पणतीच्या शुभ्र कळ्या...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आणि शुभचिंतकांना मी व माझ्या आईकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
Diwali...1.jpg

नजीकच्या काळात बहुतेक फराळ वगैरे ई-तंत्रामुळे त्वरीत पाठवाण्याची सोय होवो!
Diwali2.jpg

विषय: 
प्रकार: 

बी, तुम्हाला नी तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा!

तुमच्या आईला सिंगापूरात रहाताना कसं वाटतंय? त्या अ‍ॅडजस्ट झाल्या का तिथे रहायला?

शैलजा, अ. अ. जोशी, साति - धन्यवाद.

साति, हो आईला इथे आवडलं. आमच्या महाराष्ट्र मंडळात दर आठवडल्या कार्यक्रम असतात शिवाय अनेक मराठी मित्रांकडे कसले ना कसले तरी कार्यक्रम असतात. त्यात मी आईला घेऊन जातो. कधीकधी हिन्दी ईंग्रजी सिनेमा पहायलाही जातो. इथल्या बाजारात, सुपरमार्केटमधे, मॉल्स मधे पण फिरायला जातो. फक्त घरी इतर वेळी ती एकटीच असते आणि बोलायला कुणीतरी हवं असतं त्याची मला थोडी खंत वाटते. मुख्य म्हणजे इथे तिला माझी आणि मला तिची सोबत मिळते आहे हे जास्त महत्त्वाचे आहे.

बी, तुम्हाला दिपावलीच्या शुभेच्छा!

(फराळ पाहून खादाडी जागली म्हणून विचारते, ते भाकरीसारखे काय आहे ताटात? आणि चॉकलेटी रंगाचे काय आहे?)

झंपी, त्या साटोर्‍या आहेत.

बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, बारीक तिखट शेव, साटोर्‍या, कापण्या, करंज्या, शंकरपाळे इतके पदार्थ आहेत ताटात.

बी व इतर सर्व मायबोलीकरांना व त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांची ही दीपावली व पुढील वर्ष भरभराटीचे, मनःशांतीचे व उत्तम प्रकृतीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

वा.. मस्त पणत्या आणि त्याहुनही मस्त फराळ Happy

बी तुम्हाला नी आईंना दिवाळीच्या मनापासुन शुभेच्छा...

आईचे मन रमेल की तिथे. मुलगा सोबत आहे हा आनंद सगळ्यात जास्त मोठा असेल त्यांच्यासाठी.

बी, बर्‍याच वर्षांनी आईच्या हातचा फराळ खात असशील ना, आमची आठवण ठेवलीस, त्याने खुप छान वाटली.

तूम्हा सर्वांना आमच्या हार्दिक शुभेच्छा.