मी नानांचा फॅन आहे. मी त्यांना अगदी मनसे काका मानतो ते मला पुतण्या मानतात कि नाही कुणास ठाऊक ! पण मी त्यांचा हनुमान आणि ते माझे नाना आहेत. नानांनी विविध प्रश्नांवर मतं मांडून शांत बसण्याच्या प्रवृत्तीवर वस्तरा चालवल्याने माझं मन छिन्नविछिन्न झालं आहे. बास झालं आता !!
नानांनी गेल्या वर्षी उपोषण केलं त्या वेळी नाना बिछान्यात आणि मी टीव्हीवर असायचो. टीव्हीवर सातत्याने बोलायचं असल्याने उर्जेच्या पुरवठ्यासाठी नानांची रसोई उपोषणस्थळाच्या मागेच सुरू केली होती. बाकि नानांनी कसा देश हलवून सोडला हे जसं देशाने टिव्हीवरून पाहीलं तसंच मी ही रसोईत बसून मुर्गमुसल्लम चापताना पाहीलं. पण पुढं काय ? पुढं काहीच झालं नाही.
मध्यंतरी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. नाना आमच्यावर नाराज झाले. आता पहिल्यासारखे लोक जमत नाहीत. २४ तास मेडीया कव्हरेज मिळूनही पुढच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. सरकार मधे (नानांसारखेच) बेरकी लोक असतील तर चर्चेला कुणाला पाठवणारच नाहीत. उपोषण कितीही दिवस चालू द्या.. दोन महीने जरी उपोषण चाललं तरी प्रॉब्लेम नाही... पण लोकांना संशय येईल ही भीती वाटते. म्हणून उपोषणाला बसणं बिसणं आता मान्य होत नाही. !!
आता कृती हवी. नुसते लिहून काही होणार नाही. ब-याच गोष्टी बदलायच्या आहेत. काही तरी केलं पाहीजे या विचाराने झोप उडाली. सगळा साधकबाधक विचार केल्यावर आपलंही पोट भरलं पाहीजे आणि लोकांचे प्रश्नही मार्गी लागले पाहीजेत असा एकच मार्ग समोर आला तो म्हणजे निवडणुकीचा...!
अनेक वर्षं माबोवर काढल्याने सामाजिक प्रश्नांची सखोल जाणीव आहेच.
सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीमचा भाग व्हा असं कुठल्यातरी मॅनेजमेंट गुरूने फेकलेलं दिलखेचक वाक्यं मनापासून पटलं. सिस्टीमचा भाग व्हायचं तर पवार ताब्यात हवेत.. माफ करा.. पॉवर ताब्यात घ्यायला हवी. म्हणूनच निवडणुकीला उभं रहायचं ठरवलं.
पण मनात हा विचार येतो न येतो तोच नानांनी राडेगण बुद्धी तून फतवा काढला कि माझा फोटु, नाव वापरायचं नाही. माझ्याच नावाची टोपी मलाच घालायची नाही. पण नानांची दुखरी नस ठाऊक असल्याने नाना नाराज झाले कि मी दोन कोटीचं आश्वासन दिलं. पुन्हा एक डाव माफ करा.. दोन खोटीच आश्वासनं दिली. नानांची नाराजी लगेच दूर पळाली आणि ते म्हणले तू टिब्बल च्या विरोधात लढ, मी पाठीशी आहे !
मग नानांच्या साक्षीने हळूच एक कागद बाहेर काढला. नाना म्हणलं " काय आहे हे? "
मी म्हणलं "जाहीरनामा !"
नाना म्हणले , "कसला ?"
मी म्हणलं " लोकसभेच्या निवडणुकीचा "
नाना चमकलं, म्हणलं " सरकार पडलं ?"
मी म्हणलं " तुमाला नसतं का कळलं ? अहो नाना, २०१४ च्या निवडणुकीचा जाहीरनामा आहे हा. "
नाना बोळक्याने हसले. आशिर्वाद दिला आणि टीव्हीच्या लोकांकडे निघून गेले. नानांमधे टीव्हीवाले टाईमपास करू लागल्याचं पाहून मी निमिष सौसौदिया कडं पाहीलं निमिषनं लगेच दोन चार फोन केले कि मेडीयाचे लोक नानांना वा-यावर सोडून माझ्याकडं आले.
