फसवणूक

Submitted by बागेश्री on 31 October, 2012 - 06:09

तुम्ही, तुम्ही असलेलं जगाला फारसं आवडत नाही...
मग त्याला हवं तसं घडवण्यात वर्षे लोटतात...

आता तुम्ही प्रिय असता,
कारण तुम्ही जगासारखे असता...

मग कधी निवांत क्षणांत, तुमचं खरं रूप हळूच बाहेर येतं, शेजारी येऊन बसतं...
ते लाडकं असतं- फक्त तुम्हाला!
त्याची आर्त नजर तुम्हाला छेदून जाते..

थोडीशी खूडबूड झाली, की
त्या आर्त नजरेला ओलांडून जगाशी सामना करायला तुम्ही पुन्हा तयार...

पण तरीही, 'तोतया' शब्दाचा अर्थ मनाला पटत नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

मी कुठे धरून ठेवलेय बागेश्रीताई Wink

माझ्याकडे परशुरामासारखी शक्ती असती ना, तर आंतरजालावरचे किमान हजार कवी तरी मी 'कविता' लिहीता येणार नाही अशा अवस्थेला आणले असते.

सुपर्ब !

जगासाठी स्वतःलाच बदलून स्वतःचीच फसवणूक का करायची??? >>> विनिता, आपण फक्त आपल्यासाठी जगत नाही ना म्हणुन. Happy

ललितामधील संकल्पना आवडली. हे ललित थोडे अजुन बहरायला हवे होते असे मनात आले. शेजारी बसलेला आपल्यातला मुळ आपण आणि सध्याचा आपण यांच्यात एक उत्तम संवाद होऊ शकला असता की काय असे वाटले. पण कदाचित ती या ललिताची व्याप्ती नसावी असे आपले मत असावे. तरी, पुढचा भाग म्हणून वाचायला आवडेल.

-'बेफिकीर'!

बागेश्री यांच्या आधीच्या एका धाग्यावर (आणि इतरांच्या काही धाग्यांवर) संशोधन केल्यावर चांदणी लाड या विजय दिनकर पाटील उर्फ कणखर उर्फ सुखनवर उर्फ खवीस असल्याचे समजते Proud

.

बेफिकीर, अनेकांच्या धाग्यावर आधी सुखनवर किंवा खवीस या नावाने प्रतिसाद दिलेला मी स्वतः पाहीलेला आहे. आता ते बदलून चांदणी लाड दिसतंय. तुम्ही कितीही स्पष्टिकरण दिलंत मित्रासाठी तरी मी स्वतः जे डोळ्यांनी बघितलेलं आहे ते आहेच की.

क्षमस्व बागेश्री. बाकी ललित आवडलं हे सांगायचेच राहिले. असो.

.

बेफिकीर, हा घ्या पुरावा:
http://www.maayboli.com/node/30674

khavis.JPG

सुखनवर, खवीस, चांदणी लाड हे विदिपा यांचेच डुआयडी आहेत ह्याबद्दल माझी खात्री आहे कारण त्यांचे कारनामे मी स्वतः पाहीले आहेत. तुम्ही काहीही म्हणा.

बेफी.. प्रत्येकच धागा काय हायज्ॉक करावा हो.. हवाबदल म्हणून तरी लिखाणावर बोलत जा.. नसेल पटले तर तसे सही

सामोपचार,

हे एवढे सगळे खोदून ही रचना दर्जेदार झाली असती तर बरे झाले असते.

प्रतिसाद कुणी दिला ह्या पेक्षा कसा दिला ते पहावेत.

त्यांचे कारनामे मी स्वतः पाहीले आहेत.>>>>

केवळ तीसावर पाच पूर्णांक एकशे पंचवीस सहस्त्रांश दिवसांत

कमाल आहे Lol

विचार करूनच लिहीले आहे......... कुणास पट्ते कुणास नाही. एखादी गोष्ट अनुभवली की ती सहज शब्दांत पकडावीशी वाटते... ती प्रत्यक्ष अनुभवल्याने त्यात दांभिकताही नसते आणि अविचारी लिखाण करण्याची शक्यताही खुंटते.
धन्यवाद.

चांदणी पाटील महोदय, तुम्हाला ही कविता का वाटली? की जिकडे तिकडे रचनाच दिसते? Wink
हे ललित लेखनात आहे हो विदिखवीस Proud

छान लिहलंय... याची एकबाजू अशी आहे की आपण स्वतःच्या स्वार्थासाठी हेतूपुरस्कर बदलतो आणि जगाला भासवतोही..

आता 'तोतया'चा अर्थ लागेल.

>>तुम्ही, तुम्ही असलेलं जगाला फारसं आवडत नाही...
इथेच जिंकलंस.... आवडलं... Happy

बाकी दोन ड्यु आयड्यांणी भांडण्यासाठी एखादा नवा वाहता विरंगुळा गोष्टींचा धागा स्वत्।चे आय डी वापरून सुरू करा की......आम्ही तोही वाचु पण इथे हा नाच नको.... प्लि़ज....

बागे दुसर्^यांदा झालं का गं तुझ्या ललितांवर मी यायच्या आधीच थोडा धिंगाणा....:) असो....लिहिती राहा...

Pages