अश्याच परिचारिकेस पुसले मिळेल थोडे मलम कुठे

Submitted by बेफ़िकीर on 2 November, 2012 - 16:51

अश्याच परिचारिकेस पुसले मिळेल थोडे मलम कुठे
सबंध जखमी असून मी जी विचारते की जखम कुठे

असेल कौशल्य ते जगाला विकून जगणे कबूल पण
तुला नकोसे बनायचा काढणार अभ्यासक्रम कुठे

चुकून एकांत भेटल्यावर किती ठिकाणी विचारले
पुरेल दोघांस एवढी एकट्या दुकानात रम कुठे

तरी स्वतःच्या पुढील श्वासांमधे प्रतिष्ठा भरायची
जरी कळेना हयात होते सुरू कधी अन् खतम कुठे

तुला दिल्याने हृदय... हवे तेवढे फिरावे खुशाल मी
भले दुखेनात पाय दोन्ही... मुळात लागेल दम कुठे

चुकून नरकात डांबलेले सशस्त्र क्रांती पुकारती
तिथे मला न्यायला मुळातच जिवंत राहील यम कुठे

मला जिथे व्यक्त व्हायलाही दिवस पुरेना अश्या जगी
अनेकजण हुंगतात चर्चा घडेल गरमागरम कुठे

तुला दिले रंग रूप त्याने रुची वगैरे मला दिली
चवीमुळे जर पदार्थ गाजे विभागणी ही विषम कुठे

कितीकदा 'बेफिकीर' मृत्यू समीप येतो दुरावतो
तुला तुझ्या फाटक्या जिण्याची अजून येते शरम कुठे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम गझल...
मतल्याने तर....हाय मार डाला...लाजवाब...

सगळे शेर आवडले...
धन्यवाद...आणि शुभेच्छा...

असेल कौशल्य ते जगाला विकून जगणे कबूल पण
तुला नकोसे बनायचा काढणार अभ्यासक्रम कुठे

चुकून एकांत भेटल्यावर किती ठिकाणी विचारले
पुरेल दोघांस एवढी एकट्या दुकानात रम कुठे >> Happy

तुला दिल्याने हृदय... हवे तेवढे फिरावे खुशाल मी
भले दुखेनात पाय दोन्ही... मुळात लागेल दम कुठे

चुकून नरकात डांबलेले सशस्त्र क्रांती पुकारती
तिथे मला न्यायला मुळातच जिवंत राहील यम कुठे

मला जिथे व्यक्त व्हायलाही दिवस पुरेना अश्या जगी
अनेकजण हुंगतात चर्चा घडेल गरमागरम कुठे >> लॉल!! Happy

कितीकदा 'बेफिकीर' मृत्यू समीप येतो दुरावतो
तुला तुझ्या फाटक्या जिण्याची अजून येते शरम कुठे

>>>>>>>> एका चढ एक !! जबरदस्त अनुभव !

धन्यवाद !

__/\__

वेदना आणि विनोद .. तीच व्यंजनं आहेत दोन्ही शब्दात हे जाणवून दिलंत.
लिहिण्याची ताकद..मुळातच अशी असावी लागते.

छान ! सुन्दर गझल !!

तुला दिले रंग रूप त्याने रुची वगैरे मला दिली
चवीमुळे जर पदार्थ गाजे विभागणी ही विषम कुठे >>>>>>>>>>

अप्रतिम !!

भुंग्या तुझा मोबाईल क्र. कळवशील का काम आहे ................

ह्या धग्याचा उपयोग करून घेतो आहे क्षमस्व !! मला अनेक दिवस झाले भुंग्याशी सम्पर्क साधायचा होता

कितीकदा 'बेफिकीर' मृत्यू समीप येतो दुरावतो
तुला तुझ्या फाटक्या जिण्याची अजून येते शरम कुठे

फार सुंदर!!

मात्र,

पुसले हा शब्द विचारले अशा अर्थी आहे हे समजते. तरी बाकी शब्द रचनेला ठीक वाटत नाही. असो.
रचना सुंदरच आहे. त्यामुळे अभिनंदन!!