२०१४ च्या माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्याबद्दल सौसौदियाने चांगलीच हवा केली होती. तरुण टीव्ही पत्रकारांना दम निघत नव्हता. मग आमच्यातर्फे जनरल बी के सिंग यांनी जाहीरनामा जाहीर केला. उद्या पेप्रात छापून येईलच पण मित्रहो, माबोकरांना विसरून कसं चालेल ? नाहीच विसरणार ! आमचा हा जाहीरनामा *** खास माबोकरांसाठी इथेही जाहीर करीत आहोत. आपल्या बहुमोल सल्ल्यांची आतुरतेने वाट पाहत आहे.
जाहीरनामा : माबोच्या प्रिय वाचकांसाठी !
१. निवडून आल्यानंतर पहिल्या तासातच जनलोकपाल मंजूर करणार. रामलीला मैदानावर लोकपाल कार्यालय थाटणार.
२. जनलोकपालवर लक्ष ठेवण्यासाठी गणलोकपाल आणणार (नानांना उपोषणाची संधी देणार नाही)
३. गणलोकपालवर लक्ष ठेवण्यासाठी (कि)रणलोकपाल (बेदींची) आणणार
४. किरणलोकपालवर लक्ष ठेवण्यासाठी (भू)षण लोकपाल आणणार ..
५. संसद बरखास्त करून भारत देश विश्वस्त संस्थेकडे सोपवणार. ही विश्वस्त संस्था "चांगल्या" लोकांची असेल. उदा इंडिया अगेन्स्ट करेक्शन. विश्वस्तांवर विश्वास असल्याने राज्यघटनेची गरज राहणार नाही. विश्वस्त ही कायमस्वरुपी संस्था असेल आणि तिचे अध्यक्ष तहहयात या पदावर असतील. विश्वस्तांचे नाव अथवा आडनाव क वरून सुरू व्हावे ही महत्वाची अट असेल.
६. लोकपालामधेच बिनीचे मोहरे अडकल्याने विश्वस्त संस्थेतर्फे सरकार चालवायला देणार. सरकार चालवण्यासाठी दर पाच वर्षांनी जागतिक निविदा काढणार. यामुळे निवडणुकीवरचा खर्च बंद होऊन उलटपक्षी महसूल मिळेल.
७. पेट्रोलचे भाव दोन रुपये लिटर करणार
८. जीवनावश्यक वस्तू महिन्याला ३८ रुपयात देणार
९. श्रीमंतांची संपत्ती जप्त करून तिचं देशप्रेमी नागरिकांमधे (उदा. यमक गांधी ) समान वाटप करणार.
१०. प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी देणार. यासाठी ज्या कुटुंबात एका पेक्षा जास्त सदस्य नोकरीत आहेत त्यांची सेवा बरखास्त करणार.
११. भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येची कामे त्वरीत व्हावीत यासाठी चिरीमिरी कायदेशीर करणार.
१२. पोलीस खात्यामुळे भ्रष्टाचार वाढत असल्याने हे खाते बंद करण्यात येईल. संपत्तीचे समान वाटप केल्याने या खात्याची गरज राहणारच नाही.
१३. म. नाना पगारेंचा (उपोषणकालीन) स्टीलच्या ग्लासातून पाणी पितानाचा फोटो नवे राष्ट्रपिता म्हणून नोटांवर छापण्यात येईल.
१४. सांस्कृतिक कार्यक्रम राबवणार. ओढणीनृत्यास चालना देण्यात येणार.
१६. शासनातर्फे स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाईल. त्यासाठी घर तिथे असीम आनंद शौचालयाची योजना राबवली जाईल.
१७. ग्रामसभा /खापपंचायतीं/नाना/लोकपाल आदींचे आदेश सर्वोच्च करणार. न्यायपालिका बरखास्त करणार.
१८. राष्ट्रपती भवन राडेगण बुद्धीला हलवणार. मंत्र्यांना मोठी घरे देण्यात येणार नाहीत. आमचे देशप्रेमी वास्तुविशारद नसीम त्रिवेदी यांच्या गाजलेल्या रचनेप्रमाणे आकार असणारी घरे मंत्र्यांना राहण्यासाठी देणार.
