मॉरल ऑफ द स्टोरी..!!

Submitted by अंड्या on 27 October, 2012 - 07:56

काहीतरी लिहायला मला आवडते. लिहिताना मी विचार नाही करत की कोण वाचेल की नाही की कोणाला आवडेल की नाही. जेव्हा माझे मनातले विचार कागदावर उमटतात तेव्हा मला स्वताला बरे वाटते. एक समाधान मिळते. माझ्यापुरते ते खरे तर तिथेच संपते.

तरीही पण मग का ठाऊक नाही, लिहिले आहेच काही तर ते कोणालातरी वाचायला दिल्याशिवाय सार्थकी लागणार नाही असा विचार मनात येतो. असेच मग एका संकेतस्थळावर ते टाकले जाते. कधीकधी जेव्हा स्वताला असे वाटते वाह छान लिहिलेय, ईतरांशीही हे नक्की रीलेट होईल तेव्हा प्रतिसादांची उत्सुकता देखील असते.

पण माझ्या केसमध्ये बर्‍याचदा तसे होत नाही. माझे लिखाण मी कोणाशी रीलेट करून लिहिले नसते. ना कोणत्या प्रतिसादच्या मोहात सजवले असते. तरीही प्रतिसाद आलेच तर ते वाचले जातात, अपेक्षित तिथे शंका निरसनही केले जाते. कोणी जाब विचारलाच तर उत्तरेही दयावी लागतात.

पण कधीकधी कुठे प्रतिसादच येत नाहीत. कारण कोणाला ते लिखाण आपलेसे वाटतच नाही. तेव्हादेखील मी विचार करतो की मी या सार्‍यांपेक्षा वेगळा आहे. माझे विचार वेगळे आहेत. नाही पटले कोणाला, काही हरकत नाही...

.
.
.

पण मग अश्याच एका लिखाणावर प्रतिसाद येतो.... छ्या.. काहीही लिहिलेय.. उगाच लिहिलेय.. काही अर्थ नाही यात...!!!!

.
.

आपण आंतरजालावर येतो ते काहीतरी ज्ञान मिळवायला, काही तरी वाचायला, माहितीत नवीन भर टाकायला. एखादा लेखही त्याच दृष्टीकोनातून वाचतो. जर तो किमान मनोरंजन करून जात नसेल तरी त्यातून एखादा विचार असा मांडला गेला असावा जो आपल्याला जीवनाचे एक तत्वज्ञान शिकवेल अशी आपली अपेक्षा असते. यापैकी काहीही नाही झाले तर ते लिखाण उगाच असते. भले लिहिणार्‍याशी ते कितीही निगडीत का असेना ते आपल्यासाठी अर्थशून्य आणि निरुपयोगी असते....

का?? ....

कारण प्रत्येक वेळी आपल्याला हवी असते मॉरल ऑफ द स्टोरी ... !!

वाचून झाल्यावर आपण स्वताशीच विचार करतो की यात मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे ..

कसे लिहिलेय, किती छान लिहिलेय हे सारे त्यानंतर ... पण यातून मला नवीन घेण्यासारखे काय मिळाले हे जास्त महत्वाचे..

नाही का..!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंड्या, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी धडा घ्यायलाच पाहिजे वा मिळालाच पाहिजे, अशा वृत्तीने कुणी वागत नाही आजकाल. प्रत्येकाचा अनुभव वेगळा, आणि तोही अनेकांना वाचायला आवडतोच. इथे अशा निखळ वृत्तीचे वाचक नक्कीच आहेत.

पण मला लिहिता आलेच पाहिजे हा पवित्रा नको. त्यापेक्षा इथले आणि इतरही लिहिलेले वाचत राहणे मह्त्वाचे. शास्त्रीय संगीतातले थोर गायक, कायम इतर कलाकारांचे गायन / वादन ऐकत असतात. शिक्षणाला केवळ सुरवात असते, अंत नसतो.. या "विद्यार्थी" वृत्तीने.

