...........एकटं वाटते

Submitted by कौतुक शिरोडकर on 25 November, 2012 - 12:10

हले-बोले पुतळ्यांची
गर्दी अवतीभवती
भगभगणार्‍या दिव्यांमधे
ओळखीच्या वाती
घरी-दारी रहदारी सावळा गोंधळ घालते
तुझ्याशिवाय मात्र फार एकटं वाटते

आभाळाच्या तुकड्यात
बिंब पाहे माती
क्षणासोबत सरणार्‍या
ऋतूंचे सांगाती
अळवाच्या पानी थेंबा जग वेगळं भासते
तुझ्याशिवाय तस मला एकटं वाटते

तेच शब्द, तोच सूर
जुनाटच नाती
शेवाळाने लिंपलेल्या
ओलसर भिंती
तडे, चीर, भेगा सारे बेमालूम झाकते
तुझ्याशिवाय पण आत एकटं वाटते

हसणार्‍या फुलासवे
हसरीच पाती
पापण्याच्या दाराआड
जागलेल्या राती
जगासाठी मन धूंद झिंगून नाचते
तुझ्याशिवाय वेड्यास त्या एकटं वाटते

उत्सवाच्या रंगामधे
रंगतो उल्हास
तूच तू.. फक्त तू
भैरवीचा ध्यास
खिडक्यांच्या कानी गूज दाराचे रांगते
तुझ्याशिवाय घरालाही एकटं वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनातलं सगळंच्या सगळं इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्हा लोकांना कसं काय मांडता येतं? काही लोक प्रतिसादात पण कवितेच्या ४-२ ओळी सहज रचून जातात. मला कधी कविता करायला जमेल असं वाटतंच नाही.
प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली, खूप सुरेख, अतिशय मार्मिक, आशयबद्ध. (आम्ही मर्यादीत शब्दांचा तोच तोच प्रतिसाद देणार. :अओ:)
त्याउप्पर कविता वाचून एक्झॅक्टली काय वाटलं हे पोचवू शकेन असे शब्द गद्यात लिहायलाही सापडत नाहीत. कवितेत तर दूर की बात. Uhoh

मला खूप आवडली. निवडक १० त.

त्याउप्पर कविता वाचून एक्झॅक्टली काय वाटलं हे पोचवू शकेल असे शब्द गद्यात लिहायलाही सापडत नाहीत. >>>>> +१

खुपच भावली. माझ्याही निवडक १० त.

भगभगणार्‍या दिव्यांमधे
ओळखीच्या वाती

आणि

पापण्याच्या दाराआड
जागलेल्या राती

दोन्ही कल्पना सुंदर... मस्त!

मनातलं सगळंच्या सगळं इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्हा लोकांना कसं काय मांडता येतं? काही लोक प्रतिसादात पण कवितेच्या ४-२ ओळी सहज रचून जातात. मला कधी कविता करायला जमेल असं वाटतंच नाही.
प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली, खूप सुरेख, अतिशय मार्मिक, आशयबद्ध. (आम्ही मर्यादीत शब्दांचा तोच तोच प्रतिसाद देणार.)
त्याउप्पर कविता वाचून एक्झॅक्टली काय वाटलं हे पोचवू शकेन असे शब्द गद्यात लिहायलाही सापडत नाहीत. कवितेत तर दूर की बात. >>>> अगदी अगदी.

कविता खूप आवडली.

निवडक दहा मध्ये गेली...
कविता खूपच भिडली... खूप दिवसांनी या आशयाची इतकी सुंदर कविता वाचली.
असेच लिहित राहा आणि आम्हाला मंत्रमुग्ध करत राहा...

सुंदर ! खुप खुप आतुन आवडली, आणि
>>खिडक्यांच्या कानी गूज दाराचे रांगते
तुझ्याशिवाय घरालाही एकटं वाटते. <<

हे तर सोने पे सुहागा !

पहिलं कडवं शहरी प्रतिमांसाठी आवडलं. प्रत्येक कडव्यात एक गजबज दाखवून त्यातून एकटेपणाची तगमग सुरेख व्यक्त झालीय. भैरवी क्लास !!

मनातलं सगळंच्या सगळं इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्हा लोकांना कसं काय मांडता येतं? काही लोक प्रतिसादात पण कवितेच्या ४-२ ओळी सहज रचून जातात. मला कधी कविता करायला जमेल असं वाटतंच नाही.
प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली, खूप सुरेख, अतिशय मार्मिक, आशयबद्ध. (आम्ही मर्यादीत शब्दांचा तोच तोच प्रतिसाद देणार. :अओ:)
त्याउप्पर कविता वाचून एक्झॅक्टली काय वाटलं हे पोचवू शकेन असे शब्द गद्यात लिहायलाही सापडत नाहीत. कवितेत तर दूर की बात. Uhoh
मला खूप आवडली. निवडक १० त.
Submitted by दक्षिणा on 27 November, 2012 - 08:34 >>>>>>>०००० ११११११११११११११११११११११११

माझ्याही निवडक १० त.
खुप आवडली ही कविता