बँक अकाउंट - ३ महिन्यांत ट्रान्साक्शन न केल्यास दंड?

Submitted by मेधावि on 24 November, 2012 - 21:11

काल जनता सहकारी बँकेत गेले होते. पासबुक अपडेट करताना १०० रु. डेबिट अशी एन्ट्री दिसली. त्या ऑफिसरला कारण विचारले असता, ३ महिने ट्रान्झॅक्शन नसेल तर १०० रु दंड पडतो अशी माहीती मिळाली. हा नियम आम्हाला न कळवता अमलात कसा आणला असे विचारले असता, सर्व ग्राहकांना कळवणे अवघड आहे असे उत्तर मिळाले.
माझे काही प्रश्न
माझ्या मुद्दलावरचे जे व्याज खात्यात जमा होते ते ट्रान्झॅक्शन असु शकत नाही का?
बॅंकेनी एकतर्फी असा नियम करणे हे बरोबर आहे का?
नसेल तर ग्राहकांनी काय करायला हवे?
प्रत्येक नोकरदार माणसाच्या किमान ३-४ बँक्स असतात. (एफ डी किंवा सॅलरी अकाउंटच्या निमित्ताने ) तेव्हा अश्या प्रत्येक बँकेचा असा ३ महिन्याचा पाठपुरावा करणे हे एक अ‍ॅडीशनल काम होउन बसेल. आणि प्रत्येक बॅकेनी असा नियम केल्यास ग्राहकाने काय करावे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुद्दलावरचे जे व्याज खात्यात जमा होते ते ट्रान्झॅक्शन असु शकत नाही का? >>>> नाही.

हे सगळे फाईन प्रिंट मधे असते जे आपण कधिही वाचत नाही.

सुमेधाव्ही, हो माझ्या बाबांचे स्वतःच्या बँकेत (नोकरी करत असलेल्या) सॅलरी अक्क. मधुन असे पैसे २-३ वेळा गेल्यावर त्यांनी सरळ जाउन ते अका. क्लोज केले. रीटायर्ड माणुस असे दुसर्‍या गावी / ठीकाणी जाउन तर ट्रान्सॅक्शन करतच नाही Sad

हे सर्क्युलर पहा

रिझर्व्ह बँकेने इथे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारलेली माहिती दिलेली आहे.

We have advised banks vide our circular no. BC.34 dated August 22, 2008 that a savings as well as current account should be treated as inoperative/ dormant account, if there are no transactions in the account for over a period of two years.

In the context of granting greater functional autonomy to banks, operational freedom has been given to banks on all matters pertaining to banking transactions. Accordingly, with effect from September 7, 1999 banks have been given freedom to fix service charges for various types of services rendered by them. While fixing service charges, banks should ensure that the charges are reasonable and not out of line with the average cost of providing these services. In order to ensure transparency, banks have been advised to display and update on their websites the details of various service charges in a prescribed format.

को-ऑपरेटिव्ह बँकेने स्वायत्ततेच्या नावाखाली दोन वर्षांची मर्यादा तीन महिने केली आहे का? पहिल्या सर्क्युलरमध्येही रिझर्व्ह बँकेने दोन वर्षे असे सरळ न म्हणता deposit accounts which have not been operated upon over a period, say two years असे म्हटले आहे.

आपल्याच एका खात्यातून दुसर्‍या खात्यात नाममात्र रकमेचा (जसे शंभर रुपये) एक चेक दर तीन महिन्यांतून एकदा जमा करत रहा. दोन खात्यांमध्ये ट्रान्झॅक्शन होऊन जाईल.

फिक्स डिपॉझीटचे जमा झालेले व्याज 'ट्रान्झॅक्शन' म्हणुन समजले जाईल का?, १३जुलै ला मी काही रक्कम टर्म डिपॉझीटला ट्रान्सफर केली होती आणि ३०सप्टें ला अकाऊट्ला काही रक्कम टर्म डिपॉझीटचे व्याज म्हणुन जमा झालेय.... जाणकारानीं प्लिज खुलासा करावा.

आणि ते नवीन चेकबुक बद्दल पण काही सुरु आहे ना? जुने चेकबुक जमा करुन नवीन घ्यायचे आहे बँकेतुन बहुतेक. जुने चेक काही दिवसानी वापरता येणार नाही बहुतेक असे मी वाचले. सगळ्या बँकांना हे लागू आहे का? कोणाला माहिती असल्यास कृपया सांगावी.

प्रसिक , नाही चालणार
(vi) For the purpose of classifying an account as ‘inoperative’ both the type of transactions i.e. debit as well as credit transactions induced at the instance of customers as well as third party should be considered. However, the service charges levied by the bank or interest credited by the bank should not be considered.

सुमेधा, तीन महिने हा काळ अकाउंट नॉन्-ऑपरेटिव्ह ठरवण्यासाठी खूप कमी आहे. तुम्ही तक्रार करून पहा. पण सहकारी बँकांचा कारभार हम करे सो कायदा असाच असतो.

माधवी_नयनीश , असे काही ऐकलेले नाही. जुने म्हणजे किती जुने?

भरत
मी मटा मधे वाचले होते एखाद्या आठवड्यापूर्वी. रिजर्व बँकेकडुनच जुन्या चेकबुकसंदर्भात काहीतरी नोटिस आली आहे. तसेच SBI ने पब्लिश केलेली सुचनाही मी मटा मधे वाचली होती जुन्या चेकबुकसंदर्भात. घरी जाऊन शोधून नीट वाचावे लागेल.

