मी असा कसा वेगळा.....

Submitted by हायझेनबर्ग on 10 October, 2012 - 15:31

मी माझ्या बाबांवर गेलो आहे.
मला माझ्या आर्मीतल्या काकासारखं व्हायचं आहे.
मी ही सवय माझ्या आजीकडून घेतली.
'अब्दूल कलाम' माझा आदर्श आहेत.
मुंबईच्या पावसानंतर माझं आयुष्यं बदललं.
'ब्लड डायमंड' सिनेमानंतर मी हिरे वापरणं सोडून दिलं.
स्वदेसपासून प्रेरणा घेऊन मी अमेरिका सोडून भारतात गेलो.
तिबेटला जाऊन आल्यापासून मी बौद्ध धर्माचा अभ्यास चालू केला.
पहिल्याने वडिलोपार्जित घराला/गावाला भेट दिल्यानंतर माझा दृष्टीकोनच बदलला.
आजोबां गेल्यानंतर मी वृद्धाश्रमातून आजोबा दत्तक घेतले.
सत्यमेव जयते बघून मी स्त्री भ्रूण हत्येविरोधात काम करणार्‍या संस्थेत रुजू झालो.

अश्या एक ना अनेक गोष्टी.

कुठल्या घटना, कुठल्या व्यक्ती, कुठली कलाकृती, कुठला प्रवास, कुठलं भाषण, कुठलं पुस्तक, कुठली जागा?

कोणी तुम्हाला काही करण्यासाठी ऊद्युक्त केले आहे?
कश्याने तुम्ही प्रेरित झाला आहात?
कशामागे तुम्ही झपाटून पडला आहात?

प्रत्येकाचेच पूर्ण आयुष्यं किंवा आयुष्याचा काही काळ एखाद्या किंवा अनेक गोष्टींनी (घटना, व्यक्ती, शहरं) प्रेरीत किंवा चांगल्या रितीने (वाईटानंतरही चांगलेच येते) ईन्फ्ल्यूएंस/अ‍ॅफेक्ट (नेमका मराठी शब्द आठवेना) झालेला आहे.
मागे वळून पाहतांना मी कसा बनलो आहे किंवा मी असाच का आहे.. हा प्रश्न पडतो आहे का?

हनुमानाला म्हणे त्याच्या शक्तीची आठवण करून दिल्याशिवाय पराक्रम करता येत नसे?
कश्यात आहे माझी शक्ती?

काही कारणाने ह्या गोष्टीचा गंभीर विचार करण्याची संधी मिळाली आणि जे काय गवसले ते गवसतांनाचा अनुभव अप्रतिम होता. ट्रेझर हंट, कनेक्टिंग डॉट्स, सीईंग बिग पिक्चर असे बरेच काही करत ऊमगले आपण वेगळे आहोत.

प्रत्येकजणच कुणासारखं तरी/ काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतो आहे, तरी प्रत्येक जणच वेगळा आहे. जर आपल्या वेगळेपणाबद्दल आपल्याला काही लिहावेसे वाटले तर वाचायला नक्की आवडेल.

* ह्या धाग्यासाठी नेमका ग्रूप सापडला नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली कल्पना आहे चमन. फक्त स्वतःच्या एखाद्या वेगळेपणाबद्दल लिहायला लोकांना कम्फर्टॅबल वाटेल की नाही माहित नाही. Happy

>> चांगली कल्पना आहे चमन

+१

बुवा, मला वाटतंय बहुतेक लोकांनां स्वतःबद्दल चांगलं वाटणार्‍या गोष्टी लिहीताना अडचण वाटणार नाही ..

बुवा,
बॉलिवुडमध्ये राहूनही वेगळा दिसणारा एखादा अमीर खान असतो त्याचं वेगळेपण त्याच्या कामांमुळे आहे. चारचौघांसारखा तोही कलाकारच पण त्याचे काही विचार, त्याची पॅशन त्याला गर्दीतून वेगळा करतात.

माझ्याकडेही आहे असं काहीतरी, अगदीच क्षुल्लक जे फार महत्वाचंही नसावं पण मला माहितीये ते मला डीफाईन करतं आणि म्हणूनच ते काय आहे हेच जाणून घ्यायचं आहे.

मी (म्हणजे मी नाही) करतो घड्याळ लाऊन ५ मिनिटात रुबिक क्यूब सॉल्व!!! काय महत्त्व आहे त्याचं? काहीच तर नाही. जगात दहा सेकंदात करणारेही असतील? पण माझ्या आजूबाजूच्या गर्दीत किती लोकं ५ मिनिटात करू शकतात? कदाचित एखादा असेन.
कसा पोहोचलो मी पाच मिनिटांपर्यंत. वीस मिनिटांपासून पाच मिनिटांपर्यंतचा प्रवास माझ्या पॅशनला आणि मला डीफाईन करून गेला. एक वेगळेपण देऊन गेला.

भलेही मी आमीर खान नसेन, भलेही मी आर्मस्ट्राँगसारखं कॅन्सरमधून ऊठून जग जिंकलं नसेन, पण माझ्यात काय वेगळं आहे आणि असं काय मी पॅशन म्हणून जोपासलं आहे हे आपलं आपल्याला ऊमगलं तरी हनुमानासारखी आपल्याला आपल्यातल्याच एका शक्तीस्थळाची जाणीव झाल्यासारखं आहे असं मला वाटतं.
व्यक्तीमत्वाचाच एखादा भाग वेगळा नसेलही पण 'आपले काम' ज्याचा व्यक्तीमत्व घडवण्यात मोठा वाटा आहे तेही आपला वेगळेपणा दाखवून देऊ शकते.

उत्तम धागा आहे,
काही कारणाने ह्या गोष्टीचा गंभीर विचार करण्याची संधी मिळाली आणि जे काय गवसले ते गवसतांनाचा अनुभव अप्रतिम होता.>>> एखादे उदाहरण देशील?