दिनेशदा, अनुमोदन.
अंड्याराव, तुम्ही पिल्लु झालात की तुम्हाला 'मॉरल ऑफ द स्टोरी ' आपल्या आपण कळेल.
ता. क. एक वय असं असतं ज्यावेळी आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत असा भ्रम असतो. आपल्याला कोणीच समजून घेत नाही आणि आपलं कुणाला काही कळत नाही असाही भ्रम असतो. कधी कधी मग इतरांपेक्षा वेगळं बोलणं वागणं अभिरूची ठेवणं मुद्दामहून जोपासलं जातं. काहींच्या बाबतीत ही फेज वयानुरूप डायल्यूट होते काहींच्या स्वभावाचा भाग बनते. लोक अशा माणसाना मग हटवादी म्हणतात.

कसे लिहिलेय, किती छान लिहिलेय हे सारे त्यानंतर ... पण यातून मला नवीन घेण्यासारखे काय मिळाले हे जास्त महत्वाचे..

>> नाही.

माझ्यासाठी एक वाचक आणि लेखक या दोन्ही दृष्टीने नाही.

साती, ते आनंद चं आनंद्या-> आंद्या->अंड्या अशी व्युत्पत्ती आहे. तुम्ही अंड्याचं पिल्लू ही वेगळी संगती लावलीत Wink पण एकंदर भा.पो.

(भ्रमनिरास होऊन तपे लोटलेला) इब्लिस

दिनेशदा, ईब्लीस, साती, नंदिनी सहमत.

हा दृष्टीकोन नसतोच असं नाही, पण जर मला काही शिकायचच आहे तर मी त्यादृष्टीकोनातून डायरेक्शन एफर्टस् नाही का लावणार ? चार माझ्यापेक्षा व्यासंगी असलेल्या लोकांना विचारुन काय वाचाव हे नाही का ठरवणार ? शेवटी मी माझा वेळ, श्रम आणि पैसा इन्व्हेस्ट करतोय. त्यामुळे What are you going to carry home ? हा प्रश्न माझ्यापुरता तरी येथे गैरलागू आहे. अर्थात काय लिहू नये हे शिकण्यासारखं असू शकेल कदाचित.... Wink

त्यामुळे सध्यातरी निव्वळ विरंगुळा हाच उद्देश....

श्रियुत अंडेश्वर साहेब...
.
अपेक्षा करणे आणि अपेक्षा असणे यात कमालीचे अंतर आहे.... हे अंतर जेव्हा आपल्याला कळेल.... तेव्हा............ असो....
.
.
आता हे जे काही आहे ते एका साध्या वाक्यात सांगा.....

<<कधीकधी जेव्हा स्वताला असे वाटते वाह छान लिहिलेय, ईतरांशीही हे नक्की रीलेट होईल तेव्हा प्रतिसादांची उत्सुकता देखील असते.

पण माझ्या केसमध्ये बर्‍याचदा तसे होत नाही. माझे लिखाण मी कोणाशी रीलेट करून लिहिले नसते. ना कोणत्या प्रतिसादच्या मोहात सजवले असते. >>
आनंदा, माझा वाचनाचा आणि लेखनाचा जो काही छोटेखानी प्रवास आहे त्यावरून सांगते... एखादा विचार, अनुभव अन त्याचं लेखातून झालेलं प्रकटीकरण हे कुणालाही रिलेट होण्याची गरज नसते. रिलेट न होताही ते ह्या हॄदयीचे त्या हृदयी पोहोचू शकतं. (गो नी दांडेकरांचं 'माझी भ्रमणगाथा'... नर्मदा परिक्रमा अन त्या अनुषंगाचं काहीही रिलेट न होणार्‍या कुणाही संवेदनाशील वाचकाला वेढून टाकणारं)
इथे रिलेट म्हणजे पटणं नाही. वाचकाच्या अनुभवक्षेत्राशी संलग्नं, संबंधित... जवळ जाणारं.
उत्तम लेखक बनण्याची आस असणारे, आपलं मनोगत नाही "पोचलं" तर आपल्या लिखाणात काय कमी आहे ह्याचा विचार करायला घेतात. नं पटणं अन न पोचणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत!

"माझे विचारच वेगळे आहेत, माझं जगच वेगळं आहे..." ही उत्तम लेखक बनण्याच्या प्रवासातली एक अत्त्युत्तम पळवाट नक्की होऊ शकते Happy
पुढील लेखांसाठी शुभेच्छा.

