निवृतीनाथ

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 27 October, 2012 - 04:31

माउलींचे गुरू निवृतीनाथ
तया माझा नमस्कार वारंवार
माऊली निर्झर निवृत्ती पहाड
जनासाठी दिले फोडून अंतर
माऊली मोगरा निवृत्ती काष्ठ
वाढला वेल ज्यांच्या खांदयावर
माऊली चांदण निवृत्ती आकाश
विराजित सौदर्य ज्यांच्या अंकावर
माऊली लावण्य निवृत्ती नटवण
वाढवले सुख त्यांनी अपरंपार
माऊली हिरा निवृत्ती कारागीर
केले उपकार साऱ्या जगावर

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांत प्रभाकर,

आपल्या काव्यास विनम्र अभिवादन. माउलींबद्दल जेव्हढं भरभरून लिहिलं गेलंय त्यामानाने निवृत्तीनाथांबद्दल काहीच माहीती नाही. म्हणून म्हणावंसं वाटतं :

नेणीवेचे विवरांत
उजेडाची संक्रांत (*१)
उभविली विक्रांत
प्रभाकरे

अधिक संतकाव्ये वाचायला आवडतील. Happy

आ.न.,
-गा.पै.

*१. संक्रांत* = संक्रमण

पुरंदरे शशांक ,अश्विनी के,भारतीजी,गामा_पैलवान आपले सर्वांचे आभार.
गामा_पैलवान , आपण केलेल्या गौरवाने आनंद झाला अन संकोचही वाटला .काव्य छान झाले असेल तर माऊलींची कृपा .