Submitted by अज्ञात on 22 November, 2012 - 00:04
चौकोनी मावेल कसे
मज सांग पिंजले असे पिसे
अवशेष विखुरल्या लाटांचे
वाटे झेलावे अलगदसे
भंगल्या तनूचे अणुरेणू
शोधिती हरवले जसे हसे
पंखात नितळ दंव सोनेरी
स्पर्शात भाव अस्पर्श असे
मोट बांधली मेघाची
पण पराधीन घरचे वासे
अंदाज न सुटल्या धाग्यांचे
क्षण जवळ न येती जराहिसे
.....................अज्ञात
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोट बांधली मेघाची पण पराधीन
मोट बांधली मेघाची
पण पराधीन घरचे वासे>> _/\_
.............................
..............................................
मस्त आहे
मस्त आहे
aabhaar maamI
aabhaar maamI
छानय आवडली
छानय आवडली
आभारी
आभारी
शीर्षक परधीन असे
शीर्षक परधीन असे झालेय.
पराधीन हवे आहे बहुतेक.