कधीतरी....

Submitted by mess-age on 27 April, 2009 - 00:10

कधीतरी
माझ्या चेहर्‍याचा एक नट प्रसिद्ध पावेल
आणि प्रतिष्ठा मला लाभेल

कधीतरी
माझ्या चेहर्‍याचा एक गुरु या गर्दीत मिसळेल
आणि लोक मलाच नमस्कार करतील

कधीतरी
माझ्या चेहर्‍याचा एक ईश्वर उगवून येईल
आणि भाविक माझ्याच नावाने उपवास करतील

कधीतरी
माझा चेहरा एक खरी भाषा बोलेल
आणि लोक मला कवी म्हणून ओळखतील

फुटपाथवरुन मी चालताना
लोक म्हणतील
" अरे तो बघ नट
तो बघा, अवतार गुरुचा
तो बघा, साक्षात्कार ईश्वराचा
तो बघा कवी

अरेरे,
सोंग वठवताना
किती केविलवाणा दिसतो तो !"

- संदेश ढगे

गुलमोहर: 

हा हा हा......छान.............
अरेरे, सोंग वठवताना किती केविलवाणा दिसतो तो !"..............सही.........!!
सुहास शिन्दे

स्मारकपेक्षा ही आवडली.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

'स्मारक'मध्ये मला काहीतरी मिसिंग वाटलं. विशेषतः
बाजुला कुंपण होते, समंजसपणे बांधलेले
समोर काही आधीच माना तुकवून पाठीतून वाकलेले
वाटले, ह्याच्या हातात शस्त्र आहे म्हणून हा हिंस्त्र वाटतो.
या ओळींमध्ये.
एरवी ती कविता उत्तम काही असल्याची क्षमता दाखवते. पण त्या मिसिंग लिंकमुळे तिच्यापेक्षा ही सरस वाटते.
आता अशी तुलना करावी की नको? प्रश्नच आहे. पण तुलना ही मनोमन होतेच. त्यामुळे ती व्यक्त न करण्याचा मुत्सद्दीपणाच फक्त आपण करू शकतो. तो मी नाही. त्यामुळे मीही मोकळेपणाने तुलनात्मक मत मांडले.
स्वाती यांना धन्यवाद. दोन्ही कविता पुन्हा पुढे आणल्याबद्दल.

अभिनंदन. शेवट चांगला आहे.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

खुप छान!!
**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

फारच छान कविता आहे आणि कळायलाही सोपी . शेवट तर सुरेखच आहे. स्मारकसुद्धा चांगली आहे पण थोडी जड. दोन्ही कवितांबद्दल अभिनन्दन !!

superb!!!!मलाही ही स्मारकपेक्षा जास्त आवडली.

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************