सकाळी सकाळी उठून दाढी करताना..

Submitted by इब्लिस on 16 August, 2012 - 02:28

ब्लेड जुनं झालंय म्हणून नवी कार्ट्रीज काढली.

Image and video hosting by TinyPic

पिवळ्या गोलात लिहिलेलं वाचून पुन्हा एकदा विचारात पडलो. २ महिने चालेल म्हटलेलं ब्लेड सालं आपल्याला १५ दिवसात ओरबाडायला का लागतं आहे? ९०-९५ रुपयांना १ मिळणरं हे ब्लेड २ महिने नाही तरी दीड महिना तरी 'स्मूथ' चालेल असा विचार करून घेतलेलं असतं.

चुकून म्हणा किंवा रिकामा वेळ होता म्हणून म्हणा, त्या २ महिने वाल्या चित्राकडे पहाताना त्या MONTHS* च्या पुढे लिहिलेला तो ष्टार * दिसला. असे अ‍ॅस्टेरिक्स असले की काहीतरी लोचा त्यासोबत असतोच. म्हणून त्या खोक्याची मागची बाजू वाचायला घेतली. तर हे दिसले :

Image and video hosting by TinyPic

जिलेटच्या वेबसाईटवर गेलो, तिथे त्याच सर्वेनुसार अ‍ॅव्हरेज ७.३ अठवडे हे रेझर चालेल असे आहे. म्हणजे त्यांच्या हिशोबाने केले, तरीही २ महिने नाहीच.

तात्पर्य काय? एकतर अठवड्यातून अडीच वेळाच दाढी करा, अन असे साडेसात अठवडेच करा.

तर प्रश्न असे:

यापेक्षा साधे ब्लेड काय वाईट? २ रुपयांत ४ वेळा दाढी होते. अन स्वच्छ करायलाही सोयीचे असते..
तुम्ही अठवड्यातून अडीच वेळा दाढी करता की जास्त?
अशा प्रकारच्या फसव्या जाहिराती तुम्हाला कुठे आढळ्ल्यात का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं भारत, टोपाझ असे २ रु वालेच चांगले
धार जाई पर्यंत वापरता येते , एकदा का फावडे झाले कि द्या फेकुन

मी रोज दाढी करतो आणि मला हे ब्लेड सहज २ महिने चालते.
हे ब्लेड वापरण्याचे एक तंत्र आहे ( डॉ. वर्षा जोशी, यांचा एक लेख होता यावर.) प्रत्येक वेळी ते गरम पाण्यात धुवून घ्यायचे असते. वापरण्यापुर्वी आणि वापरल्यानंतर देखील. तसेच दाढी अंघोळीच्या दरम्यान, (अर्धी अंघोळ झाल्यावर) प्रत्येक वेळी चांगले जेल लावून... वगैरे.

लकी आहात दिनेशदा.
आमच्या खराट्याला जास्त जोर लागत असावा.
बाकी अर्धी आंघोळ वगैरे इतकी झिगझिग करण्यापेक्षा सरळ २ रुपयेवालं ब्लेड काय वाईट? नवे असले तर तितकेच स्मूथ चालते? व्हॅल्यू फॉर मनी मिळत नाही असे मला म्हणायचे आहे.

माक ३ टर्बो चा मलापण हाच त्रास होता... च्यामारी २५०/३०० रू ला ते झेंगट घ्या वर चालत पण नवत... मग फिलिप्स चा ईले. शेवर आणला २००० ला... तो बाबांना दिला, माझी हिंमतच नाही झाली ती ३ गरगरणारी ब्लेड्स थोबाडावर फिरवायला... बापू मात्र खुशित... मस्त आहे म्हणाले... बिनपाण्यानी पण होते, केसांची झंझट नाही, बॅटरी वर चालते... वगैरे२...

आता जेलेट्चंच फ्यूजन आणलंय... ५ ब्लेड वालं रेजर... ३ महिने झालेत १हीलंच ब्लेड चालतय...

मी पण आठवड्यात २दा/३दा शेव्हिंग वालाच...

पूर्वी एक ब्लेड असे.. मग दोन.. मग तीन.. आता चार...
हळूहळू २५ ब्लेडची कार्ट्रेज येणार.. अर्थातच्या ब्लेडमधंल अंतर कमी कमी होणार..
मग ब्लेड नुसतंच दाढीवरून फिरणार, त्यात केस घुसायला जागा राहणार नाही.
किंवा दाढीचे केस बारीक होण्यासाठी Antibiotics येणार. दाढी करण्याचे नियम बदलणार.

