मासे आणि आरोग्य

Submitted by ssaurabh2008 on 21 December, 2012 - 22:59

स्वस्थ आरोग्यासाठी मासे (सी-फूड) खावेत असे बर्‍याच ठिकाणी वाचले आणि ऎकले आहे.
आमच्या भागात फक्त गोड्या पाण्यातलेच मासे मिळतात. उदा. रोहू, कतला, मरळ

या तीन माशांपैकी कोणता मासा सगळ्यात चांगला आहे ? चवीलाही आणि आरोग्यालाही.

आणि मी असे वाचले आहे की फिश फ्राय केली तर त्यातले ओमेगा-३ ऍसिड कमी होते.
हे खरे आहे का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< या बाबत जागूच काय ते सांगु शकेल. >> १००% सहमत.
नविनच खाणारे असाल, तर प्रथम चव 'डेव्हलप' करा; आरोग्याचं मागून पहातां येईल ! Wink

माशांमध्ये ओमेगा-३ ऍसिड असते हे खरे आहे, मासे पचायला सोपे असतात, आरोग्याला चांगले असतात इ.इ. ही खरे आहे.

पण तळून खाल्लेले मात्र नक्कीच चांगले आरोग्यदायी नसणार, त्यातले ओमेगा-३ ऍसिड नष्ट होते की नाही माहित नाही, पण तळलेल्या पदार्थांचे दुर्गुण त्यात नक्कीच उतरत असणार.

मी मासा वाफवुन खाते. (वाफवुन म्हणजे पाण्यात उकडुन नाही, तर मोदक जसे वाफवतात तसा वाफवुन) तळायच्या आधी जे संस्कार माशावर करतो ते सगळे करायचे. फक्त शेवटी रव्यात/तांदळाच्या पिठात न घोळवता तसेच मसाला लावलेले मासे वाफवायचे. असा वाफवलेला मासा चवीला थेट तळलेल्या माशासारखाच लागतो, तळला नसुन वाफवलाय हे कळतही नाही. तुम्हाला मुद्दाम आरोग्यदायक म्हणुन मासे खायचे असतील तर तळुन खाणे टाळा.

गोड्या पाण्यातले मासे मी खाल्लेले नाहीत, चवीत फरक असतो असे ऐकलेय पण इतर बाबीत फरक नसावा.

साधना सांगते तसे उकडूनही छान लागतात. त्याच बरोबर भुजणं प्रकारातही कमी तेलात होतात मासे. शिवाय ग्रील हा ऑप्शनही आहेच.
नदीतले मासे चवीला थोडे गोडसर असतात. भाऊ म्हणतात तशी चव डेव्हलप व्हावी लागते. तपशील मात्र जागूच सांगू शकेल Happy

सौरभजी, 'चव' ही मुळातच खूप व्यक्तीनिष्ठ गोष्ट आहे आणि माशांच्या बाबतीत तर अधिकच. माझे वडील पक्के शाकाहारी होते [आम्ही भावंडं मात्र अस्सल मासेखाऊ ! ] व उतारवयात त्याना डॉक्टरानी मासे खाण्याचा सल्ला दिला. पंक्तीला रोज मासेखाऊ मंडळी असूनही नविनच मासे खायला सुरवात करताना
त्यांची अवस्था न बघवणारी असायची. ताटातल्या माशाच्या छोट्या तुकड्यामुळे त्यांच्या शाकाहारी जेवणाचाही विचका व्हायला लागला व शेवटीं तो प्रयोग सोडून द्यावा लागला !
म्हणूनच, मीं वर 'स्माईली' टाकली असली तरीही चव 'डेव्हलप' करणं/ होणं खरंच खूप महत्वाचं. नंतर इथले खानदानी मासेखाऊ तुम्हाला आनंदाने सर्वतोपरी मार्गदर्शन करतील याबद्दल नि:शंक रहा.

