स्वर्गाचे प्रवेशद्वार

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 December, 2012 - 01:13

मायबोलीवरील दिग्गज छायाचित्रकारांनी मुन्नारची एकाहून एक सुंदर छायाचित्रे आधीच टाकलेली आहेत. मी अजुन वेगळे काय देणार?

तरीही माझ्या नजरेतून एकदा मला भावलेलं मुन्नार पाहायला काय हरकत आहे... Happy

प्रचि १
सकाळच्या वेळी पाण्यावर साचलेलं अलवार धुकं...

प्रचि २
छाया-प्रकाशाचा खेळ आणि पाण्यावर उमटलेलं प्रतिबिंब..

प्रचि ३
जिथवर नजर पोचेल तिथवर पसरलेला देखणा निसर्ग

प्रचि ४
कुणा नतद्र्ष्टाने हिरवाईला छेद देत मध्येच हा रस्ता पाडला असेल ?

प्रचि ५
मुन्नारच्या ढगाळ वातावरणात आकस्मिकपणे दर्शन देते झालेले श्रीयुत भास्करराव तेजस्वी !

प्रचि ६
गुलाबाच्या पानावर अंग-अंग सावरून बसलेलं हळुवार, लाजरं दंव...

प्रचि ७
ज्याच्या एका स्पर्शासाठी ते दंवही आसुसलंय तो पुष्पराज...

प्रचि ८
कुठे जावू? सगळीकडे भरपूर खाऊ दिसतोय...

प्रचि ९
पुरे झालं त्या गुलाबोचं कौतुक...

प्रचि १०
आत्ता बोला....,

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
आम्ही पण आहोत म्हटलं रांगेत...

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
रंग नसेल माझ्याकडे हिरवा, पण देखणेपणात मीही कमी नाही..

प्रचि १७
आवाज कुणाचा?

प्रचि १८
इथेच कुठेतरी स्वर्गाचे प्रवेशद्वार आहे म्हणे... Happy

प्रचि १९

प्रचि २०

सद्ध्या एवढेच पुरे...
पुढच्या लेखात अजुन काही छायाचित्रे घेवून येइन तोपर्यंत ....

(मी क्रमशः म्हणलेलं नाहीये Lol )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे फोटो जहबहरीही! आवाज कुणाचा - जास्त लक्षात राहीला.
कुणा नतद्र्ष्टाने हिरवाईला छेद देत मध्येच हा रस्ता पाडला असेल ? >>> तो 'स्वर्गा'ला जायचा रस्ता दिसतोय! Wink
(मी क्रमशः म्हणलेलं नाहीये हाहा ) >>>> जखमेवर मीठ Sad

स्वर्गाचे प्रवेशद्वार
>>
अगदी अगदी
केरळात मला असच वाटत होतं
आज स्वर्गात जाते की उद्या
हे मुन्नार मलाच का नाही आवडलं देव जाणे

इथेच कुठेतरी स्वर्गाचे प्रवेशद्वार आहे म्हणे...

>> हे असं खरंच आहे? की तुझी प्रतिभाशक्ति ओसंडून वाहतेय? Wink

मुन्नार.... मुन्नार...!!!
मन प्रसन्न होऊन परतलं नाही तरच नवल... निसर्गाचं फारच गोंडस रुपडं मिळतं इथं पहायला....

एकसे एक प्रचि, विकू....

आनंदयात्री Lol
नाही ते खरच तसं आहे. कदाचित आम्ही संध्याप्रकाशाच्या वेळी नेमके तिथे पोचलो होतो म्हणून नेमके रंग गवसले असावेत Wink

प्रिया...
तू मायबोलीवर आल्यापासून बरेच जण असंच म्हणताहेत Lol

धन्यवाद मंडळी !

Happy

धन्यवाद मंडळी !
अतुलनीय...
१९ आणि २० च्या बाबतीत मी खरंच खुप नशीबवान होतो. दोन्ही फोटो बघीतले तर लक्षात येइल त्यातला एक डाव्या बाजुचा (१९) आणि दुसरा उजव्या बाजुचा (२०) आहे. पण एकीकडे सावली आहे तर दुसरीकडे बर्‍यापैकी संध्याप्रकाश Happy
माझा मुर्खपणा असा झाला की पॅनो घ्यायचं डोक्यातच आलं नाही Sad

ऑसम!!! ब्यूटीफुल!!!

रिया.. तू विकु की नजरोंसे देख.. और क्या...

किंवा पुन्हा जाऊन स्वतःच प्रचिती घे परत !!! हाकानाका!!!!

Happy