेलबैलाच्या या भिंतींची उंची ३३२२ फूट आहे. चारही बाजूने सोलून काढलेल्या भिंती! जणू एखाद्या डोंगरावर अलगदपणे ठेवलेले केकच्या स्लाइसचे हे दोन भलेमोठे तुकडे! या दोन भिंतींच्या मधोमध एक खिंड आहे. जी खालूनही स्पष्टपणे दिसते. सामान्यांचे गिरिभ्रमण हे या खिंडीपर्यंतच, पण ते देखील वेगळ्या जगात घेऊन जाणारे.
संपूर्ण लेख इथे वाचा.
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८तेलबैलाची उजवी भिंत (एका बाजुने)
प्रचि २९
प्रचि ३०खिंडीतुन दिसणारा आणि धुक्यात अडकलेला किल्ले सुधागड
प्रचि ३१तेलबैला गाव
प्रचि ३२नवरा-नवरी आणि भटोबा किंवा ताजमहाल
प्रचि ३३दोन भिंतीमधील खिंड आणि भैरवनाथाचे मंदिर
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
प्रचि ३९
प्रचि ४०
(सौजन्य:दिपक)
प्रचि ४१
प्रचि ४२
प्रचि ४३
अशा रीतीने एकाच दिवसात तुंग आणि तेलबैला हे दोन छोटेखानी ट्रेक संपन्न झाले.
मूडस् ऑफ तुंग अॅण्ड तेलबैला ट्रेक
प्रचि ४४
प्रचि ४५पुन्हा भेटुच
प्रचि ४६
मस्त फोटो आणि त्याहुनहि मस्त
मस्त फोटो आणि त्याहुनहि मस्त वर्णन...
सुंदर...
सुंदर...
वा! सुंदर फोटो. आवडले. अगदी
वा! सुंदर फोटो. आवडले.
अगदी होरा साधून काढलेले दिसत आहेत.
मस्त फोटो रे.
मस्त फोटो रे.
सहीच!
सहीच!
मस्त
मस्त
झकास एकदम...तुंग आणि
झकास एकदम...तुंग आणि तैलाबैला.. मस्त मस्त...
पण तुंग बघायचा तर अगदी पहाटे वर चढून जायला पाहिजे.. तिथून दिसणारा सुर्योदय आणि पवना जलाशयात उमटणारी त्या दृश्याची छबी निव्वळ सुंदर !
मस्त!
मस्त!
सुरेख!
सुरेख!
झकास!!!
झकास!!!
सुंदर फोटो आणि नेहमीप्रमाणे
सुंदर फोटो आणि नेहमीप्रमाणे सुरेख लेखन.
नेहेमीप्रमाणेच... अ प्र ती
नेहेमीप्रमाणेच... अ प्र ती म...!
प्रवास वर्णन त्रोटक असले तरी,
प्रवास वर्णन त्रोटक असले तरी, सविस्तर वृतांताची कमी छान-छान प्रकाशचित्रांनी भरुन काढलीय.
सुंदर!!
पण तुंग बघायचा तर अगदी पहाटे
पण तुंग बघायचा तर अगदी पहाटे वर चढून जायला पाहिजे.. तिथून दिसणारा सुर्योदय आणि पवना जलाशयात उमटणारी त्या दृश्याची छबी निव्वळ सुंदर ! >> अगदी अगदी... वर्षभरापुर्वी सुन्यावरोबर केलेल्या तुंग भरारीची आठवण झाली.
मस्त फोटु अन भारी वर्णन .... जिप्स्या
मस्त!!!
मस्त!!!
नेहमीप्रमाणेच सुंदर.
नेहमीप्रमाणेच सुंदर.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
मस्त वॄत्तांत आणि फोटो.
मस्त वॄत्तांत आणि फोटो. म्हणजे आता नवीन वर्षाचा संकल्प काय असेल ह्याची पुसट्शी कल्पना आलीच आहे
सहीच सुंदर फोटो आणि वर्णन!
सहीच
सुंदर फोटो आणि वर्णन!
मस्त रे. बाइक जबरीये
मस्त रे.

बाइक जबरीये
सुंदर तुंगचा पवना काठावरुन
सुंदर
तुंगचा पवना काठावरुन दिसणार परिसत अप्रतिम असतो. तिकोना धुक्यात हरवला होता का?
बाइक जबरीये >>>>>येस्स
बाइक जबरीये >>>>>येस्स
दिपकची आहे. 
तिकोना धुक्यात हरवला होता का?>>>>हो ना. लोहगड, विसापूर आणि तिकोना तीनही किल्ले धुक्यात होते.
_/\_
_/\_
Jabari. photo Mahan aahet.
Jabari.
photo Mahan aahet.
नेहमीप्रमाणेच सुंदर
नेहमीप्रमाणेच सुंदर
हा एकच फोटो.... तिकोनावरून
हा एकच फोटो.... तिकोनावरून घेतलाय...
ग्रेट, ग्रेट - वर्णन आणि
ग्रेट, ग्रेट - वर्णन आणि फोटोही...
असेच भटकत रहा, फोटो काढा व सर्व वर्णन, फोटो इथे टाकत रहा..
जबरी फोटो !
जबरी फोटो !
अप्रतिम झब्बू, रोहन
अप्रतिम झब्बू, रोहन
जबरदस्त फोटो, रोहन
जबरदस्त फोटो, रोहन
Pages