अहो भाऊ, मासे खाणारे तरी कुठे सगळ्या प्रकारचे मासे खाऊ शकतात? माझ्या घरी गोड्या पाण्यातले मासे खाणारी बंगाली मंडळी आलेली, त्यांच्यासाठी मी खास कोलंबीचे सार केले. आता आपल्याला कोलंबीचे सार म्हटले की तोंडातुन लाळ गळायलाच सुरू होईल पण त्या बिचा-यांना नाही खाता आला सार्-भार. नशिबाने मी वरणही केलेले ते कामाला आले Happy मोरी हा मासे प्रकारही जास्त करुन कोकण्यांनाच आवडतो, बाकीचे लोक तिथे ढुंकुनही पाहात नाहीत Happy

@ विद्याक
कोण जागू ?
त्यांना या धाग्यावर कसे आणायचे ? Proud

@ साधना ताई
माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. Happy

@ अवल जी
हां, ग्रील करणारच होतो मी ओव्हनमध्ये. Happy

@ भाऊ नमसकर
नवीनच खाणारा आहे मी.
अगदी तुमच्या वडीलांसारखीच कंडिशन आहे माझी. (सध्या तरी.) Biggrin
पण ही चव कशी डेव्हलप करायची ?

कोण जागू ?
<<

अज्ञ बालका,
तो विष्णूचा प्रथमावतार म्हणजेच, मत्स्यावतार तुला तुझ्या घोर अज्ञानाबद्दल माफ करो!

ही जागू
ही तिची विचारपूस

इथे जाऊन तिला हाक द्यायची. जागू ही मायबोलीवरची प्रसिद्ध मासे"करीण" आहे हो Happy
इब्लिस, अहो नवीन माणसाला मदत करा हो Happy

>>अज्ञ बालका,
तो विष्णूचा प्रथमावतार म्हणजेच, मत्स्यावतार तुला तुझ्या घोर अज्ञानाबद्दल माफ करो!>> Lol

सौरभ आत्तापर्यंत तुम्ही माश्याचे काय प्रकार खाल्ले आहेत. भाऊकाका म्हणतायत तसे चव डेव्हलप होणे आवश्यक आहे. मला विचाराल तर तुमच्या जे ओळखीचे अस्सल मासेखाऊ त्यांच्याकडे कधी मधी पाहुणचार घेत जा Proud

हे पहा ईथे http://weightloss.about.com/od/eatsmart/a/bleatomega3.htm
यानुसार omega 3 fatty acid युक्त मासे म्हणून बांगडा, रावस, कोलंबी, पेडवे वगैरे खाता येतील

मलाही मासे खूप आवडतात पण गेल्या 1-1.5 वर्षापासून मासे खाल्ले की उलटी होते म्हणजे मासे न पचण्यामुळे होत असेल का? मास्यांची ही एलर्जि असू शकते का?

@ निलू ताई
आमच्याकडे भेटत नाहीत हो समुद्री मासे. Sad

आणि आमच्याकडे मासे फार कमी खातात लोक.
माझ्या ओळखीच्यांपैकी फार फार तर दोघे-तिघे खात असतील मासे. (तेसुद्धा हॉटेलमध्ये.)
पाहुणचाराला बोलवणारा तर कुणीही नाही. Biggrin

पिन्कि, कुठले मासे ? काही शेल फिशची ( कोलंबी / खेकडे / तिसर्‍या / शेवंड ) यांची अ‍ॅलर्जी येऊ शकते. मासे जर नीट साफ केले नाहीत, शिळे ( उतरलेले ) असतील तरी त्रास होतो. अ‍ॅलर्जी केवळ उलटीचीच नव्हे तर अंगावर पुरळ वगैरे स्वरुपातही येते. जर ठराविक मासा खाऊनच असे होत असेल, तर तो टाळलेलाच बरा.

<< काही शेल फिशची ... अ‍ॅलर्जी येऊ शकते. >> हल्लीं प्रदूषणामुळेही अ‍ॅलर्जी होते. पूर्वी धरमतर खाडी, पाताळगंगा नदी येथील 'टायगर प्रॉन्स'ची स्वतःची एक ओळख व मिजास होती. पाताळगंगा औद्योगिक वसाहत [ रासायनिक]झाल्यावर अनेकाना तेथील प्रॉन्स खाऊन त्रास झाल्याचं मला माहित आहे. आपण खात असलेले मासे अशा प्रदूषित पाण्यातले नाहीत ना, याचीही खात्री करून घ्यावी.

काही माशांमध्ये पारा असतो, उदाहरणार्थ ट्युना, शार्क वगैरे. ते खाताना मात्र जपुन खावे. बाकी सॉलमन आणी बांगड्यामध्ये ओमेगा भरपूर.

