एक जमुरा मी तुझा

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 22 October, 2012 - 10:13

हे जादुगारा ,
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे
तुझाच प्रश्न तुझेच उत्तर
जरी मी वदतो रे ...
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे

चादरी खाली स्वत:स लपवून
हजरजबाबी उर्मट होऊन
जगा रिझवतो रे.....
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे

तूच शिकवले तयार केले
तुलाच ठकवून गमे जरी
मी टाळ्या घेतो रे ....
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे

या दुनियेच्या बाजारात
माझ्या सकट जाणे जरी
नच माझे काही रे ....
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एम टी.व्ही वर मागे एका कार्यक्रमामध्ये विशाल- शेखर या संगीतकारापैकी विशाल ने अशाच आशयाच गाणं म्हणलं होतं.
मदारी मदारी मदारी मदारी मेरा तू,
मै जमुरा रे जमुरा....
असे त्याचे बोल होते.

वा,क्या बात है!.मी प्रथमच हे गाण पहिल .मधल पंजाबी कळल नाहि .पण छान वाटल .मुख्य आशय तो सुत्रधार मी सुत्राधिन हेच आहे.
धन्यवाद आर.के.आंबा१