बस डे!! (मु.पो.पुणे)
काल निघताना सर्वांचाच
चेहरा होता हसरा
काल झाला ना पुण्यात
बस डे साजरा
चौकाचौकात पोरे पोरी
होती बसची वाट पहात..
आत मात्र आली नाहीत
घोषणा देउन तिथेच रहात
घोषणा देत पर्यावरणाच्या
काही पोरे आत शिरली
वनस्पतींच्या बिया देउन
पुन्हा सगळी खाली उतरली
चढण्यासाठी बसथांबा
उतरायला कुठेही थांबा
चालक, वाहक रागवत नव्हते
म्हणाल तसे करत होते
रोज रोज लोम्बकाळणारा
आज भरपूर हसला
बस डे मुळे निदान
एकदा तरी 'बसला'
सूट, बूट , टाय लावून
काही चढले बसमध्ये
आजपासून पुन्हा असतील
आपापल्या स्टेटसमध्ये
बसनेच प्रवास करा
म्हणून संदेश दिला होता
मात्र याचे भांडवल करून
काहींनी फायदा घेतला होता
बस डे साजरा करून
नक्की फायदा कुणाला ?
रोज बसने जाणाऱ्यांना
की शिराळशेटी दलालांना ?
एक दिवसाने काय होणार?
असे कुणी म्हणू नका...
रोज बसने जाणाऱ्यांच्या
आशेला धक्का लावू नका...
अप्रतीम! तुम्ही आगदी योग्य
अप्रतीम! तुम्ही आगदी योग्य शब्दात सगळा सार सांगीतले.
छान!
छान!
मस्त हो जोशी. सुरेख
मस्त हो जोशी. सुरेख
ये ब्बात.
ये ब्बात.
छान छान.
छान छान.
धन्यवाद!!
धन्यवाद!!