आसवे

Submitted by विनायक उजळंबे on 10 November, 2012 - 05:29

जाळते हुंकार झाली आसवे ..
जाळण्या तैयार झाली आसवे ..

हासण्या सोकावली कैफात ती ..
पापण्यांना भार झाली आसवे..

वाटले राहीन शृंगारा विना ..
मोजका शृंगार झाली आसवे ..

राहता ती याद थोडी वेदना ..
मोजताना फार झाली आसवे ..

लाजता काव्यास माझ्या हासता ..
गाजता चीत्कार झाली आसवे ..

योजनेला अंत येऊ पाहता ..
शेवटी आभार झाली आसवे ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रदीफ सर्व शेरात फिट बसते का हे पाहणयासाठी ही गझल वेळमिळाल्यास पुन्हा एकदा वाचीन म्हणतोय