मासे जास्त वेळ पण तळु नये, कदाचीत याने पण त्यातले प्रभावी गुण कमी होत असतील. मात्र मासे खाल्यानंतर आणी आधी पण दूध आणी दूधाचे पदार्थ टाळावेत. ( हे नवीन मासेखाऊंसाठी आहे, पट्टीच्या मासेखाऊंना माहीत आहेच)

मला ह्या दुध आणि मासे काँबोबद्दल खुप आश्वर्य वाटते. मी कधीच या दोघांना एकत्र पाहिलेले नाही. मांसाहार आणि दुग्धाहार एकत्र कधी पाहिलेला नाही. नेटसंसर्ग झाल्यावर चिकनच्या पदार्थात दही वापरतात हे कळले. त्याआधी दुध आणि मांस एकत्र करायचे नाही हीच शिकवण होती.

पण मग बंगाली लोक कसे काय वापरतात दुध आणि मासे एकत्र?? त्यांना कसे काय होत नाही?

साधना बंगाली लोकांशी माझा कधी संपर्क नाही आला, म्हणजे ते कधी शेजारी वगैरे असे म्हणून पण कधी लाभले नाहीत. पण युसमध्ये मात्र मी मासे बर्‍याचदा दूधात शिजवुन खाताना बघीतले. आणी त्यामुळे त्यांची त्वचा पण तशी कधी निरोगी दिसली नाही. अर्थात हवामानाचा पण परीणाम असतोच त्या त्वचेवर. पण आयुर्वेदात मासे आणी दूध एकत्र खाऊ नयेत असे पण म्हटले आहे. जाणकार तज्ञ सांगतीलच यावर.

टुनटुन, बरंच काही आयुर्वेदाच्या नावावर खपवलं जातं. उदा. ब्रह्मचर्य हेच जीवन इ. इ...
काही काँबो आपल्याला नाही आवडत/पटत इ. तर खाऊ नाहीत. नारळाचं दूध बरं चालतं माशांना?

कोलंबी / खेकडे / तिसर्‍या / शेवंड इ. जलचर आहेत. 'मासे' नाहीत. यांनाही आपण समुद्रभाजी म्हणूनच खातो तो भाग वेगळा असला तरी ओमेगा३ फॅटी अ‍ॅसिड्सबद्दल बोलणं सुरु झालं त्या दृष्टीने हे सगळे प्रकार वाईट. म्हणजे जमीनीवरच्या प्राण्यांत मटन जसे चिकनपेक्षा वाईट, तसे फॅटच्या बाबतीत कोलंबी / खेकडे / तिसर्‍या / शेवंड इ. वाईट. (इथे वाईट चा अर्थ तुलनेने कमी चांगले इतकाच घेणे.)
हार्ट प्रॉब्लेम वाल्यांना आवर्जून मासे खायला सांगितले जाते. 'मासे' मधे हे प्राणी टाळावेत. तसेच तळणेही टाळावे.

मी फक्त पापलेट व सुरमई एवढेच मासे आज पर्यन्त खाल्ले आहेत. आम्ही गोवाला गेलो होतो तेव्हा नवर्‍याने माकुल खाले होते पण त्याला ही उलटी झाली होती.

नारळाचं दूध बरं चालतं माशांना

गाईचे दुध आणि नारळाचे दुध यात फरक आहे. खोब-यात पाणी घालुन ते वाटले आणि मग ती चटणी पिळली तर जो रस निघतो त्याला केवळ रंग पांढरा म्हणुन दुध म्हटले जाते. ते खरे दुध थोडेय? आयुर्वेदात एकुणच मांसाहारापासुन दुग्धाहार दुर ठेवलेला आहे. चिकनला दही लावणे ही मोगलाई पद्धतीची खासियत आहे.

http://www.misalpav.com/node/23487
साधनाताई, ती रेसिपी वाचा पीऽज. चालतंहो दही, दूध. काऽही होत नाही. अन व्हायचंच असेल तर कशानेही काहीही होऊ शकतं.
(नारळाचे 'दूध' मी गमतीत सांगितले होते हो.)

ह्म्म्म्म.. दिसतेय खरी जालीम... पण मी नाही करु शकत मासे+दुध एकत्र करायचे धाडस. वर्षानुवर्षांचे संस्कार, अजुन काय????? माझी त्वचा आधीच सेंसिटिव आहे आणि त्यात मासे+दुध संयोगाने त्वचा विकार होतात असे ऐकलेय, खखोदेजा. उगीच फट म्हणता ब्रम्हहत्या कशाला???

