नशीब माझे खरोखरी खोडसाळ आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 20 October, 2012 - 23:26

गझल
नशीब माझे खरोखरी खोडसाळ आहे!
स्वभावही तेवढाच माझा खट्याळ आहे!!

विषास अन् अमृतास कैसे करू निराळे?
हरेक पेला तसा चवीला मधाळ आहे!

चढेल चर्चेस रंग आता, बघाच तुम्ही....
करायला वाद दु:ख माझे रसाळ आहे!

किती खुबीने, दिलीस त्यांना जहाल मात्रा;
हरेक माणूस आज झाला मवाळ आहे!

कसा रमू मी? तुझी न काहीच गंधवार्ता;
तुझ्याविना श्वास श्वास झाला रटाळ आहे!

पुन्हा पुन्हा साचती ढिगांनी किती चिपाडे!
मनात माझ्या जणू स्मृतींचे गु-हाळ आहे!!

अशा कशा लेखण्या, कळेना, अटून गेल्या?
खरेच गेलाय काय त्यांचा विटाळ आहे?

मलाच मी देत देत खांदा जिवंत आहे....
मलाच ठाऊक की, किती मी ढिसाळ आहे!

खरेच दुष्काळ आज गझले, तुझाच आहे!
दिसायला आज फक्त दिसतो सुकाळ आहे!!

प्रकाश शोधीत हिंडलो मी प्रकाशवर्षे.....
अजूनही भेटली न मजला सकाळ आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसा रमू मी? तुझी न काहीच गंधवार्ता;
तुझ्याविना श्वास श्वास झाला रटाळ आहे!
वा!

चढेल चर्चेस रंग आता, बघाच तुम्ही....
प्रकाश धुंडाळण्यात गेली प्रकाशवर्षे.....
सहज मिसरे.

गझलेतलं मला फारसं (किंवा काहीच) समजत नाही म्हणून गझल विभागात मी प्रतिसाद देत नाही.
काव्यानंदाच्या अपेक्षेने फक्त गझला वाचतो.

प्रकाशवर्षे या शब्दाबद्दल काही सांगावसं वाटलं,
म्हणून प्रतिसाद द्यायचा प्रथमच प्रमाद करतोय.

शेवटच्या शेरातील ’गेली प्रकाशवर्षे’ या शब्दप्रयोगामुळे
’काळ लोटला’ असा अर्थ माझ्या अल्पमतीला जाणवला.
प्रकाशवर्ष हे अंतराचं माप आहे, काळाचं नव्हे.
शेरात ते काळासाठी वापरणं कितपत योग्य असा भा.प्र.

(जर माझ्या म्हणण्यात तथ्य असेल तर)
आणखी एक प्रमाद :
प्रकाश धुंडाळण्या लंघली प्रकाशवर्षे
किंवा
प्रकाश धुंडाळण्यास क्रमली प्रकाशवर्षे
असे वाचल्यावर मला बरे वाटले.

-----------------------------------------------------------------------------------------------
अवांतर :
माझ्या वयाची साठी उलटून गेल्याने, बुद्धी ’नाठी’ होण्यास जनमान्यता असल्याने
हे लिहिण्याचे धाडस केले आहे. Wink
क्षमस्व !

उल्हासराव!
धन्यवाद प्रतिसादाबद्दल!

प्रकाशवर्षे या प्रतिमेमधे खरे तर स्थळ(अंतर) व काळ हे दोन्ही अर्थ अपेक्षित होते. असो. आपल्या सूचनेबद्दल आभारी आहे.
शेर निसंदिग्ध व्हावा म्हणून अभिव्यक्ती थोडी बदलली आहे. आता हा शेर थेट व्हावा असे वाटते. आपले मत कळवावे!
शेर असा आहे..........

प्रकाश शोधीत हिंडलो मी प्रकाशवर्षे.....
अजूनही भेटली न मजला सकाळ आहे!

टीप:
एक प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाश जितके अंतर त्याच्या वेगाने प्रवास करतो तितके अंतर अशी व्याख्या आम्ही शाळेत इयत्ता ९वी तुकडी अ मध्ये शिकलो. सदर शेर लिहिताना ही व्याख्या आमच्या डोक्यात होती. प्रकाशवर्षे या प्रतिमेत अंतर व काळ हे दोन्ही अर्थ व्यक्त होतात असे वाटले होते. पण, दुर्दैवाने तसे वाचकांना वाटत नाही असे दिसले. म्हणून हा पुनर्लेखनाचा प्रपंच!
प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद!
असाच लोभ असू द्या!
गझलेतले आम्हास अजूनही कळत नाही. आम्ही रोज नवे नवे शिकत आहोत.
आपल्यासारख्या थोरांचा आशिर्वाद आहेच पाठिशी!
...........प्रा.सतीश देवपूरकर

प्रकाशवर्षे या प्रतिमेत अंतर व काळ हे दोन्ही अर्थ व्यक्त होतात असे वाटले होते. पण, दुर्दैवाने तसे वाचकांना वाटत नाही असे दिसले. म्हणून हा पुनर्लेखनाचा प्रपंच!<<<

असे कसे वाटेल वाचकांना? प्रकाशवर्षे यातून फक्त अंतरच व्यक्त होते. काळ व्यक्त होतच नाही मुळी.

