हाँगकाँग करंसीबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by साती on 10 December, 2012 - 01:07

आमच्या ह्यांचा आयुष्यात पहिला परदेश प्रवास, तो ही एकट्याने हाँगकाँगला होणार आहे.
विसा ऑन अरायवल आहे. कॉन्फरसमध्ये भाग घ्यायला जानार असल्याने डेलिगेटसच्या चार्जमध्ये राहाण्याखाण्याची व्यवस्था आहे. एअर लाईन बुकिंगही झालंय.
मुख्य प्रश्न आहे तो करंसीचा. किती आणि कशी करंसी घेऊन जावी. इथलं डेबिट कार्ड तिथे चालेल का?
आमच्या बँकची शाखा तिथे आहे पण तिकडे हे कार्ड कसं चालतं? म्हणजे समजा आपण तिकडे एटीएम मधुन पैसे काढले तर जेवढ्यास तेवढे पैसे मिळतात की कमिशन घेतात.
इथून किती पैसे न्यावे? कोणत्या चलनात? कोणी म्हणतं यू एस डॉलर न्या कोणी म्हणतं हाँगकाँग डॉलर न्या.
फक्त चार दिवस स्टे आणि फिरायला फक्त काँन्फरन्स संपल्यावरच संध्याकाळचे काही तास मिळणार.शॉपिंग जास्त करायचं नाही . इलेक्ट्रॉनिक्स काहीच आणायचे नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. International Debit / credit कार्ड असेल तर कुठेही चालेल. पैसेही काढता येतील पण त्यावर कमीशन / कन्वर्जन चार्जेस लागतात व ते वेगळे दिसतीलही.
२. मुंबई एअरपोर्टवर थॉमस कुकचे दुकान आहे, तिथे चलन बदलून हाँगकाँगचे चलन HKD घ्यायचे. तसेच SBI चे काउंटर पण आहे, पण त्यांचे कमिशन जास्त आहे, त्यामूळे थॉमस कुक परवडते. HKD नेलेलीच बरी असे वाटते.
३. किती न्यावे हे वैयक्तीक आवडी निवडीवर आहे पण चार दिवसांसाठी (जेवण व हॉटेल खर्च वगळता) वर ५००० HKD असू द्यावेत.
4.International कार्ड असेल तर ऐनवेळी जास्तीची रक्कम नक्कीच त्या कार्डावर खर्च करता येते. ( खरेदी) आणि कमिशन खूप जास्त असते असेही नाही. ऐनवेळी मदतच होईल.

धन्यवाद केदार.
मुंबईहूनच प्रयाण आहे त्यामुळे थॉमस कूकच बरे पडेल.
किंवा लोकल एजंट हैद्राबादेत आहे. कुठे हे दर ऑनलाईन कंपेअर करता येतील का? म्हणजे एजंट , थॉमस कुक आणि बँकेतले दर?

साती,
देशातून बाहेर किती परदेशी चलन नेता येते त्यावर बंधने आहेत. एअरपोर्ट्वर केवळ १०,००० रुपयेच बदलून घेता येतात. ( हे नियम बदलत असतात.) कमिशन कमी असते पण त्यांचा फायदा विनिमय दरातच लपवलेला असतो.
थॉमस कूकचेच प्रीलोडेड कार्ड मिळते. त्यात ते रक्कम भरुन देतात. अर्थात ती त्यांच्याकडूनच खरेदी करावी लागते. प्रीपेड टेलिफोन कार्डही मिळते. दोघांचा पासपोर्ट तयार असेल तर दोघेही जा. व्हीसा सगळ्यांनाच मिळतो.

आधी यू एस डी घेतले आणि तिथे बदलून घेतले तर दोनवेळा कमिशन द्यावे लागते त्यापेक्षा एच डी घेतलेलेच चांगले.

तसे खरेदीसाठी आता भारताबाहेर काही उरले नाही. वेळही नसणार. काही भारतीय दुकानात भारतीय रुपये पण चालण्याची शक्यता आहे. ( सिंगापूर / दुबई मधे चालतात. )

कधी जाणार आहेत ? महिनाभर वेळ असेल तर मी येतोय Happy आपली वर्षू तिथे आहे.

