Submitted by poojas on 29 January, 2008 - 02:45
विसरायाचे आहे सारे स्मरु कशाला.. ??
आठवणींच्या रिक्त पोकळ्या.. भरु कशाला ..??
घडून गेले बरेच ... तरीही घडते आहे...
गतकाळाच्या सुप्त सावल्या... धरु कशाला..??
कळले जेव्हा चुकले.. तेव्हा शहाणी झाले..
व्यर्थ चुकांचे हिशोब पुन्हा.. करु कशाला..??
स्वैर मनाचे विचार आता.. जाणीन म्हणते..
चाकोरीतील सक्त बंधने.. धरु कशाला..??
आता कुठेशी धडपडते..मी जगण्यासाठी..
घटका घटका श्वास मोजुनी.. मरु कशाला..??
गुलमोहर:
शेअर करा
छानच
छान आहे कविता. तुझ्या कवितांमधली लय आणि समंजसपणा नेहेमीच भावतो. लिहीत रहा.
तुझ्या प्रेमात...
तुझ्या कवीता वाचुन हळुहळु तुझ्या कवीतांच्या आणि पर्यायाने तुझ्या प्रेमात पडत चालले आहे...मनस्वी कवीता...लिहित रहा.:-)
सुंदर!!!
खूप सुंदर जमली आहे. गझलचा फॉर्म आहे का?
धन्यवाद..
मनःपुर्वक धन्यवाद.. सर्वांना !!
आणि हो.. फक्त स्तुती नव्हे तर.. टीका सुद्धा करा..!!
तुर्तास मला , suggestions ची गरज आहे .. कारण मी ब्लॉग तयार केलाय...
i mean.......work is in progress...
plz visit..
http://poojasawant.blogspot.com/
चांगली सुरवात
पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.
छान
स्वैर मनाचे विचार आता.. जाणीन म्हणते..
चाकोरीतील सक्त बंधने.. धरु कशाला..??
आता कुठेशी धडपडते..मी जगण्यासाठी..
घटका घटका श्वास मोजुनी.. मरु कशाला..??
धीट आहेत ओळी. कविता आवडली.
पु. ले. शु.
छान आहे
आता कुठेशी धडपडते..मी जगण्यासाठी..
घटका घटका श्वास मोजुनी.. मरु कशाला..??
आवडलं