काळही व्यक्त होतो हे गृहीतक चुकीचे आहे.

विषास अन् अमृतास कैसे करू निराळे?
हरेक पेला तसा चवीला मधाळ आहे!

पुन्हा पुन्हा साचती ढिगांनी किती चिपाडे!
मनात माझ्या जणू स्मृतींचे गु-हाळ आहे!! >>> आवडलेच....

भूषणराव!
आता बदलेला शेर कसा वाटत आहे? अजूनही काही त्रुटी असल्यास कळवावे.
टीप: एक बाळबोध शंका विचारू काय?
शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी......
या पाडगावकरांच्या सुंदर व लोकप्रिय गाण्यात शुक्र तारा असे कसे म्हटले आहे?
शुक्र तर ग्रह आहे. (planet )
ग्रह व तारा यातील फरक देखिल आपण शाळेतच शिकलेला असतो.
का कुणी शुक्र तारा या शब्दयोजनेला आक्षेप घेतला नसेल?
.........प्रा.सतीश देवपूरकर

भूषणराव!
आता बदलेला शेर कसा वाटत आहे? अजूनही काही त्रुटी असल्यास कळवावे.
टीप: एक बाळबोध शंका विचारू काय?
शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी......
या पाडगावकरांच्या सुंदर व लोकप्रिय गाण्यात शुक्र तारा असे कसे म्हटले आहे?
शुक्र तर ग्रह आहे. (planet )
ग्रह व तारा यातील फरक देखिल आपण शाळेतच शिकलेला असतो.
का कुणी शुक्र तारा या शब्दयोजनेला आक्षेप घेतला नसेल?
.........प्रा.सतीश देवपूरकर

शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी......
या पाडगावकरांच्या सुंदर व लोकप्रिय गाण्यात शुक्र तारा असे कसे म्हटले आहे?
शुक्र तर ग्रह आहे. (planet )
ग्रह व तारा यातील फरक देखिल आपण शाळेतच शिकलेला असतो.
का कुणी शुक्र तारा या शब्दयोजनेला आक्षेप घेतला नसेल?
.........प्रा.सतीश देवपूरकर<<<

हा फार जुना मुद्दा आहे.

शुक्राला तारा म्हणताच कसे असे काही कवी विचारतात.

पण यावर दोन ते तीन सुस्पष्ट समर्थने आहेत. ती खालीलप्रमाणे:

१. पहिले म्हणजे ती कवीकल्पना आहे, असे म्हणूनही नुसते सोडून देता येईल. पण तेवढेच (मी तरी) करणार नाही.

२. महत्वाचे कारण म्हणजे शुक्र या ग्रहावर पृथ्वीच्या तुलनेत ९० पटीने वातावरणाचा दाब अधिक आहे. म्हणजे आपण अटलांटिक महासागराच्या तळाशी उभे राहिल्यावर आपल्यावर जेवढा दाब येईल तेवढा दाब शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावरच येतो. याचा परिणाम असा होतो की सूर्यापासून शुक्रावर पडलेले किरण हे शुक्राच्या पृष्ठापर्यंत न पोचता तेथूनच परावर्तीत होतात आणि त्यामुळे शुक्र तेजस्वी दिसतो. इतका तेजस्वी की, प्रत्यक्षात परप्रकाशित ग्रह असूनही शुक्र तार्‍याप्रमाणे दिसतो.

३. शुक्र हा अंतर्ग्रह (पृथ्वी व सूर्य यांच्यामधील ग्रह) असल्यामुळे तो आकाशात दिसण्याचे प्रमाण व कालावधी इतर बहिर्ग्रहांच्या तुलनेत कमी असतो. (बुधाचा शुकाहूनही कमी असतो, कारण तो सूर्याच्या सर्वाधिक जवळ आहे). या कारणामुळे शुक्र हा ग्रह पहाटे किंवा सूर्यास्तानंतर काही काळ दिसतो. प्रियकर प्रेयसीच्या भेटीच्या कालावधीपैकी सूर्यास्तानंतरचा काळ सर्वात मधुर व पहाटेचा काळ लगेच येऊ घातलेल्या विरहाच्या छायेमुळे गडद झालेला असा असतो. (यामुळे शुक्राला प्रेमदेवता म्हणतात). यामुळे शुक्राला प्रेमी लोक तांत्रिकदृष्ट्या ग्रह म्हणत बसण्यात वेळ घालवत नाहीत. त्यांचे प्राधान्य असते त्या तेजाच्या साक्षीने अधिकाधिक प्रेम व्यक्त करणे!

उल्हासराव!
धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
प्रकाशवर्षे या प्रतिमेमधे खरे तर स्थळ(अंतर) व काळ हे दोन्ही अर्थ अपेक्षित होते. असो. आपल्या सूचनेबद्दल आभारी आहे
.” >>> सतीशराव, माझ्या प्रतिसादावर विचार केलात, खूप बरं वाटलं. आभारी आहे.