१९. प्रत्येक गावात मंदिर बांधणार. काचेच्या ग्लासातून दारु पिऊन येणा-यास मंदिराच्या खांबाला बांधून हाणणार.
२०. लांडगे आणि भटकी कुत्री यांसारख्या महत्वाच्या प्राण्यांची राष्ट्रीय स्तरावर विशेष देखभाल करण्यात येईल. त्यासाठीच नाना पगारेंच्या विरुद्ध बाजूला लांडग्यांचा वॉटरमार्क छापण्यात येईल. दिल्लीतल्या एका विशेष वास्तूत देशभरातली भ.कु. आणून ठेवण्यात येतील. नसीमजींच्या इच्छेप्रमाणे याच वास्तूत मध्यभागी नानांचा छोटासा पुतळा बसवण्यात येईल.
२१. नामदेव बाबा यांना राष्ट्रसंत म्हणून घोषीत करणार.
२२. मेडीकल कॉलेजेस बंद करणार. अॅलोपॅथीवर बंदी आणणार. संत्रांजली योगपीठातर्फे गाव तेथे योगविद्या या उपक्रमास आर्थिक मदत करणार.
२३. भारतरत्नाऐवजी मेगॅसेसे पुरस्कारास सर्वोच्च पुरस्कार म्हणून मान्यता देण्यात येणार. महत्वाच्या ठिकाणी नेमणुकीसाठी मेगॅसेसे अनिवार्य करणार.
२४. दुस-या स्वातंत्र्ययुद्धाचे धडे इतिहासाच्या पुस्तकात घालणार.
२५. रामलीला संग्रामावर आधारीत "नाना बाबा आणि चाळीत मोर" या माहीतीपटाची निर्मिती करणार.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
<फॉण्टसाईज>६
*** लोकांनी खरंच निवडून दिल्यास परिणामांना आम्ही जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. मागाहून तक्रारी चालणार नाहीत.
- Kiran..
अरे अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठ
अरे
अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढणारे, कपिल सिब्बलांच्या विरोधात व्यंगचित्रं एकमेकांना पाठवणारे लोक ते हेच का ? असीम त्रिवेदीच्या अटकेवेळी कळवळलेले लोकही हेच का ? मग किरण चव्हाण यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं काय ? कि ठराविक अजेंडा असेल तरच तिला अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणायचं ?
बरं असीम त्रिवेदीच्या ज्या चित्रांसाठी ही कोमल हृदयं कळवळली त्या एका तरी चित्रात नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, बंगारू लक्ष्मण यांची व्यंगचित्रं होती का ? ज्या केजरीवालांसाठी लोक इथे विव्हळताहेत त्यांचा तर उल्लेखही मला इथे आढळला नाही. हे व्यंग आहे. व्यंगावर हसायला आवडतं ना लोकांना ? कि ते ही सोयीने ? दांभिकपणा ठासून भरलेली हीच लोकं केजरीवालांच्या अवतीभवतीही आहेत.
असीम त्रिवेदीच्या व्यंगचित्राखाली जर खान, कुरेशी, शेख अशी सही असती तर हेच लोक त्याला देशद्रोही म्हणायला सर्वात आधी पुढे आले असते. मूठभर लोक आहेत हे. हे म्हणजे देश आणि यांच्या अजेण्ड्याच्याविरुद्ध काही झाले कि देशद्रोहाची हाकाटी हेच करणार. राज्यघटनेवर कुत्रं लघवी करतं हा राज्यद्रोह आहेच. हा कायदा चित्रं काढायच्या आधी चित्रकाराला ठाऊक नव्हता का ? हा प्रश्न दुस-या एका बाफवर अद्याप निरुत्तर आहे. कात तर म्हणे कायदे बदला. पण कायदा अस्तित्वात असताना तो मोडला गेलाच कि. त्रिवेदीने कायदा मोडला म्हणून तो जुना आणि शेख, खान, यादव, पाटील, कांबळे यांनी मोडला तर देशद्रोह का ? कै च्या कै !
