बदाम राणी गुलाम चोर

Submitted by मी मधुरा on 19 December, 2012 - 07:57

कोणाकोणाला कथा कळली 'बदाम राणी गुलाम चोर' या सिनेमाची?
कळली असेल तर जरा कोणी तात्पर्य सांगू शकेल?
मला कळलाच नाही सिनेमाचा आशय.
कोणाला आवडला हा सतीश राजवाडेचा सिनेमा?
मला नाही मात्र आवडला. Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाटक म्हणून चागंलं होतं. पण त्याचा सिनेमा करताना लय बिघडल्यासारखं वाटलं. >>> प्रचंड अनुमोदन. मुक्तापण मोकळी, खट्याळ, मनमौजी वाट्ण्याऐवजी बनेल आणि चालु वाटते. कामं सगळ्यांनी छान केलीयेत पण तरी सिनेमा गंडलाय खरा.

ह्याला एथे वाहता बाफ म्हणतात.म्हणुन मागील प्रतिक्रिया आपोआप उडतात. उद्या पहाल तर यातील काही दिसणार नाहीत

अशा चित्रपटामुळे लोक फिरकत नाही मराठी सिनेमाकडे
काहीच्या काही
म्हणे पुस्तक काय पेन्सिल काय
मारा धरुन सगळ्यांना

सगळे एवढे का वैतागलेत बरागुचो वर? इतकाही वाईट नव्हता...संवाद चांगले होते की...कधीकधी बघणाऱ्याला विचार करायला लावणारे सिनेमे असावेत की..
आणि या वाहत्या बाफने घोळ झालाय...काल निनाद यांनी खूप भारी रिव्यू दिला होता!

अशा चित्रपटामुळे लोक फिरकत नाही मराठी सिनेमाकडे
काहीच्या काही
म्हणे पुस्तक काय पेन्सिल काय
मारा धरुन सगळ्यांना>>>>> Lol

नाही, ह्या चित्रपटात संवादांशिवाय अभिनयही चांगला होताच. पण कथा पटली नाही.