नाहीतर खोरे मोठे होत होत चेहर्‍याएवढे होणार..
मग ब्लेड कुठल्यातरी स्टँडवर कॅमेर्‍यासारखे Mount करून गाल त्यावर घासावा लागणार.
'आज दाढी नाही केली' या प्रश्नाऐवजी 'आज गाल नाही घासला' असा प्रश्न येणार.
मग २००/३०० डॉलरला तो Tripod stand विकत घ्यावा लागणार..
त्यासाठी न्हाणीघरात वेगळी जागा करावी लागणार.
त्यावर आरसा mount करायला वेगळी Attachment लागणार..

देवा देवा देवा...

किती दिवस ही कटकट नको म्हणुन मी दाढी राखुन होतो. आठवड्यात एकदा कट मारायचा आणि १५ दिवसांनी सलुन मधे ट्रीम करायची. पांढरी झाली आणि गडबड झाली.

आठवड्यातुन दोनदा दाढी योग्य आहे, दररोज दाढी खरडायला जगातले कुठलेच ब्लेड पुरायचे नाही.ईब्लीस, आपण डॉक्टर आहात ना ?एक इंची पांढरी काळी दाढी, डोक्यावर काळे पांढरे केस, अश्या अवतारातला डॉक्टर फारच टॅलेण्टेड वाटतो .बघा करुन, तेवढेच पैसे जास्त मिळतील.

मी रोज दाढी करतो. १३ रु. वालं सटासट (mrp १७ पण ३ वर १ फुक्कट स्किम बरेच दिवस झाले चालू आहे) दिड महिना जातं! ब्रश करुन झाल्यावर लगेच चेहर्‍यावर असलेल्या त्याच पाण्यात खरडायला घेतो. शेविंग क्रिम बिमही आजवर मला लागलेले नाही, फक्त पाणी... त्यामुळे ट्रेकमध्येही माझी विनासायास रोज दाढी होते. (ट्रेकच्या दाढीचे ब्लेड मात्र कमी जाते.. कारण माहित नाही)
वडील सैन्यात होते. त्यांचीच रोज दाढी करण्याची सवय उचललेय!! Happy

सकाळी सकाळी उठण अन दाढी करण .... अजिबात न कराव्याशा वाटणार्‍या दोन गोष्टी एकदम शीर्षकात टाकल्यात आधीवाचायला क्लिक करू का नको असच वाटल. दाढी सारख्या क्षुल्लक बाबी करता हजारो रुपयांची रेझर्स / शेव्हेर्स मी तरी फक्त कुणी मला गिफ्ट म्हनून दिली तरच वापरीन. Happy

आठवड्यातून दोन वेळा दाढी करतो आता. ट्विन ब्लेड नी होत नाही बरोबर. साधे ब्लेडच वापरतो. जास्त दाढी केली की गालाची कातडी खराब होते.

मायला मी तर वेगळाच फंडा वापरतो.. सिंगल ब्लेडने एकदा दाढी करुन घ्यायची आणि त्यावर एकदा ट्विन ब्लेड फिरवायचा गुळगुळीतपणा येण्यासाठी. दोन्ही ब्लेड मिळून सहा महिने तरी आरामात जातात.. Lol

अर्थात मी आठवड्यातून एकदाच दाढी करतो, हा भाग अलहिदा..

पिंगू अगदी अगदी मी पण हेच करतो....
खूप दाढी वाढली असेल तर आधी फावड्याने खुरपणी करून मैदान बरेचशे साफ करून घ्यायचे आणि मग जिलेट माख ३ वापरून फिनिशिंग टच द्यायचा...
जास्त दाढीवर डायरेक्ट जिलेट वापरले तर त्यात अडकेलेले केस काढायला वैताग येतो आणि ब्लेडची पण लवकर वाट लागते...म्हणून हा द्राविडी प्राणायाम...
पण माख ३ खरोखरच स्मूद आहे...कितीही निष्काळजीपणे दाढी केली तरी कापत नाही.
अंघोळीच्या दरम्यान दाढी करून एकदा पाहीली पाहीजे...

