श्रद्धांजली

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

येका युगाचा अंत. त्यांच्या विचारसरणीशी अनेकांचे मतभेत असतील मात्र एक व्यंगचित्रकार ते जनाधार असलेला महत्वाचा राजकिय नेता हा प्रवास नक्किच खुप मोठा . श्रद्धांजली
IMG-20121117-00335.jpg

विषय: 

उद्धवचा चेहरा पहावत नव्हता आज सकाळी!

सर्व राजकारण्यांना (उद्धवसकट) एकच विनंती - स्वतःचे सख्खे माणूस गेल्यावर काय वाटतेते उद्धवचा चेहरा पाहुन समजुन घ्या. आणी यापुढे जात, पात, धर्म, प्रांत, राजकारण यावर सामान्य माणसाचे जिव घेउ नका. तो माणुसहि कोणाचा तरी सख्खा असतो!

भारतीय अनेक अनुमोदन तुम्हाला. काल बाळासाहेबांचे अखेरचे भाषण ( दसरा मेळाव्यासाठी) पहाताना गलबलुन आले, पायच गळुन गेल्यासारखे वाटले. खरे तर ते अमरच रहायला हवे असे वाटत होते, पण ईलाज नाही.:अरेरे:

आदरणीय बाळासाहेबांना ' यासम हा ' हेच वर्णन यथायोग्य आहे. त्यांच्या जाण्याने येथील बेलगाम नेत्यांवरचा धाकच नाहिसा झाला आहे. प्रत्येक मराठी माणसाचे मन आणि ह्रूदय व्यापून राहिलेले हे नररत्न!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो!
त्यांच्यासंबंधातील आठवण यथावकाश इथेच टंकणार आहे.
@अशोक
सहमत.

सहमत अश्विनी के
>> आयुष्यात पहिल्यांदाच एका राजकारणात मुरलेल्या कलावंतासाठी डोळ्यात पाणी येतंय. >>

श्रद्धांजली.
आमच्याकडे बाबा कोणे एके काळी शिवसैनिक असल्याने अगदी दु:खी वातावरण आहे.
कालपासून टि व्ही वर जिथे दिसेल तिथून बाळासाहेब डोळ्यात साठवणे सुरू आहे.

बाळासाहेबांची मिश्किल आणि बोचरी भाषणे आठवत राहतात.
नशीब राजकडे ती शैली थोडीतरी आहे.
आता ज्याच्याबद्दल आदर वाटावा असा एकही नेता महाराष्ट्रात आणि देशातही उरला नाही.

आमच्याकडे बाबा कोणे एके काळी शिवसैनिक असल्याने अगदी दु:खी वातावरण आहे.
कालपासून टि व्ही वर जिथे दिसेल तिथून बाळासाहेब डोळ्यात साठवणे सुरू आहे.>>>साती, माझ्या बाबांचंही तेच चालू आहे. छातीला अमृतांजन लावताना पाहून मी घाबरुन त्यांना "त्रास होतोय का? टिव्ही बंद करु का?" असं विचारलं. त्यावर "नाही नाही. त्रास काही नाही. टिव्ही नको बंद करु. वय झालंच होतं ना!" असं म्हणतायत पण त्यांच्या चश्म्यातूनही मधूनच ओलावलेले डोळे दिसतायत. त्यांना दसरा संमेलनातली शिवाजीपार्क वरची भाषणं आठवत असतील त्यांची. ते काहिही करुन जात असंत त्या भाषणांना. काही विचार पटण्याजोगे नसले तरी गोळाबेरीज अधिकातच जातेय.

छे २०१२ फारच भयंकर वर्ष ठरले. २ फार उच्च कोटीचे व्यक्तिमत्त गेले. एक भीमसेन आणि आता असाल वाघ. आज फार काहीतरी आत तुटले. गेल्या कित्येक वर्षात कोणाच्या अंत्ययात्रेला इतकी लोक जमलेली दिसली नाहीत. जे काही बोलले आणि केले ते रोखठोक. दुर्मिळ गुण आहे आणि सध्याच्या राजकारण्यांच्यात तर अजिबात आढळत नाही हा गुण. ह्या इंग्लिश आणि हिंदी चानेल वाल्यांना मुळातच महाराष्ट्रावर इतका क राग आहे काही समाजात नाही. तो करुणानिधी तिकडे हिंदीवाल्यांना बंदी करतो आणि द्रविडी चळवळीने तामिळनाडू भारतापासून वेगळा करायची भाषा केली होती. त्याब्बदल एक शब्द निघत नाही. त्याचे राजकारण ते फार उत्तम आणि बाळासाहेब जनाच्या मनातले बोलले की ह्यांना ते पचवणे अवघड जाते. असो बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली

अभुतपूर्व लोकप्रियता लाभलेले बाळासाहेब हे बहुतेक एकमेव नेते आहेत. आणी हीच जलन असेल या हिंदी आणी इंग्लिशवाल्यांना. सतत हांजी हांजी करत ब्रेकिंग न्युजच्या नावाखाली काहीही दाखवणे यांचा उद्योग असतो ना.

जाऊ दे. आता पुढे काय हाच प्रश्न आहे. अतीरेकी संघटना शिवसेनेला बाळासाहेबांच्या दरार्‍यामुळे थोड्या तरी टरकुन होत्या, आता शिवसेनेचे ( उद्धव आणी राज ) विभाजन झाल्याने त्यांना आणखीनच फावेल, आणी तीच भीती आहे. देव करो आणी सारे मतभेद व मान अपमान विसरुन दोन्ही ठाकरे बंधु आणी संघटना ( शिवसेना, मनसे) एकत्र येवोत. निदान एकीच्या बळामुळे महाराष्ट्र अखंडीत राहु शकेल.

धन्यवाद नीधप. असो. पण ते गेले ह्यावर विश्वासच बसत नाही. एक दिवस जात नाही काही ना काही आईकाल्याशिवाय.

बाळासाहेबांची भाषणे,म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनातले पण मुखात न येणारे बोल होते.
जसे आपण पडद्यावर, बच्चनने खलनायकाची केलेली धुलाई पाहिल्यावर आनंदी होउन टाळ्या पिटतो, तसे काहीतरी काळजास भिडणारे ( पण श्रोत्यांकडून कृतीत न उतरणारे) त्यांचे भाषण असे.
त्यांच्या परखड विचारांना आपण सर्वांनी कृतीची जोड द्यावयास हवी होती, ही खंत वाटत राहील.

शिवसेनेतील भाऊबंदकी मिटून दोन्ही भाऊ एकत्र यावे हिच सर्व मराठी माणसांची ईच्छा आहे. राजने व्यंगचित्रे व ठाकरी भाषणांचा वारसा, तर उद्धवने त्यांची गॉडफादर ची प्रतिमा जपावी.

महाराष्ट्राच वैभव आज खर्‍या अर्थाने हरपल. आता महाराष्ट्र कोणाचा आदेश पाळणार? कोणाचा एकच हुकुम मुंबईला सुरक्षित ठेवणार?

धगधगत्या सूर्याला अखेरचा सलाम. बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

साहेबांच्या सभेला नेहमीच खच्चून गर्दी होत आली आहे पण सर्वात जास्त गर्दी त्यांनी शेवटच्या सभेला खेचली. ते पण एक शब्दही न बोलता...

साहेबांच्या सभेला नेहमीच खच्चून गर्दी होत आली आहे पण सर्वात जास्त गर्दी त्यांनी शेवटच्या सभेला खेचली. ते पण एक शब्दही न बोलता.........>>>> अगदी खंर आहे ,सेनापती.

Pages