स्टेट बँकेचे विश्व यात्रा कार्ड म्हणून आहे. ते भारतातून घेता येतं. `तुमच्या तिकिटाची आणि पासपोर्टाची फोटोकॉपी असे कागद लागतात आणि फॉर्म भरून दिला की ते कार्ड मिळतं. त्यावर भारतीय चलनात रक्कम भरता येते. ते क्रेडिट कार्डाप्रमाणे वापरून खरेदी करता येते. त्याला कुठलाही अधिभार लागत नाही. तसंच, हे कार्ड वापरून परदेशांतील बहुतांश एटीएमवर पैसे काढता येतात. पण अशा पैसे काढण्याला पर ट्रँझॅक्शन काही चार्ज लागतो. (माझ्या माहितीप्रमाणे पावणेदोन युरो!) हे दोन्ही व्यवहार स्थानिक चलनातच होतात. ते ऑनलाईन ट्रॅक करता येतं आणि केलेल्या प्रत्येक ट्रँझॅक्शनाचा एसएमएस तुम्ही दिलेल्या नंबरावर (भारतीय!) येतो, त्यामुळे अतिशय सुरक्षित आहे. कॅश बाळगायची नसेल तर चांगला पर्याय आहे. माझ्याकडचं कार्ड आतापर्यंत यशस्वीरित्या थायलंड, मलेशिया, सिंगापूर येथे वापरले आहे.

अधिक माहिती येथे मिळू शकेल.

तुम्ही सध्या कुठे रहाता? तिकडे थॉमस कुक आहे का? असल्यास पास्पोर्ट दाखवुन पैसे घेवुन ठेवा. तुम्हाला खरेदीला लागतिल. साधारण ३००० हॉ. डॉ. पुरतिल. एखादे इंटर नॅशनल क्रेडिट कार्ड असेल तर उत्तम. हाँगकाँग मधे मजबुत खरेदी आहे. लहान मुलांची तर खुपच. तसेच परत येताना एअर पोर्ट वर ही आपसुक खरेदी होइलच.

ही घ्या थोमस कुक ची लिंक. त्यांना विचारुन ज्या दिवशी बेस्ट रेट असेल त्या दिवशी करंसी घ्या. आपल्या एअर पोर्ट वर खुप महाग पडते. डायरेक्ट हाँगकाँग डॉलर्सच घ्या.

http://www.thomascook.in/tcportal/px/tcportal/forex/fxonlineapply.do;jse...

आजचा रेट रु. ७.८० आहे. आर्थात प्रत्यक्ष बोलुन पहा. फिरोझ फ्रामरोझ पण खुप चांगला रेट देते

http://pherozeframroze.com/rate-list.aspx

त्यांचा आजचा रेट रु. ७.६० आहे.

त्यांचा ही मुंबई विमान्तळावर काउंटर आहे.

HKD मिळत असतील तर ते आधिच तुमच्या बँकेत / इतर मनी एक्शेंज मधुन घ्या, एअरपोर्टवर वाईट रेट मिळतो. USD घेउन गेलात तर दोनदा कमिशन द्यायला लागेल ( एकदा re to $ आणि परत $ to HKD) , त्या पेक्षा डेबिट कार्ड ने परदेशात पैसे विथ्ड्रा करणे जास्त स्वस्त पडते, ट्रान्झॅक्शन करताना ATM वर एक्क्चेंज रेट चा चॉईस ही मिळतो - उदा , अ‍ॅक्वारयर बँकचा रेट , ईश्युअर बँकेच्या रेट्पेक्षा वेगळा असु शकतो आणि त्यात आपल्याला फायदेशीर रेट अ‍ॅक्सेप्ट करायचा.
क्रेडीट कार्डवर सुद्धा एक्स्चेंज रेट योग्य मिळतो, त्यामुळे उगाचच खुप फॉरेन करंसी नेण्याची गरज नाही.

सगळ्याना धन्यवाद.
शेवटी लोकल एजंटकडून हाँगकाँग डॉलर मागवावे असेच ठरले. इथल्या मोकिमी नी दिलेल्या दुसर्या लिंकवाल्यांशी फोनवर बोलून रेट कन्फर्म केला. आज ७.५० ला देतो म्हणाले.