मिळालं सर्क्युलर
१ जानेवारीपासून Drawee बँकेत चेकाऐवजी त्याची इमेज पाठवून क्लिअरिंगचे काम पूर्ण होईल. त्यासाठी सगळे चेक्स स्टँडर्ड फॉर्म (CTS 2010) असावे लागतील. ज्या बँकांनी इश्यु केलेली चेकबुक्स या स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाहीत त्यांना चेकबुक्स बदलून द्यावी लागतील. सिपसाठी दिलेले चेक्सही बदलून द्यावे लागतील. चेकवर कोणत्याही प्रकारचे करेक्शन चालणार नाही.

सुमेधा, तीन महिने हा काळ अकाउंट नॉन्-ऑपरेटिव्ह ठरवण्यासाठी खूप कमी आहे. तुम्ही तक्रार करून पहा. पण सहकारी बँकांचा कारभार हम करे सो कायदा असाच असतो.>>>>>

प्रत्येक क्वार्टरला एक तरी ट्रॅनझॅक्शन झालेच पाहिजे तरच तो अकाउंट लाइव्ह धरला जातो. ह्यात सगळ्या बँका आल्या. प्रायव्हेट बँका तर फारच तत्पर आहेत.

आणि ते नवीन चेकबुक बद्दल पण काही सुरु आहे ना? जुने चेकबुक जमा करुन नवीन घ्यायचे आहे बँकेतुन बहुतेक. जुने चेक काही दिवसानी वापरता येणार नाही बहुतेक असे मी वाचले. सगळ्या बँकांना हे लागू आहे का? कोणाला माहिती असल्यास कृपया सांगावी.
>>>>

सप्टेंबर च्या आधी मागवलेले चेक हे "जूने" मानले गेलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या चेक वर डाव्या बाजुच्या कोपर्‍यात तसे लिहिलेले आहे का नाही ते तपासुन पहावे. तुमच्या माहिती साठी मी ऑफिस मधे सर्क्युलेट केलेली मेल खाली देत आहे. ह्या संदर्भात मटा मध्ये व लोकसत्तेत एस.बी.आय. चे पत्रक पण आले होते. टाइम्स मधे पण होते. गेला १ महिना ह्या न्युज सतत येत आहेत.

As you are aware, Cheque Truncation System (CTS) is a project undertaken by the RBI, for faster clearing of cheques. RBI is planning a full-fledged completion by March 2013.

RBI has instructed all banks to phase out all Non CTS format cheque by Dec 31st 2012. Only CTS 2010 format cheques, with the enhanced security features shall be honoured in clearing from Jan 1st 2013. All Scheduled Commercial and Private as well all PSU(Public sector Undertakings) Banks has already started issuing CTS format cheques from Sep 2012.

In view of the same, kindly note the below -
- Non CTS format cheques will need to be phased out by end of the year (31.12.2012) . ( In the next 2 months)

- From Jan 1st 2013, old cheque formats will not be honoured if presented in clearing ( As per regulatory requirements)

- Kindly place orders for fresh chequebooks if your cheque book was issued before Sep 2012. This can be routed through branches/phone banking/internet bank/SMS

- Please ensure that address is verified and updated so that cheque book reaches the correct address

- Destroy the old format cheque book at your end once they receive the new format cheque book

- Kindly note that do not issue / Receive the post dated cheques without CTS 2010.

आणि आपले चेकबुक स्टँडर्ड फॉर्म (CTS 2010)मधे आहेत हे कसे कळणार?>>>

१. सप्टेंबर च्या आधी चेक बुक मागवलेले असेल तर ते "जूने"
२. डाव्या बाजुला (पर्फोरेशन च्या जवळ) बारीक अक्षरात CTS 2010 असे लिहिलेले आहे. आणि अकाउंट नंबर च्या खाली एक ब्लँक आयत आहे. असे चेक म्हणजे "नवे" चेक

Axis बँकेने जून महिन्यात इश्यु केलेले चेक्सही CTS स्टँडर्डप्रमाणे आहेत.>>>>

भरत हा रुल एप्रिल पासुन अमलात आहे. बहुतेक बँका मे जुन पासुनच नवे चेक देत आहेत. एस. बी. आय वगैरे समुद्रांना जरा वेळ लागेल.

आभार मीरा, माझे चेकबुक आता बदलावे लागेल, पण ओव्हर द काऊंटर किंवा त्याच बँकेत चेक भरला तर चालू शकेल का ? (थोडक्यात हा नियम फक्त, क्लीयरिंग साठीच आहे ना ? )
केनयात हा रुल वर्षभरापूर्वीच आला. आता त्यामूळे, आपण भरलेल्या आणि दिलेल्याही चेकची पाठपोठ स्कॅन्ड कॉपी, आपल्या ब्रांचकडे कधीही मिळू शकते.
चेकवर करेक्शन तर नाहीच चालत पण नॉट ओव्हर, असेही चेक आता तिथे देता येत नाहीत.

पण ओव्हर द काऊंटर किंवा त्याच बँकेत चेक भरला तर चालू शकेल का ? (थोडक्यात हा नियम फक्त, क्लीयरिंग साठीच आहे ना ? )>>>

हो दिनेशदा, त्याच बँकेत चेक भरला तर चालेल. किंवा त्याच बँकेत तो क्लीअरिंग ला आला तरी चालेल. पण सेन्ट्रल क्लीअरिंग साठी गेला तर मात्र पंचाईत.