नक्की मिथच असणार्.. दुधात मासे घालुनही बंगाल्यांना काहीच कसे होत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. Proud माझा एक जवळचा नातलग बंगाली आहे. तो माशेर दोई का माशेर झोल असल्या कायशा नावाच्या डिशची नेहमी तारिफ करत असतो.

'मासे व दूग्धजन्य पदार्थांचं हाडवैर आहे', हें 'मिथ' असल्याचं संजीव कपूरनेही टीव्ही वरच्या एका प्रात्यक्षिकाच्या संदर्भात सांगितल्याचं आठवतं. तो व्यावसायिक 'शेफ' असल्याने त्याच्या म्हणण्यात तथ्य असावं. अर्थात, मीं व्यक्तीशः मात्र << पण मी नाही करु शकत मासे+दुध एकत्र करायचे धाडस. वर्षानुवर्षांचे संस्कार, अजुन काय????? >> शीं सहमत.
[ रच्याकने, फ्रीज मधून काढलेल्या माशांचा थंडपणा पूर्णपणे गेल्याशिवाय ते तळणं बरोबर नाही, हा सर्वसाधारण समजही असंच 'मिथ' असल्याचंही संजीव कपूरने सांगितल्याचं आठवतं ]

सौरभजी, तुम्ही इथ मासे खाण्याचीं मुळाक्षरं शिकायला आलांत आणि आम्ही तुम्हाला कठीण व्याकरणाच्या चर्चेतच खेचतों आहोत ! पण शिकण्याच्या इच्छेवर त्याचा परिणाम होऊं देऊं नका !! Wink

मांस आणि दूधाबद्दल अजून एक...
माझी आईसुद्धा नेहमी सांगते की चिकन खाल्ल्यानंतर दूध किंवा दूधाचे पदार्थ खायचे नाहीत.
पण मला मात्र चिकन बिर्याणी त्या आंबट दह्यासोबत फार चांगली लागते. Proud

अज्ञ बालका,
तो विष्णूचा प्रथमावतार म्हणजेच, मत्स्यावतार तुला तुझ्या घोर अज्ञानाबद्दल माफ करो!

Lol Lol Lol Lol

उशिरा इथे आल्याबद्दल दिलगीर आहे. घरात नणंदेच्या लग्नाने दमल्याने माबोवर बरेच दिवस आलेच नाही.

सौरभ माझ्या माहीतीप्रमाणे ओमेगा अ‍ॅसीड हे जास्त प्रमाणात शिजवल्याने कमी होते. पण माश्यांना जास्त शिजवण्याची गरज नसते. कालवणाला उकळी आल्यावर अगदी पाच ते सात मिनीटांत कालवण तयार होते. तळलेल्या माश्यांना थोडा जास्त वेळ लागतो कारण त्यांना दोन्ही बाजूंनी शिजून घ्यावे लागते त्यामुळे कदाचीत ओमेगा अ‍ॅसीड जास्त कमी होत असेल.

तुम्ही म्हणता त्यातील कटला मासा आमच्याकडे मिळतो नदीतला. पण तलावातील संथ पाण्यातील असल्यामुळे त्याला जास्त वास येतो. आमच्याकडे बहुतेक बंगाली हे गोड्या पाण्यातील कटला मासा खातात.

आता माझा वैयक्तीक सल्ला असा आहे की मासे खाताना जर आपल्याला कसले आजार, पथ्य नसेल तर असे विचार करुच नका त्याने मासे खाण्याचा आनंद कमी होतो. माश्यांवर मेजवानीप्रमाणे ताव मारा म्हणजे त्या माश्याची खरी चव लक्षात येईल. हे खरे आहे की तळलेले मासे रुचकर असतात पण अती तेलामुळे आरोग्यदायी नसतात मग त्यासाठी ऑप्शन म्हणुन एखाद्या केळीच्या किंवा हळदीच्या पानात असे मासे निखार्‍यावर भाजायचे. आणि तसेही एखाद्या तळलेल्या तुकडीने धडधाकट व्यक्तीला काही त्रास होत नसेल.