त्रिवेदीच्या एकाही व्यंगचित्रात मला राजकारणी व्यक्तींवर भाष्य दिसलेलं नाही. त्याने भाष्य केलंय ते राज्यघटना, संसद आणि आपली लोकशाही प्रणाली यावर. अरविंद केजरीवालचे आरोपसत्र या विषयावर मी त्याबद्दल लिहीलेच आहे. ज्या सामाजिक व्यवस्थेचा पाया भ्रष्टाचारावर उभा आहे ती व्यवस्था बदलण्याचं आव्हान हे सर्वात मोठं असताना व्यवस्था परिर्वर्तनाचा अर्थ हा फक्त राजकिय परिवर्तन असा लिमिटेड करण्यासाठी केजरीवालांची नेमणूक झालेली आहे. त्यांना ना मतं पडणार, ना ते निवडणुकीत कुणाला त्रास देणार. पण कुणालातरी हवं तसं वातावरण निर्माण करून देणं हे त्यांचं काम असावं. त्यांचा ज्यांना पुळका आलाय त्यात खरंच काही भ्रष्टाचाराची लढाई चालू आहे म्हणून आलेले लोक असतील. पण ज्याप्रमाणे अयोध्येतलं आंदोलन हे फसवं होतं आणि हिडन अजेंडा भलताच होता हे नंतर लक्षात आलं तसं आताही होणार आहे.
लोक का त्वेषाने तुटून पडताहेत हे समजणे अवघड नाही. पण व्यंगाबाबतचा ढोंगीपणा समोर आला हे चांगलं झालं. अनेक धन्यवाद मानले पाहीजेत यासाठी.
दुसर्या वर बोललेले चालते
दुसर्या वर बोललेले चालते यांना...... स्वतःवर कोणी बोलले की लगेच बेंबीच्या देठापासुन बोंबा मारायला लागतात ......
बिनआयडीचे खाते, >> मग किरण
बिनआयडीचे खाते,
>> मग किरण चव्हाण यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं काय ?
अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हंजे स्वतंत्रपणे व्यक्त होण्याची मोकळीक. स्वतंत्र म्हणजे काय? तर स्वतंत्र म्हणजे स्व + तंत्र. म्हणजेच स्वत:ची अशी पद्धत (सिस्टीम). तर ही पद्धती काय आहे हेच मला जाणून घ्यायचं आहे. ही पद्धती वापरून लेखकास काय ध्येय साध्य करायचंय याविषयी माझ्या मनात सुस्पष्ट कल्पना नाही.
म्हणून लेखकाला विषय स्पष्टपणे मांडण्याची विनंती केली आहे. यात त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला कुठे घातलाय?
आपला उर्वरित प्रतिसाद विषयांतर आहे.
आ.न.,
-गा.पै.
तुमच्या कंपूचे हसू आले. खो.
तुमच्या कंपूचे हसू आले.
खो. खो. खो.
बाकी उद्या हसेन.
अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हंजे
अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हंजे स्वतंत्रपणे व्यक्त होण्याची मोकळीक. स्वतंत्र म्हणजे काय? तर स्वतंत्र म्हणजे स्व + तंत्र. म्हणजेच स्वत:ची अशी पद्धत (सिस्टीम). तर ही पद्धती काय आहे हेच मला जाणून घ्यायचं आहे. ही पद्धती वापरून लेखकास काय ध्येय साध्य करायचंय याविषयी माझ्या मनात सुस्पष्ट कल्पना नाही.
म्हणून लेखकाला विषय स्पष्टपणे मांडण्याची विनंती केली आहे. यात त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला कुठे घातलाय? >>>
संपूर्ण पोस्ट हास्यास्पद आहे. उद्या पुलंनी काढलेल्या चिमट्यांबद्दल त्यांना स्पष्टीकरणं विचारत फिराल. दुर्दैवाने ते हयात नाहीत आज. पण उदाहरण कळेल ही अपेक्षा. त्यांनी ज्यांना ज्यांना चिमटे काढले त्यांनी ते खिलाडूवृत्तीने घेतलंय. केजरीवालांचा तर इथे उल्लेखही नाही पण तुम्ही का अस्वस्थ होताय ? केजरीवाल म्हणजे कुणी महात्मा नव्हेत कि ज्यांच्याबद्दल विनोदी लिहीले जाऊ नये. संघाच्या वर्तुळातून कुणाची टवाळी केली जात नाही ? म्हणजे स्वतःचे लोक सोडून कोण शिल्लक ठेवलेत त्यांनी याचा विचार तुम्ही कशाला करा म्हणा.
