जोड-ओळी

Submitted by उदयन.. on 9 November, 2012 - 01:06

इश्कवाला लव.....या गाण्यावरुन अजुन काही शब्द आठवले......

इश्क वाला लव...........
.

.
पानी वाली नदी
.
.
आग वाले निखारे
.
.
मातीवाले मैदान
.
.
कपड्यांचा शर्ट पँट
.
.

हर्षल खगोल | 8 November, 2012 - 18:19
गाने वाला साँग
.
झंपी | 8 November, 2012 - 23:00
खानेवाला फूड ...
.
Harshalc | 9 November, 2012 - 00:04
हे माझं पण : ताक वाली कढी
.
स्वस्ति | 9 November, 2012 - 11:26
भात वाला जीरा राइस
.
.
आपण ही सुचवा असे शब्द Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खास कोल्हापुरी जोडओळी...

१. "आमच्या इथे कोंबडीचे ताजे चिकन मिळेल."

२. "माझे बाबा शाहू मिल गिरणीत कामाला आहेत."

३. "अरे त्याची होंड पॅशन कशी काय सरासरी ६५ किमी. अ‍ॅव्हरेज देते ?"

४. 'गद्रे कंपनीची चहा टी पावडर एक नंबरी आहे."

५. "महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे स्टेशनवरून किती वाजता सुटते ?"

शेकडा -- टक्के.

आमच्याकडे वापरले जाणारे काही
डोक्याला लयी हेडॅक झाला पघ.
आरे खरंच रियल फॅक्ट ह्ये.

नवरात्रात दंडुधारीनर्तकाभिलाषींना निवेदकाची सूचना:
ज्या कुणाला दांडिया खेळायचा आहे त्यांनी पटकन पटांगणामधे गोल राऊंड करून घ्यायचा आहे.

कॉलेजमधल्या आमच्या एका शि़क्षकांचे इंग्रजी यथातथाच होते.त्यांच्याही काही डबल जोडोळी
रिपीट ऑल द डायग्राम्स अगेन.
व्हाय आर यू स्टँडिग इन फ्रंट ऑफ माय बॅक?
इन द एक्झाम डोंट डू राँग मिस्टेक्स.
बोथ ऑफ यु थ्री गेट आउट ऑफ द क्लास.

आताच ऑफिसच्या जवळ एक व्यक्ती फोनवरून बोलतांना :

"त्याच्या घरची फॅमिली काय म्हणते त्यावर डिपेंड हाये ना..." म्हणाली... Uhoh

मस्त
मी पण corner च्या कोपर्यावर ladies बायका gossip च्या गप्पा करत होत्या Wink

शिफ्ट मध्ये काम करणारे बर्‍याचदा
'उद्या सकाळी माझी मॉर्निंग आहे' असं म्हणतात Happy

"त्याच्या घरची फॅमिली काय म्हणते त्यावर डिपेंड हाये ना..."

अहो कदाचित बाहेरची अजून एक फॅमिली असेल. Wink

कॉलेज मधे असताना माझ्या बेन्च-मेट ने वापरलेल्या जोड-ओळी...
१> छोटिशी मिश्टेक झाली, तिथेच चुकलं... (अगदी अनवधानाने बोलून गेलेला)
२> वातावरण चेन्ज झाल्यामुळे क्लायमेट बदललंय... (मुद्दाम ठरवून बोललेला...)

आम्हाला ११वी-१२वी ला Physics शिकवणार्‍या सरांच्या तोंडात बसलेली वाक्यं...
१> Due to Because Of...
२> Isn't it or is not...

Happy

Lol