हा माझा पुर्ण्पणे वैयक्तीक सल्ला आहे. कुठल्या आरोग्यतज्ञाकडून घेतलेला नाही. तेंव्हा जेवढा पटेल तेवढाच घ्यावा. Happy

सौरभ, तुमच्याकडे जे मासे मिळतात त्यातला एखादा घेउन तो आपल्या पध्दतीने करुन बघ. आधी एखादा तळुन बघ. तो बरा लागला कि मग कालवण कर. इथे मला पण आधी आपले मासे मिळायचे नाहीत तेव्हा मी पण असे प्रयोग इतर माशांवर करुन पाहिलेत. मासे करताना आधी चांगले स्वच्छ करुन घे. म्हणजे पोटाला बाधणार नाही. मासे कसे निवडावेत... हे जाणकारांकडुन चांगले जाणुन घे. Good Luck!

आरोग्यासाठीच जर खायचे तर कॉड लिव्हर ऑइल किंवा तत्सम पर्ल्स, सप्लिमेंट्स येतात त्या घेता येतील. पण तुम्ही वैद्यकीय सल्ला घेऊनच पुढे जा. चवीचे मासे खायचे तर अगदी मस्त रेसिपीज आहेत इथे. जागूतैंची सीरीज भारी आहे.

व्यक्तिशः मला व्हेल्स, डॉल्फिन्स, जेलीफिश आवडतात ................. बघायला.

पुणेरी वरणभातवाली.

विषमाशन अश्या अर्थाने आयुर्वेदाने काही काँबिनेशन्स वर्ज सांगीतली आहेत. यातुन म्हणे प्रत्यक्ष जीवघेण वीष तयार होत नसल तरी वीषसमान काही तरी ( टॉक्सीन्स ) तयार होत असावीत.

ही कॉम्बीनेशन्स म्हणजे

१) मासे - दुध
२) दुध - मीठ
३) आंबट फळे - दुध

बाकी मासे खाणे ही एक पर्वणीच असते. खास करुन माझ्यासारख्याला जेव्हा घरात मासे शिजत नाहीत.

विद्या तुझ्या प्रोफाईलमध्ये विचारपुस नाही तुझा मेल टाकतेस का मला एक माझ्या संपर्कातून.

सौरभ तुमच्याकडे फक्त गोड्या पाण्यातलेच मासे मिळतात ना मग तुम्ही अश्विनी मामी म्हणते त्याप्रमाणे आधी फ्राय फिश खाऊन सुरुवात करा कारण ती रुचकर लागते. आमच्याइथे समुद्रातलाही कटला मिळतो. आणि एक तुकड्या शक्यतो पातळच कापुन घ्या म्हणजे लवकर शिजून अधिक रुचकर लागतील.

मदतीबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.

हा धागा काढल्यापासून मी कतलासुद्धा खाल्लाय आणि रोहूसुद्धा खाल्लाय.
नवीन असल्यामुळे चव काही फार वेगळी लागली नाही दोघांची.

पहिल्या वेळी आईने फिश करी करून दिली.
आईने पहिल्यांदाच फिशला हात लावला होता, पण फिश करी फार मस्त झाली होती. Proud

दुसर्‍या वेळी मात्र मी फिशला मॅरिनेट करून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ग्रिल करून घेतले.
पण दोन्ही बाजूंनी ८-८ मिनिटं ग्रिल करूनसुद्धा मॅरिनेशन कच्चंच राहिलं होतं. Sad
याबद्दल कुणी काही टिप्स देऊ शकेल का ? Uhoh

नितीनचंद्र | 24 December, 2012 - 08:47 नवीन

विषमाशन अश्या अर्थाने आयुर्वेदाने काही काँबिनेशन्स वर्ज सांगीतली आहेत. यातुन म्हणे प्रत्यक्ष जीवघेण वीष तयार होत नसल तरी वीषसमान काही तरी ( टॉक्सीन्स ) तयार होत असावीत.
<<
विषम + अशन = uneven + consumption. (अनशन - उपाशी रहाणे.)
विषसमान असे नाहीये ते. कोणतेही विष तयार होणार नाही.

