Submitted by सुप्रिया जाधव. on 27 November, 2012 - 02:08
प्रीती निभावण्याची माझी त-हा निराळी
झाल्या प्रतारणेवर देते हसून टाळी
डोळ्यात डोकवूनी पाहू नका कुणीही
वसते अजून तेथे त्याची छबी गव्हाळी
फेसाळत्या मनाची बेभान लाट होते
ना पोर्णिमा तरीही भरते तिन्ही-त्रिकाळी
'विसरून जायचे' हे ठरण्यात रात्र जाते
हटकून याद येते त्याची पुन्हा सकाळी
याचे असो कि त्याचे, टिकते कुठे निरंतर
काळानुरूप घटते प्रेमातली नव्हाळी
दु:खास मांडताना वेष्टण हवे सुखाचे
नुसत्याच वेदनेची होते इथे टवाळी
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचे दोन आवडले
शेवटचे दोन आवडले
वा वा, दु:खास मांडताना
वा वा,
दु:खास मांडताना वेष्टण हवे सुखाचे
नुसत्याच वेदनेची होते इथे टवाळी - सुंदर
बेभान की बेभाम , माहीत नाही.
डोळ्यात डोकवूनी पाहू नका कुणीही
वसते अजून तेथे त्याची छबी गव्हाळी
याचे असो कि त्याचे, टिकते कुठे निरंतर
काळानुरूप घटते प्रेमातली नव्हाळी<<< आवडले
गझल आवडली.
(सकाळी हा काफिया कसा निभावला जात आहे या विचारात)
सुंदर गझल. झाल्या
सुंदर गझल.
झाल्या प्रतारणेऐवजी ''केल्या'' प्रतारणेवर असे वाचून पाहिले.
फेसाळत्या मनाची बेभान लाट होते
ना पोर्णिमा तरीही भरते तिन्ही-त्रिकाळी.......... इथे भरते ऐवजी ''भरती'' योग्य वाटेलसे वाटतेय.
शुभेच्छा.
सुंदर!
सुंदर!
मतला आणि शेवटचा शेर
मतला आणि शेवटचा शेर आवडले.
काफिये मस्त वाटले.
मतला आणि शेवटचा शेर... अ फ ला
मतला आणि शेवटचा शेर... अ फ ला तू न !!
सुंदर!
सुंदर!
आनंदयात्रीजी बेफिजी,(विशेष) न
आनंदयात्रीजी
)
बेफिजी,(विशेष)
नतद्रष्ट,
विदिपा,
रणजित,
शोभा,
डॉ. साहेब ( विचार करतेय
मनःपुर्वक आभार !
-सुप्रिया.
व्वा!!
व्वा!!
खूप आवडली "री" .........ओढत
खूप आवडली
"री" .........ओढत नाहीये ; पण वाचतावाचता मलाही काही जागी बदल आवश्यक वाटले
घेते ऐवजी रात्री केले तर बहुधा काफिया निभावला जाईल
विसरून जायचे हे ठरवून रोज रात्री ......... (रू दीर्घ हवा )
हटकून याद येते त्याची पुन्हा सकाळी
विसरून ठरवून हटकून असे स्वतत्रपणे काफियासारखीच मजा देणारे शब्द आहेतच यात असा विचार करून येते ला काफियासारखा असलेला घेते कट केला.........सकाळीला पूर्ण कॉन्ट्रा असा रात्री हा शब्द मधे बसवला
अशाप्रकारे काही बदल सुचले पण नको..आवरतो ..... कुणीतरी म्हटलेच आहे आवरावे लागते ..सावरावे लागते वगैरे
गव्हाळी शेर सर्वोत्तम....दुसरी ओळ जाम जाम आवडली प्रामाणिक शेर वाटला
माझा एक मिसरा होता <<<<<<तीच
माझा एक मिसरा होता <<<<<<तीच स्वप्ने झोपताना तीच मग पुन्हा सकाळी>>> तो आठवला
मस्तच !!
मस्तच !!
<<<<(रू दीर्घ हवा )>>>> कसा
<<<<(रू दीर्घ हवा )>>>>
कसा टाईपायचा तो ?
'सकाळी' त बदल केला अन तुमचा प्रतिसाद वाचला
धन्यवाद वैवकु.
झाड, मेधा आभार!
