Submitted by सोनू. on 8 November, 2012 - 16:02

    लहानपणी एकमेकांना घालायचे एक कोडे 'भुंगा' यांच्या 'तुम्ही चहा कसा करता' या धाग्यातील एका शब्दाने आठवले. या आधी कोणी हे इथे घालून झाले असेल तर 'हँ' इतके म्हणून सोडून द्यावे. 
    यात समोरच्याची सहनशक्ती रसातळाला जावी इतका कल्पनाविलास (पाल्हाळ लावणे) केला जातो. मी हात बराच आवरता घेतलाय(उत्तर आल्यावर महाभयानक पाल्हाळ होते असे म्हणू नये).

    आटपाट नगरात राम नावाचा एक सावकार रहात होता. तो फार सालस व सद्वर्तनी होता. देवाच्या कृपेने मिळालेले हे जीवन सरळ मार्गी राहून, सर्वांचे भले करुन सुफळ करावे असे त्याने ठरवले होते. 
    शेजारच्या गावच्या बाबूराव सावकाराची रामच्या संपत्तीवर नजर होती. परंतु राम व्यवसायात तरबेज असल्याने बाबूरावांचे काही चालेना. 
    सरतेशेवटी आपणास नाही तर आपल्या मुलीला तरी ही संपत्ती मिळावी असा विचार करून बाबूरावांनी राम व कन्या जानकी यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. 
    जानकी म्हणजे चिखलातले कमळ जणु. गोरीपान, फुलासारखी छान, सुहास्यवदना जानकी पाककला, शिवणकाम इ. कलांमध्ये तर पारंगत होतीच, पण बाबूरावांच्या एकदम विरूद्ध अशी दानी, प्रेमळ व पापभीरूही होती. रामला अशाच जानकीचा शोध होता. 
     विवाह मोठ्या थाटात पार पडला. यथावकाश या राम-जानकीच्या सुखी संसारात पुत्ररत्नाचे आगमन झाले. महान ज्योतिषी दुराचार्य यांना आमंत्रण पाठवले गेले. आचार्यांनी पत्रिकेत पाहून नावासाठी 'ट' हे अक्षर सुचवले. झाले, टग्या, टकलूहैवान अशी काहीबाही नावे सुचू लागली. शेवटी या विचित्र नावांपेक्षा 'ट' हेच नाव नक्की केले गेले. 
    पण हाय रे दैवा, आचार्यांनी ट कडे अगम्य नजरेने पाहीले व ते म्हणाले - मला ट चे मृत्युस्थळ दिसते आहे .... आणि एवढे बोलून आचार्य चक्क निघून गेले. 
    तर..... कुठे बरे मरेल ट ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंयस सोनु.
कीप ईट अप.
दुनियादारीत आहे हा. तिथे पण प्रचलित ' बालसाहित्या' तूनच घेतला असावा.
Happy

मॅक्स Happy
तुमचं उत्तर अगदी बरोबर वाटतंय.

धन्यवाद सर्वांना. 
कोडी घालणे हा छंद 'वाचन' या छंदाच्या खूप आधीचा असल्याने कदाचित या गोष्टीचा उगम तिथेच असावा असा कयास  . .