सकाळी सकाळी उठून दाढी करताना..

Submitted by इब्लिस on 16 August, 2012 - 02:28

ब्लेड जुनं झालंय म्हणून नवी कार्ट्रीज काढली.

Image and video hosting by TinyPic

पिवळ्या गोलात लिहिलेलं वाचून पुन्हा एकदा विचारात पडलो. २ महिने चालेल म्हटलेलं ब्लेड सालं आपल्याला १५ दिवसात ओरबाडायला का लागतं आहे? ९०-९५ रुपयांना १ मिळणरं हे ब्लेड २ महिने नाही तरी दीड महिना तरी 'स्मूथ' चालेल असा विचार करून घेतलेलं असतं.

चुकून म्हणा किंवा रिकामा वेळ होता म्हणून म्हणा, त्या २ महिने वाल्या चित्राकडे पहाताना त्या MONTHS* च्या पुढे लिहिलेला तो ष्टार * दिसला. असे अ‍ॅस्टेरिक्स असले की काहीतरी लोचा त्यासोबत असतोच. म्हणून त्या खोक्याची मागची बाजू वाचायला घेतली. तर हे दिसले :

Image and video hosting by TinyPic

जिलेटच्या वेबसाईटवर गेलो, तिथे त्याच सर्वेनुसार अ‍ॅव्हरेज ७.३ अठवडे हे रेझर चालेल असे आहे. म्हणजे त्यांच्या हिशोबाने केले, तरीही २ महिने नाहीच.

तात्पर्य काय? एकतर अठवड्यातून अडीच वेळाच दाढी करा, अन असे साडेसात अठवडेच करा.

तर प्रश्न असे:

यापेक्षा साधे ब्लेड काय वाईट? २ रुपयांत ४ वेळा दाढी होते. अन स्वच्छ करायलाही सोयीचे असते..
तुम्ही अठवड्यातून अडीच वेळा दाढी करता की जास्त?
अशा प्रकारच्या फसव्या जाहिराती तुम्हाला कुठे आढळ्ल्यात का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ धाग्यातली माहिती आणि प्रतिक्रियां मधली चर्चा दोन्ही उपयुक्त ! धागा निघाला तेव्हाच प्रतिक्रिया द्यायची होती, ती राहून गेली. थोडे स्वानुभवाचे बोल.
डिसपोजेबल ट्वीन ब्लेड्स आणि पारंपारिक फावडं दोन्ही वापरुन झाली. फावड्याचा फायदा म्हणजे, कल्ले आणि मिशांना हवा तो शेप देणे फार सोयीचे असतं, तेच ट्वीन ब्लेड्स मुळे अवघड पडतं. फावडं आणि ट्वीन ब्लेड दोन्हीमधे वापरताना थोडा फरक करणं गालाच्या तब्येतीसाठी चांगलं असतं. फावडं फार नाजूक हाताने वापरावं लागतं नाहीतर दिवस भर गालफाडं जळजळत राहतात. ट्वीन ब्लेड्स मधे तो एक फायदा असतो, जरा दाब देऊन वापरलं तरंच खरंतर दाढी नीट होते, आणि त्यात जळजळायची-कापायची शक्यता सुद्धा कमी असते.
प्रथम गरम पाण्याने चेहरा धुवून त्यावर क्रीमचे ठिपके लावून ब्रश ने थोबाड फेसवून घेणे. मग एक सरळ हात (म्हणजे कल्ल्यांच्या खालून खालच्या दिशेने गळ्यापर्यंत ) , मग परत एकदा आडवा हात (म्हणजे कानापासून मिशीकडे). झालं.. मग थंड पाण्याने थोबाड खंगाळून घेणे, फॉलोड बाय, डायल्यूटेड डेटॉल, फॉलोड बाय आंघोळ.. असं एक दिवसाआड करणे. उलटा हात मारणे शक्यतो टाळतो. इलेक्ट्रिक शेवर पण वापरुन झाले, पण त्यात कंपल्सरी उलटा हातच मारावा लागत असल्याने अगदीच कधीतरी, सुट्टीच्या दिवशी वगैरे बिन पाण्याची दाढी करायची हुक्की आली, तर वापरणं होतं.

Pages