रात्र चांदणी

Submitted by पाषाणभेद on 7 December, 2012 - 20:02

रात्र चांदणी

ही रात्र चांदणी वाटे कधी संपूच नाही
कोडे मिठीतले वाटे कधी सुटूच नाही

शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले
बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले?
मुक्या शब्दांचे गीत कधी झाले
ऐकतांना कळले नाही

आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे
सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे
वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली
कुठे ते कळले नाही

प्रीतीच्या फुलांनी आसमंत धूंद झाला
वार्‍यासही आवडूनी तो वाहवत गेला
तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले
कधी कळले नाही

- पाषाणभेद

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्याकरणाच्या काही चुका जाणवल्या
संपूच नाही ,सुटूच नाही इथे भाषेचा वापर मात्र अवडला

बाकी ठीक वाटली

डायरीत अत्ताच डोकावून पाहिले तर ही कविता १९२७ च्या मे महिन्यात केली होती असे दिसले.
सुरुवातीच्या काळातील असल्याने तंत्र थोडे तंतरले असावे Wink

:दिवे: