महाराजांचा दरबार - पहिला वहिला वृत्तान्त

Submitted by Kiran.. on 12 December, 2012 - 21:58

"कोण आहे रे तिकडे "
" महाराज ! मी आहे "
"कोण प्रधानजी ! काय खबर राज्याची ?"
" महाराज सगळं व्यवस्थित चालू आहे. मुलांचे संगोपन, व्यायाम आणि आहार, वजन कसे उतरवले, कथा-कविता-ललित आणि दंगल नेहमीप्रमाणेच चालू आहे "
" दंगल आणि आमच्या राज्यात ?"
" महाराज टेण्शन घेऊ नये. ही आपली नेहमीची दंगल आहे. तुमच्या नियंत्रणाबाहेरची "
"अस्सं ! कसली दंगल म्हणायची ही ?"
"महाराज ! महिलांसाठी ड्रेस कोड वरून दंगल चाललीय "
" काय म्हणतात पार्ट्या ?"
" महाराज ! दूर देशीच्या एका राजाने म्हणे कॉलेजातल्या मुलींनी जीन्स घालू नये असा फतवा काढायचं मान्य केलं. कारण काय तर गुन्ह्यांत वाढ होते "
" मग बरोबरच केलं कि. महिलांनी वाटेल ते कपडे का घालावेत ? "
"राणीसरकार !"
" हु बु बु बु...कुठेय कुठेय "
" प्रधानजी ! आम्हाला घाबरवताय तुम्ही !"
" नाही महाराज ! राणीसरकारांचं मत विचारलं का याबाबतीत असं विचारत होतो?"
" प्रधानजी ! आमची हिंमत झाली नाही "
" महाराज ! राणीसरकार या आदेशाच्या सख्त खिलाफ आहेत "
" प्रधानजी............. हे तुम्हाला कसं कळालं ?"
" महाराज ! राणीसरकारही आपल्या प्रजाच आहेत आणि प्रजेची खबर ठेवणं हे आपला निष्टावान सेवक म्हणून आमचं कामच आहे "
" मोगॅम्बो खूष हुआ ! "
" प्रधानजी आणखी काय खबरबात ?"
" राज्यातून हाकललेले काही कवी नकली दाढी मिशा लावून रस्तोरस्ती नवकाव्य वाचत फिरत आहेत. काही नागरिक त्यांना खरेच नवकवी समजून दगड मारत आहेत "
"त्यांना अटक करा. आणखी काय खबर ?"
" काही कवी स्त्री च्या वेषात मुग्ध आणि लाडीक कविता करत फिरत आहेत "
" हम्म ! त्यांना आमच्याकडे पाठवून द्या. त्यांच्याबाबतीत वेगळा विचार करण्यात येईल "
" आणखी काय खबर ?"
" महाराज ! महत्वाचं सगळं सांगून झालं. "
" अस्स ! प्रधानजी नाऊ यू कॅन गो ! दरबार बरखास्तीची घोषणा करा. पुढच्या वेळी जरा बारीक खबरा काढा "
" जी महाराज ! तर लोकहो दरबार आता बरखास्त होत आहे.पुन्हा भेटूयात पुढच्या वेळी, असंच केव्हातरी "

दवंडी : इथून पुढे दरबाराचा वृ आपल्या भेटीला देण्यात येईल हो S S S S S

क्रमश :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दरबार भरला काय लग्गेच संपला पण? हे काय बरा नाही हा. हे म्हणजे पेढा दाखवायचा, हातावर ठेवल्यासारखा करायचं आणि काढून घ्यायचा. अरे चव रेंगाळू तर दे जीभेवर

छान आहे ह्या पुढचा दरबार जीभेला तृप्त करणारा आणि पोटभरीचा असुदे Proud

" काही कवी स्त्री च्या वेषात मुग्ध आणि लाडीक कविता करत फिरत आहेत " >>>> तेरा इमोशनल अत्याचार
>>
Rofl

किरण सुरुवात मस्त आहे