देखणे उणे

Submitted by अज्ञात on 12 May, 2009 - 14:42

असेच असु दे तुझे वागणे
दूर राहु दे ठाणे
अव्यक्तातिल सुरावटींचे
धुंद होउ दे गाणे

माझे असणे अथवा नसणे
विसंबून त्या गावे
पहाटवारा रात्र उन्हाळी
रोजच येत रहावे

दिसेल ते उतरेल दंवातुन
कल्पनेत देखणे
भरून येइल शाईमधुनी
असेल जे जे उणे

..............अज्ञात

गुलमोहर: 

अव्यक्तातिल सुरावटींचे
धुंद होउ दे गाणे
आवडलं!
बापू करंदीकर

असेच असु दे तुझे वागणे
दूर राहु दे ठाणे>> ह्यातले ठाणे म्हणजे मुक्कामाचे, भोज्याचे/ पुर्ण विरामाचे ठिकाण आहे का? प्लिज तेव्हढ सांगाल तर कविता कळता कळता निसटली अस नाही होणार माझ

अव्यक्तातिल सुरावटींचे
धुंद होउ दे गाणे>> आवडेश Happy

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

माझे असणे अथवा नसणे
विसंबून त्या गावे
पहाटवारा रात्र उन्हाळी
रोजच येत रहावे>>>>>

सुंदर, काय कल्पना आहे Happy

........................................................................................................................................

गुंड्या तुझा सोटा खरोखरच हरवला रे आज Sad

अव्यक्तातिल सुरावटींचे
धुंद होउ दे गाणे

छान

खूपच छान..... आवडली..... निसर्गाकडून खूप काही आहे शिकण्यासारखे...... कल्पना

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" काही उणे वाटत नाही. सारेच देखणे. "

शेवटचा अंतरा सही आहे. कविता आवडली

व्वा अज्ञातजी, आल्या आल्या बहार उडवुन दिलीय तुम्ही ! मस्तच !!
____________________________________________

एक विचारू एक विचारु
उगीच असले प्रश्न कशाला?
अपुल्यामधली विरामचिन्हे
कधीच गळली माहीत तुजला ! (श्री. प्रविण दवणेसर)

भरून येइल शाईमधुनी
असेल जे जे उणे
मस्त.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

व्वा अज्ञातजी...मस्त कविता..लय खुप छान!!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

व्वा अज्ञातजी...मस्त कविता..लय खुप छान!!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

माझे असणे अथवा नसणे
विसंबून त्या गावे
पहाटवारा रात्र उन्हाळी
रोजच येत रहावे

हे आवडल.

वा, क्या बात है!
सुरेल आणि सुरेख कविता.

अज्ञात, अव्यक्तातल्या सुरावटींचे गाणे ऐकु यायला.
४-५ दा कविता वाचावी लागली. हा सहाव्यांदा वाचल्यावरचा प्रतिसाद ! Happy

तुमच्या सर्व कवितांची हीच खासीयत आहे.
(आता परत आज्ञातवासात नका जावू ही प्रेमळ विनंती! Happy )

प्रकाश,

अज्ञात, अव्यक्तातल्या सुरावटींचे गाणे ऐकु यायला.
४-५ दा कविता वाचावी लागली. हा सहाव्यांदा वाचल्यावरचा प्रतिसाद !

तुमच्या सर्व कवितांची हीच खासीयत आहे.
(आता परत आज्ञातवासात नका जावू ही प्रेमळ विनंती! )

ह्या प्रतिसादाने अज्ञात भरभरून पावला. अजून काय सांगू ?

सर्वांचेच आभार.

you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com