चिकन पतियाळा

Submitted by स्वप्ना_राज on 8 December, 2012 - 00:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तेल, जिरे, लांब पातळ चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरून टोमेटो, तिखट, धणे पावडर, हळद, मीठ, काजूपेस्ट, चिकन ब्रेस्टचे लांब तुकडे, कसुरी मेथी, गरम मसाला, वेलची पूड, क्रीम, २ अंड्यांचा पांढरा भाग, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

कढईत ४ चमचे तेल तापवा. त्यात १ चमचा जिरे घाला, ते तडतडल्यावर कांदा घाला, तो ब्राऊन होईतो परता.

मग आलं लसूण पेस्ट, २ मोठे चमचे बारीक चिरून टोमेटो घाला. परता.

टोमेटो शिजले की तिखट, धणे पावडर, हळद, मीठ घाला. परता.

काजूपेस्ट घाला. परता. चिकन ब्रेस्टचे लांब तुकडे घाला.

शिजत आलं की कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला, वेलची पूड घाला. क्रीम घाला.

२ अंड्यांचा पांढरा भाग फेस येईपर्यंत फेटा. pan मध्ये तेल घालून त्यावर घाला. दोन्ही बाजूने शिजवून घ्या.

चिकनच्या मिश्रणावर टाका (शेफने अख्खं टाकलं होतं. मी सर्व्ह करतेवेळी बनवून तुकडे करून टाकलं.). वरून कोथिंबीर घाला.

माहितीचा स्रोत: 
टर्बन तडका, फूड फूड चेनेल, १४ ऑगस्ट २०१२
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकन पतियाळा एकदा खाल्लेले. मोठ्या चौकोनी ऑम्लेटला आतुन खुप सारी हिरवी चटणी लावलेली आणि त्यात चिकन लपेटलेले. मस्त लागलेले. आता वरच्या रेसिपीने करुन पाहाण्यात येईल Happy

तेल, जिरे, लांब पातळ चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरून टोमेटो, तिखट, धणे पावडर, हळद, मीठ, काजूपेस्ट, चिकन ब्रेस्टचे लांब तुकडे, कसुरी मेथी, गरम मसाला, वेलची पूड, क्रीम, कोथिंबीर>>>>>
प्रमाण दिले नाहि...

चिकन पतियाळा एकदा खाल्लेले. मोठ्या चौकोनी ऑम्लेटला आतुन खुप सारी हिरवी चटणी लावलेली आणि त्यात चिकन लपेटलेले>> +१
मी असं वांद्रेला खाल्लं होतं