फ्रूट सॅलड बंद करा खाणे. ( संत्री/मोसंबी इ. भरपूर आंबट फळे आपण त्यात घालत असतो)

दुधात मीठ कॉम्बो सध्या आठवत नाहीये, पण आटवलेल्या दुधाची कुल्फी भरपूरदा खाताना खारट लागते. फ्रीझींग मिक्स्चरमधील मिठामुळे. त्या कॉम्बोमुळे कुणाला कधी अपाय झाल्याचे आठवत/ऐकिवात नाही. पण तुम्ही शक्यतो कुल्फीही खात जाऊच नका Wink

तंदूरी फिश मधे चिकनप्रमाणेच फिश देखिल दह्यात मॅरिनेट करतात Wink अशक्य स्वर्गीय लागतो तंदूरी पापलेट. पण तो ही तुमच्या करता वर्ज्य होईल..

तेव्हा तुम्हाला :टुकटुक करणारी भावली:

तसेही एखाद्या तळलेल्या तुकडीने धडधाकट व्यक्तीला काही त्रास होत नसेल

येस. पुर्णपणे सहमत.. Happy जागु तुझ्या हातच्या तळलेल्या तुकड्या खायला धडधाकटच काय, इतरही धडधाकटांसारखेच धावतील.

माझा आयुर्वेदावर विश्वास असल्याने मी जे टाळा म्हटलेय ते जितके शक्य आहे तितके टाळते. कुल्फीवाली लाल मडकी घेऊन कुल्फाssssssssssssssssssय ओरडत सोलापुरी/कोल्हापुरी लोक काही वर्षांपुर्वी खुप फिरायचे, त्या कुल्फीत कधीकधी पाणी आत शिरल्याने खुप मीठ लागायचे. नॅचरल्सचे आईसक्रिम खाल्लेय खुपदा, त्यात मात्र फळांसोबत दुध असणार. मिल्क शेक मात्र मी आजवर कधीही प्यायले नाही.

१) मासे - दुध
२) दुध - मीठ
३) आंबट फळे - दुध

>>> नितीनचंद्र तुमचे म्हणणे योग्य आहे. या कोम्बिनेशन ला विरुद्ध अन्न म्हणतात आणि त्यामुळे त्वचेचे रोग होतात. माझी आई आम्हाला मासे , चिकन वर दूधाचे पदार्थ/आईस्क्रिम खायला देत नाही .फ्रूट सॅलड मधे पण दूध घालू नये.दूधाबरोबर मिठ खाल्याने कोड सारखे त्वचा रोग होतात . स्ट्रॉबेरी मिल्क शेक, केळ्याचे शि़करण खाणे पण हेल्दी नाही.
तन्दूरी/चिकन बिर्याणी मधे तर सर्रास दहि वापरतात पण ते योग्यच आहे असे नाही.

या कोम्बिनेशन ला विरुद्ध अन्न म्हणतात आणि त्यामुळे त्वचेचे रोग होतात. .
<<
सामी ताई, त्वचेचे रोग कोण-कोणते असतात? यापैकी कोणते रोग अशा अन्नामुळे होतात नक्की? ४-२ रोगांची नावे कळलीत तर माझ्या ज्ञानात थोडी भर पडेल Happy

दूधाबरोबर मिठ खाल्याने कोड सारखे त्वचा रोग होतात >>> हे नक्कीच खरं नाही. मी दिवसातून एकदातरी दूधभात खाते. दूध तूप मीठ आणि भात. अद्याप कसलाही त्रास झालेला नाही. माझी आज्जी पण असाच दूधभात खायची. वयाच्या ८०व्या वर्षापर्यंत तिची स्किन तुकतुकीतच होती.

>>दूधाबरोबर मिठ खाल्याने कोड सारखे त्वचा रोग होतात >>> हे नक्कीच खरं नाही.>> अगदी गं.. मी ही हेच म्हणणार होते. मी आता खात नाही पण लहानपणी माझं हेच जेवण होतं आणि तेही आवडीचं. मला अद्यापि काही त्वचारोग वगैरे काही झालेला नाही. फ्रुट् सॅलड पण आतापर्यंत कित्तीदा खाल्लयं.
सौरभ अभिनंदन!! पहिल्या खाण्यात तुम्हाला मासे आवडले म्हणजे गड फत्तेच म्हणायचा Happy रोहू, कटला शिवाय अजून कसले मासे मिळतात तुमच्याकडे? रोहू, कटला आम्हीही खात नाहीत.

दुध + भात + दुधावरची जाड साय आणि अर्थात मीठ ....... किती वर्षे झाली हे खाऊन.. लहानपणी मी आवडीने खायचे. आज घरी जाऊन खाणार... Happy आठवण आली आणि खायची इच्छा निर्माण झाली.

Pages