इथे गटार वगैरे सारख्या प्रतिक्रिया वाचल्या आणि खरच आश्चर्य वाटलं.
काही अतिहुशार लोकांना "विनोद"
काही अतिहुशार लोकांना "विनोद" देखील समजावून सांगावा लागतो....:हाहा:
बिनआयडीचे खाते, >> उद्या
बिनआयडीचे खाते,
>> उद्या पुलंनी काढलेल्या चिमट्यांबद्दल त्यांना स्पष्टीकरणं विचारत फिराल. दुर्दैवाने ते हयात नाहीत आज.
>> पण उदाहरण कळेल ही अपेक्षा. त्यांनी ज्यांना ज्यांना चिमटे काढले त्यांनी ते खिलाडूवृत्तीने घेतलंय.
पु.लं.नी चिमटे काढलेले होते. पण जयप्रकाश नारायण, मोहनदास गांधी यांना कधीच लक्ष्य बनवले नाही. अगदी नेहरूंनासुद्धा नाही. कोणाची टिंगल करावी आणि कोणाची करू नये याबद्दल तुमचे आणि माझे विचार जुळत नाहीत. माझा मुद्दा लेखकाला कळला असेल अशी आशा आहे.
हामाशेप्र.
आ.न.,
-गा.पै.
उदयन.., >> काही अतिहुशार
उदयन..,
>> काही अतिहुशार लोकांना "विनोद" देखील समजावून सांगावा लागतो....हाहा
तुमचं निरीक्षण अगदी समर्पक आहे! आता बिनआयडीचे खाते यांना समजावून सांगा की लेखाची सुरुवात केजरीवाल यांना प्रथम पुरुषी कल्पून झाली आहे. त्यांना के.चा उल्लेख लेखात सापडत नाहीये म्हणे!
आ.न.,
-गा.पै.
टीप. : बिनडोकपणा म्हणजे काय ते मी सांगत बसत नाही. आपणही फार वेळ विचार करू नये!

हे पन पहा. पाहिलम प्रतिक्रीया
हे पन पहा. पाहिलम
प्रतिक्रीया एकदम उलट्याच्य पालट्य आहेत राव.
ओ गामा पैलवान, तुम्हि आनि ते मिर्चिवाले पैलवान एकच का ?
एकदा अण्णांच भाषण ऐकल होत.
एकदा अण्णांच भाषण ऐकल होत. "सामजीक कार्य करताना वेड होऊन काम कराव लागत. लोक डोक्यावर घेतात तसच शिव्याशापही देतात.बाळासाहेब ठाकरे मला वाकडतोंड्या म्हणतात. मी त्याच वाईट वाटुन घेत नाही. वाईट वाटल तर मला कामच करता येणार नाही"
अण्णा, अरविंद केजरीवाल यांची खिल्ली कुणी उडवली तर मला वाईट वाटणार नाही पण आड-पडद्याने आपल्याला कोणी थट्टा केली तर मात्र मन नाराज होत. सरकार हलवण्याची क्षमता असलेला एकही माणुस आपल्यानंतर दिसत नाही. भारतीय परंपरेत राजापेक्षाही उच्च स्थान साधु - संत आणि गुरु यांना देण्यात आलेल आहे. याच एक कारण म्हणजे न भिता राजा तु चुकलास हे सांगण्याची शक्ती. माझ्यामते आपल हे स्थान आहे. महात्मा गांधी - विनोबा भावे यानंतर आपण अशी ही परंपरा आहे.
दु.कानतोडे, >> ओ गामा पैलवान,
दु.कानतोडे,
>> ओ गामा पैलवान, तुम्हि आनि ते मिर्चिवाले पैलवान एकच का ?
मी मिर्ची नव्हे. माबोवर माझा कुठलाही डुआय नाही.
आ.न.,
-गा.पै.
मी मिर्ची नव्हे. माबोवर माझा
मी मिर्ची नव्हे. माबोवर माझा कुठलाही डुआय नाही.
..........................हे मला का सान्गता ?
Pages