"आपल्यासारख्या थोरांचा आशिर्वाद आहेच पाठिशी!" >>>
मी काय आशीर्वाद देणार ? फक्त शुभेच्छा देऊ शकतो.
एक वय सोडलं तर बाकी सर्व बाबतीत मी इथल्या सर्वांपेक्षा लहानच आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
"प्रकाशवर्षे यातून फक्त अंतरच व्यक्त होते. काळ व्यक्त होतच नाही मुळी. " >>> बेफिकीरजींच्या या विधानाशी सहमत. प्रकाशवर्ष ही शास्त्रीय संज्ञा सामान्य भाषेत वापरली जात नसल्याने किंवा क्वचितच वापरली जात असल्याने तिचा शास्त्रीय अर्थच ध्यानात घेणे गरजेचे वाटते.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
बेफिकीरजी,
माझं वै.म. :
ग्रह, तारे हे शब्द सामान्य भाषेत सारख्याच अर्थाने वापरण्याचा (चुकीचा असला तरी) प्रघात आहे.
त्यामुळे "शुक्र तारा मंद वारा...." या ओळीतील शुक्रासाठी वापरलेला तारा हा शास्त्रीय दृष्ट्या चुकीचा
शब्द खटकत नसावा; ज्याप्रमाणे आपण चपलेत पाय घालत असलो तरी "पायात चप्पल घालणे" हा प्रघाताने वापरला जाणारा शब्दप्रयोग खटकत नाही.

असो..... रसभंगाला वाव देणारी ही रुक्ष चर्चा अधिक वाढविण्याची इच्छा नाही.

प्रकाशवर्ष हे अंतराचे परिमाण/एकक आहे, मान्य!
हे परिमाण अवकाशातील अवाढव्य अंतरे मोजायला वापरतात.
हे एक अंतराचे(distance) मोजमाप आहे, जे काळरूप संज्ञेमधे व्यक्त करतात,
म्हणजे प्रकाशवर्षे मधील वर्षे हा शब्द काळवाचक वाटतो ऎकल्या ऎकल्या!
प्रकाशवर्षे जाणे म्हणजे अमुक अमुक प्रकाशवर्षे अंतर जाणे, पार केले जाणे,
वगैरे..........इथे actually अंतरे हा शब्द अव्यक्त ठेवला आहे, असेही म्हणता येईल!
.............प्रा.सतीश देवपूरकर

प्रकाशवर्ष हे अंतराचे परिमाण/एकक आहे, मान्य!
हे परिमाण अवकाशातील अवाढव्य अंतरे मोजायला वापरतात.
हे एक अंतराचे(distance) मोजमाप आहे, जे काळरूप संज्ञेमधे व्यक्त करतात,
म्हणजे प्रकाशवर्षे मधील वर्षे हा शब्द काळवाचक वाटतो ऎकल्या ऎकल्या!
प्रकाशवर्षे जाणे म्हणजे अमुक अमुक प्रकाशवर्षे अंतर जाणे, पार केले जाणे,
वगैरे..........इथे actually अंतरे हा शब्द अव्यक्त ठेवला आहे, असेही म्हणता येईल!
.............प्रा.सतीश देवपूरकर

.

मयेकर Lol

काय आहे हे!

"प्रकाशवर्षे या प्रतिमेमधे खरे तर स्थळ(अंतर) व काळ हे दोन्ही अर्थ अपेक्षित होते"

भूशास्त्राच्या प्राध्यापकाने असं म्हणणं म्हणजे केवळ आपली चूक लपवण्याचा केविलवाणा हास्यास्पद प्रयत्न आहे.

अहो काय हे देवपूरकर! स्वतःची चूक मान्य करा की! इतका कसला कमीपणा? किती स्वतःचीच रीssss ओढत राहायची काही सीमा त्याला? बहुतेक माझं-तुमचं वय सारखंच असावं. पण हे तुमचं वागणं म्हणजे पोरकट आहे अक्षरशः. सावरा स्वतःला. मन मोठं करा..

के.गो.
इथे चूक होणे, न होणे याचा प्रश्नच नाही.
आम्ही आमचे प्रांजळ मत नोंदवले आहे.
चूक कबूल करण्याचे म्हणाल तर घडीघडीला चुका करून त्या मान्य करण्यात व सुधारण्यातच तर आमचा दिवस जातो!
आहो, इथेच काय विद्यार्थ्यांसमोरही आम्ही आमच्या चुका जाहीरपणे तात्काळ कबूल करतो! त्यात कसला आला आहे कमीपणा?
पण, त्याआधी तर्कशुद्ध चर्चेस आम्ही कधीच बगल मात्र देत नाही.
ते आमच्या स्वभावात नाही!
चुकांवरून आमचे दोन शेर आठवले, ते देत आहोत.........

जे चुकले ते चुकले, चुकणे स्वभाव माणसाचा;
चुकांतुनी शिकणारे तरले, बाकीचे बुडाले!

..............................................................................................

एक केली चूक अन् आयुष्य इतके फाटले....
की, पुन्हा हातून माझ्या ते न गेले टाचले!

.........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: प्रतिप्रतिसादाबद्दल धन्यवाद! असाच लोभ असू द्या!