आवाज

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

माझा आवाज हरवलाय असं कळल्यावर
ते सर्व गोंगाटवादी धावत आले.
त्यांच्या डोळ्यांत चिंता होती,
त्यांच्या आवाजात सहानुभूती होती.
मी काही बोलायच्या आतच त्यांनी
माझ्या आवाजाला शोधायला सुरूवात केली...
काहींनी माझ्या आवाजाला हाक दिली...
काहींना वाटलं की खरं तर माझा आवाज बोथट झालाय,
म्हणून त्यांनी शस्त्रे आणली त्यांच्याकडची...
माझ्या आवाजाला धार चढवायला.
काहींनी मला नव्या आवाजाची सवय लावायचा प्रयत्न सुरू केला,
कारण त्यांना काळजी होती, ह्याला शांततेचं व्यसन लागलं तर...
माझा आवाज संपला म्हणजे मी मृत आहे
असं समजून काहींनी शेवटची तयारी सुरू केली...
पण कशाचाच उपयोग झाला नाही.
शेवटी माझी कीव करत ते निघून गेले.

आता ते परत आलेत...
मात्र यावेळी जाब विचारायला अन्
त्यांच्या नजरेत आहे एक अगम्य भीती...
कारण इथल्या प्रत्येक शांततेत त्यांना
माझ्या त्या हरवलेल्या आवाजाचा वास येतोय...
अन् इथल्या प्रत्येक नव्या आवाजाच्या गर्भात
त्यांना माझ्या शांततेचा भास होतोय...
मी वाट बघतोय...
पाठीवर क्रूस ते कधी ठेवतायत याची.

विषय: 
प्रकार: 

सही! सुस्वागतम. सुरुवात छान झाली. आता येउ द्या जोरात.
'आवाज' कुणाचा? Happy

वा! उत्तम! Happy

दीपक
"Every heart has its secret which the world knows not."

स्लार्टी, आवडेश!! अजुन येउ द्यात.

धन्यवाद.

    ***
    असेच काही द्यावे घ्यावे
    दिला एकदा ताजा मरवा
    देता घेता त्यात मिसळला
    गंध मनातील त्याहून हिरवा
    - इंदिरा