अंघोळीच्या दरम्यान दाढी करून एकदा पाहीली पाहीजे...
<<
हिवाळा संपल्यावर करा. हुडहुडी भरेल अन सर्दी होईल फुकटात.

कुणी ट्रिमर (मराठीत काय शब्द ते मात्र विचारु नका) वापरतं का? त्यात ही काही मॅनुअल / आटो अस काही असतं का?
कुठला ब्रांड चांगला ते हि सुचवा.

अडीज आठवड्यातून एकदाच दाढी करतो. त्यामुळे बाहेरच करतो. ब्लेडची भानगडच नाही. सलूनवाले काय ते बघून घेतात.

अबे असे कुठे म्हणालो करता येत नाही. बारावीचा रिझल्ट घ्यायला जाताना नापास होणार हे माहीत असूनही माझी पहिली दाढी स्वताच्या हाताने करून गेलेलो, आणि त्यानंतर कित्येक केल्यात.

पण हल्ली मी दाढी दोन किंवा तीन आठवड्याने म्हणजे सरासरी अडीज आठवड्याने एखाद्या विकांताला करतो जी बरीच वाढली असल्याने बाहेरच करणे पसंद करतो.

बाकी शेविंग किट आहे घरात पडून, दर वर्ष दोन वर्षाने त्यातील क्रिम किंवा आफ्टरशेव लोशनची एक्स्पायरी डेट मरत असते आणि बायको मला त्यावरून शिव्या घालत असते.

समस्त माबोमहिलाना प्रतिसादातून कटाप करण्याचा कट घातलाय या धाग्याने Lol

electric shaver का वापरत नाहि ? त्याने वरचेवर केली तर problem येत नाहि. wet/dry वाले शॉवरमधे वापरता येतात.

दर वर्ष दोन वर्षाने त्यातील क्रिम किंवा आफ्टरशेव लोशनची एक्स्पायरी डेट मरत असते आणि बायको मला त्यावरून शिव्या घालत असते.
<<

फार्फार वर्षांपूर्वी ^^असा शेव्हिंग "केक" मिळायचा. + दाढीचा ब्रश. याला एक्ष्पायरी नसते.
आफ्टरशेव्ह म्हणून ब्र्यांडी अथवा व्हिस्की वाप्रत चला. त्यांनादेखिल एक्ष्पायरी नसते. उलट जितकी जुनी तितकी चांगली. मस्तपैकी एक चिंटी शेव्हिंग किट मधे ठेवत चला.

अर्थात बायको त्यावरूनही शिव्या घालेलच, बायको आहे ती.. नाविलाज! Wink

ही ही ही!!!

मी गेले २ वर्शे फिलिप्स चं ईलेक्ट्रीक क्लोज शेवर वापरतोय्. काही अडचण नाही. आधी ते गर्र्र फिरणारे ब्लेड्स पाहून भिती होती आता टेक्निक माहीत झाल्यानं मस्त पैकी बीन्पाण्याची करता येते (दाढी, स्वतःची) ... Biggrin

नोरल्को बेस्ट. झीरो मेंटेनन्स, काळ, वेळ, स्थळ यांचं बंधन नाहि. रेझरच्या थोबाडीत मारेल अशी स्मुथ दाढी; ती हि विना पाणी, जेल, क्रीम.

मी पण आताच वाचला हा लेख. . छान माहीती.
तो शेविंग केक आमचे आजोबा वापरायचे. . आज काल शेविंग केक वापरणं आऊट ऑफ फ्याशन झालय का? दुकानात सुद्धा दिसत नाहीत.
जिलेट चे कार्ट्रिज मला पण २० दिवसांच्या वर जात नाहीत. त्यापेक्षा जिलेट प्रेस्टो मस्त आहे. ४ रु. पासून सुरवात झाली त्याची.
आता १५ रु. मिळतं. आठवडा भर सहज जातं.

इण्ड्यातल्या लोकांची गालाची चामडी काळी पडते बा त्या इलेक्ट्रिक शेविंग मशीणमुळे. गोर्‍या लोकांचं बरंय. आम्रिकेत जाऊन लोक उजळतात असा अनुभव आहे, Wink तेवा आम्रविकावासियांनी आटुकमाटुक यंत्रे वापरावीत बिन्धास.

शिवाय त्या मशिनीची ब्लेडं पण बदलायला लागतात असं ऐकून आहे.

(रच्याकने: शिरिष कणेकरांचे उजळण्याचे अनुभव आठवले, नवराबायकोच्या भांडणात नवरा त्याच्या खानदानातील सर्वच कसे उजळ व गोरे आहेत हे सांगताना शेवटी सांगतो : "आमच्याकडे एक म्हैस होती. ति पुढेपुढे इतकी उजळली, की तिला चक्क बैलाने प्रपोज केले.")

>> शिवाय त्या मशिनीची ब्लेडं पण बदलायला लागतात असं ऐकून आहे <<
हो, पण ओवरआॅल काॅस्ट रेझरपेक्शा स्वस्त पडते. कन्विनियंस इज बोनस. तुमी आप्रेसन करता करता हजामत पन करु शक्ता... सौताचीच हो... Happy

इले. शेवर रेझर सारखा वापरला (फावडा मारल्यासारखा) तर इंड्याच नाय आफ्रीकेतल्या लोकांचीहि थोबाडं काळी पडतील. Wink

लिट्टल नजेट ऑफ इंटरेस्टिंग फॅक्ट्स + ऑटोरुब्रिफिकेशन (अर्थात, स्वतःची लाल करणे) :

ऑपरेशन करण्याच्या आधी जो भाग कापायचा आहे, अथवा फाटलेला शिवायचा आहे, त्याची हजामत करायला शिकवले जाते. मेडिकल कॉलेजात या कामासाठी स्पेशल बार्बर्स (हजाम/न्हावी) असतात, अन त्या १०००-२००० बेड्सच्या हॉस्पिटलातील रोज होणार्‍या २-अडीचशे ऑपरेशन साठीच्या स्त्री-पुरुष पेशंटांचे हात/पाय/डोकी/व इतरही सर्वच अवयव वस्तरा वापरून गुळगुळीत भादरणे हे त्यांचे काम असते.

त्याच कॉलेजात शिकून खासगी दुकान सुरू केल्यावर वॉर्डबॉय/आया इ.च्या उदा. 'भांडे देण्याच्या' वा इतरही महत्वाच्या स्किल्स इतकेच हे हजामतीचे स्किल सर्जनजवळ असणे जरूरीचे असते. कालांतराने ओटी असिस्टंट म्हणून नोकरीस लागलेला व्यक्ती हे शिकून घेतो, पण तोपर्यंत, प्राचीन काळाप्रमाणेच, सर्जन्स अँड बार्बर्स, डू कॉम्पीट फॉर द स्किल. ब्रॅग करायचे, तर मला अगदी वस्तर्‍याला दगडावर धार लावणे अन चामडी पट्ट्यावर स्ट्रॉपिंग करणे हे देखिल येते.

तेव्हा, ऑपरेशनच्या दरम्यान कित्येकदा, हातातल्या सर्जिकल ब्लेडनेच, भूल दिलेल्या पेशंटचा योग्य तो पार्ट, अगदी दुखरे गळू असले तरी, भादरण्याची सवय मला अन इतरही सर्वच सर्जन्सना असते.

कुणा मूर्ख सर्जनने स्वतःची हजामत ऑपरेशन करताना मधेच करायचा प्रयत्न केला, तर कृपया आपापल्या देवाची प्रार्थना करा, की ऑपरेशन टेबलावर झोपलेली व्यक्ती तुम्ही नाही आहात..

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो Wink

दुकानभौ,
भांडी देण्याबद्दल लिहिले आहे.
जास्त इस्कटून सांगायला हवे असेल, तर इच्चारा. सम़वून सांगने इज माय स्पेशाल्टी.

छान

इल्बीस दादा, रागवु नका. भ्या वाटत. पन तुम्हि लिहलेल कळतच नाहि. आनि वाचताना रामसे बन्धु च्या पिक्चरमधला हवेलितला नोकर कसा बोल्तो त्या टोनमधे ऐकु येतं लिहलेलं. कायपन नाहि कळल.

सकाळि सकाळि नाश्ता करताना, दात घासताना, चहा पिताना आनि अजुन काय राय्हल असल तर, अस लिवा म्हन्ल व्हतं. याले काय म्हुन भान्डि लागुन रायले बे ?

अतिशय सुन्दर माहितीपुर्ण धागा. वाचता वाचता सेन्टी होउन माझा शेविन्ग कीट चा डबा डोळे भरून पाहून आलो.

Pages