साती आणि इब्लिस तुम्ही एकमेकांना सॉलिड कॉम्ल्पिमेंट केलंय Happy

या आय डीचा इतका सखोल विचार कदाचीत त्याने आय डी घेताना पण केला नसेल....मॉरल ऑफ द स्टोरी....मस्त विरंगुळ होतोय....:) आभार्स Wink

बागुलबुवा आणि ईब्लिस
नाही नाही करत प्रतिसादांचे खाते उघडून दिल्याबद्दल धन्यवाद . Happy

----------------------------------------------------

@ दादआत्या,
तुला मी आत्या बोलून फसलो वाटते, आता मला बरेच उपदेशांचे डोस ऐकावे लागणारेत असे दिसतेय.. Sad ... Happy
बाकी सहमत. मी लेखक नाही की बनायचेही नाही, पण जो लिहितो तो लेखक ही व्याख्या प्रमाण मानली तर पुढे लिहिते वेळी तुझा उपदेश लक्षात राहील. Happy
----------------------------------------------------

@ दिनेशदा,
माझ्या भावना समजून दिलेल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. Happy

कोणीतरी माझ्या एका लिखाणावर चांगला प्रतिसाद दिला नाही आणि त्या तिरमिरीत मी इथे हे लिहिलेय असे कोणाला वाटत असेल तर ते खरेच आहे.. खोटे का बोला.. मी जास्त वेळ विचार डोक्यात घोळवत ठेवत नाही, गेले निघून तर ते चूक होते की बरोबर हे समजत नाहीत, त्यामुळे पटकन ते मांडून घ्यायचे हा माझा फंडा आहे.
पण आपण म्हणता तसे लिहिता आलेच पाहिजे असा हट्टही नसतो माझा कधी, कारण मनात चांगले वाईट विचार येणे किंवा विचारक्षमता म्हणूया हवे तर आणि ते योग्य शब्दांत मांडणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

विद्यार्थ्याचे उदाहरण दिलेत तर मी त्या दृष्टीकोनातूनच लिहायचा वाचायचा प्रयत्न करतो... जसे की एखाद्याला मूळ लेख व्यवस्थित मांडता आला नाही तर काय झाले, विषय कसाबसा क्लीअर करण्यात जर तो यशस्वी ठरला तर मागाहून येणारे प्रतिसादक त्याला वेगळ्याच उंचीवर नेऊ शकतात की नाही.

नवीनच तर आहे मायबोलीवर, इतर लेखांचेही वाचन सुरू केलेय इथल्या.. Happy

----------------------------------------------------

अवांतर - आनंदचे स्टायलिश अँडी व्हावे यासाठी कॉलेजमध्ये केलेले प्रयत्न फसले म्हणून वाडीतल्या पोरांनी अंड्या हे लहानपणापासून ठेवलेले नाव घेऊनच इथे आलो कारण तेच माझ्या कॅरेक्टरला साजेसे आहे असे वाटते आणि तुम्ही म्हणता तसे अंड्यातून बाहेर पडायला धडपडत असलेल्या पिल्लासारखाच मी आहे.. Happy

>>>>> इथे रिलेट म्हणजे पटणं नाही. वाचकाच्या अनुभवक्षेत्राशी संलग्नं, संबंधित... जवळ जाणारं.
उत्तम लेखक बनण्याची आस असणारे, आपलं मनोगत नाही "पोचलं" तर आपल्या लिखाणात काय कमी आहे ह्याचा विचार करायला घेतात. नं पटणं अन न पोचणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत!

"माझे विचारच वेगळे आहेत, माझं जगच वेगळं आहे..." ही उत्तम लेखक बनण्याच्या प्रवासातली एक अत्त्युत्तम पळवाट नक्की होऊ शकते
पुढील लेखांसाठी शुभेच्छा.
>>>>>> + १

आपल्याला वाटलं की लिहित राहयचं,........... कधितरी स्वतःसाठीही......
या जगात एकाच घटनेचे....... अनेक लोक......... अनेक अर्थ लावतात.......... त्यांचा विचार नाही करत नाही बसायचं.... आपल्या काय वाटतं... काय पटतं हेच महत्वाचं..