आता आहे त्यात ठरण्यात असा बदल
आता आहे त्यात ठरण्यात असा बदल मनातल्यामनात करून पाहिला ...........
'विसरुन जायचे' हे ठरण्यात रात्र जाते...
असो
आर् नन्तर लगेच डबलदा ओ टाईपा म्हणजे रू होईल
अवान्तर : मला हल्ली भारम्भार पर्याय सुचताहेत याचा अर्थ मी देवपूरकरान्चे 'पर्यायी' शिष्यत्व खरोखरच पत्करले आहे असास गैरसमज प्लीज् कोणी करून घेवू नका
अगदी छान.
अगदी छान.
सुन्दर ! दु:खास मांडताना
सुन्दर !
दु:खास मांडताना वेष्टण हवे सुखाचे
नुसत्याच वेदनेची होते इथे टवाळी<<<<<<<<
केवळ अप्रतिम ! लिखते रहो !!
वैवकु धन्स ! आंबा३, बिनधस्त
वैवकु धन्स !
आंबा३, बिनधस्त
धन्यवाद!
प्रीती निभावण्याची माझी त-हा
प्रीती निभावण्याची माझी त-हा निराळी
झाल्या प्रतारणेवर देते हसून टाळी
डोळ्यात डोकवूनी पाहू नका कुणीही
वसते अजून तेथे त्याची छबी गव्हाळी
विसरून जायचे' हे ठरण्यात रात्र जाते
हटकून याद येते त्याची पुन्हा सकाळी
याचे असो कि त्याचे, टिकते कुठे निरंतर
काळानुरूप घटते प्रेमातली नव्हाळी
-----------
हे शेर खूप आवडले
सुंदर..! शेवटचाही शेर मस्त..!
सुंदर..!
शेवटचाही शेर मस्त..!
वा... अतिशय सुंदर.
वा...
अतिशय सुंदर.
अश्विनी, जोशीजी, स्थितप्रज्ञ
अश्विनी, जोशीजी, स्थितप्रज्ञ ..
धन्यवाद!
अतिशयच आवडली.
अतिशयच आवडली.
दु:खास मांडताना वेष्टण हवे
दु:खास मांडताना वेष्टण हवे सुखाचे
नुसत्याच वेदनेची होते इथे टवाळी <<< आवडली >>>
काफिये छान आहेत
अमित, अरविंदजी धन्यवाद!
अमित, अरविंदजी धन्यवाद!
अख्खी गझल सुरेख आहे.. डोळ्यात
अख्खी गझल सुरेख आहे..
डोळ्यात डोकवूनी पाहू नका कुणीही
वसते अजून तेथे त्याची छबी गव्हाळी
फेसाळत्या मनाची बेभान लाट होते
ना पोर्णिमा तरीही भरते तिन्ही-त्रिकाळी ( डॉक्टर साहेबांनी सुचवलेला बदल ही आवडला)
व्वा...दोन्ही शेर सुरेख झाले आहेत..
विसरून जायचे' हे ठरण्यात रात्र जाते
हटकून याद येते त्याची पुन्हा सकाळी
हा ही मस्त आहे..
शुभेच्छा.
काही शेरांमधली सहजता फार
काही शेरांमधली सहजता फार भावली... सुरेख!
पुलेशु
डोळ्यात डोकवूनी पाहू नका
डोळ्यात डोकवूनी पाहू नका कुणीही
वसते अजून तेथे त्याची छबी गव्हाळी
अत्यंत सुंदर !
अरे वा. मस्त आहे गझल
अरे वा. मस्त आहे गझल सुप्रियाताई. शेवटचा शेर फारच भारि.
सुंदर.. शेवटचे तिन्ही सुरेखच.
सुंदर.. शेवटचे तिन्ही सुरेखच.
सुप्रिया जी नेहमीप्रमाणेच
सुप्रिया जी
नेहमीप्रमाणेच नितांत सुंदर !!!
मनातील उलघाल जेंव्हा शब्द रुपात उतरविणे हेच एक आव्हान असते तेंव्हा ती गझल रुपात आणणे म्हणजे
मनातील 'त्सुनामी' ची लाट फेसाळत येवून पायांना अलगद स्पर्शून जाणे होय.जणू तो स्पर्श सुखद असूनही
आठवाची वेदना देवून जातोच.
Pages