अधिवेशनामागचे चेहरे : अदिती टेलर

Submitted by अजय on 8 October, 2012 - 16:15

बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाच्या संयोजनात सक्रीय असणार्‍या, सौ. अदिती टेलर यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.

नमस्कार अदिती, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १६ व्या अधिवेशनाच्या संयोजनात तुमची भूमिका काय आहे?
मी अधिवेशनाची उप संयोजक आहे आणि संपूर्ण प्रोग्रामिंगची मुख्य आहे यात ५ वेगवेगळी क्षेत्रे येतात. India programming, north american programming, BMM Saregama, Youth program, kids and teen programming.

तुमच्या विभागातली ताजी खबर काय सांगता येईल.

सगळ्यात ताजी खबर म्हणजे बीएमएम सारेगम २०१३ स्पर्धेला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. या स्पर्धेची सुरुवात अगदी दणक्यात गेल्या शनिवारी बॉस्टनपासून सुरु झाली आहे. बाकीची महाराष्ट्र मंडळेही जोरात तयारीला लागली आहे.

aditi_1.jpgबीएमएम सारेगम २०१३ स्पर्धा प्रथमच उत्तर अमेरिकेत अशा मोठ्या स्तरावर काम करतो आहोत. उत्तर अमेरिकेतल्या कलाकाराना Prime Time मधे , ४ हजार प्रेक्षकांसमोर वाव देणार आहोत. सारेगमच्या वेगवेगळ्या फेर्‍यांमधून जाऊन जे कलाकार तावुन सुलाखून निघतील त्यांना सगळ्या उपस्थितांसमोर गायची संधी मिळणार आहे. उत्तर अमेरिकेतल्या १२ शहरातून याच्या प्राथमिक फेर्‍या होणार आहेत आणि ६ उपांत्य फेर्‍या होणार आहेत.

आजवर आपण TV वर बघीतलं असेल तसाच हा कार्यक्रम आहे. पण स्पर्धक उत्तर अमेरिकेतले असणार आहेत. कार्यक्रमाची प्राथमिक फेरी बॉस्टन, न्यूयॉर्क, रॅले, रिचंमड, टँपा, डॅलस, सॅनफ्रॅसिस्को, एले, सिअ‍ॅटल, सेंट लुईस, टोरांटो, डेट्रॉईट या शहरात सप्टेंबर ते डिसेंबर मधे होईल. १० डॉलर नाममात्र फी भरून कुणीही यात भाग घेऊ शकतं. इथे http://www.bmm2013.org/cultural-program/saregama.html अधिक माहिती मिळेल.
प्राथमिक फेरीतल्या सर्वोत्कृष्ट ३ कलाकारांना उपांत्य फेरीत जाता येईल. उपांत्य फेरी ६ ठिकाणी होईल. उपांत्य फेरीच्या जागा ठरायच्या आहेत पण काही पूर्व किनार्‍यावर , काही पश्चिम किनार्‍यावर आणि १ मधे अशा ठिकाणी उपांत्य फेरी होईल. मग यातल्या ६ कलाकारांना Grand Finale ला जाता येईल आणि तो Grand Finale , अधिवेशनात असणार आहे. या अंतीम फेरीला साथ करण्यासाठी Zee TV वर आपण जे कलाकार बघतो, म्हणजे कमलेश भडकमकर यांचा वाद्यवृंद संच, त्यांचं नक्की यायचं झालं आहे. ते थोडे अगोदर येऊन अंतीम फेरीच्या कलाकारांबरोबर सरावही आणि सादरीकरणासाठी मार्गदर्शन करतील. ज्यांचं संगिताच्या क्षेत्रात नाव आहे असे दिग्गज कलाकार परिक्षक म्हणून असतील.

म्हणजे उत्तर अमेरिकेतल्या गायक कलाकारांना एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे.

अगदी बरोबर. हा कार्यक्रम उत्तर अमेरिकेतल्या लोकांनी उत्तर अमेरिकेतल्या लोकांसाठी केलेला आहे. भारतातले कलाकार येणार आहेतच पण स्थानिक कलाकारांनाही एक मोठं व्यासपीठ मिळावं असा याचा उद्देश आहे.

अधिवेशनाव्यतिरिक्त तुमचा नेहमीचा व्यवसाय किंवा कार्यक्षेत्र कुठलं?
मी कन्सल्टींग मधे काम करते. Deloitte and Touche मधे सिनियर मॅनेजर आहे. मी Life Sciences, Pharma, BioTech या क्षेत्रात Regulatory Compliance Consulting करते. याच वर्षी मला Deloitte मधे काम करून १३ वर्षे होतील.

काही वर्षांपूर्वी तुम्हाला एक खास पारितोषिक मिळालं होतं, त्याबद्दल थोडं सांगणार का?
40 Under 40. दरवर्षी Boston Business Journal अशा ४० जणांची यादी काढतं की जे बॉस्टनच्या उद्योगक्षेत्रातले उगवते तारे आहेत. त्या यादीत २००९ मधे माझी निवड झाली होती.
http://www.bizjournals.com/boston/stories/2009/10/05/focus41.html?page=all

आपले सगळ्यांचेच आपल्या शाळा कॉलेजाबरोबर ऋणानुबंध असतात. तुमच्या काही आठवणी सांगता येतील का?

माझी शाळा किंग जॉर्ज , हिंदू कॉलनी दादर. ११-१२ वी ला मी रुपारेल ला होते. आणि नंतर रूईया कॉलेजातून अर्थशास्त्राची पदवी घेतली. मग बॉस्टनमधे बेंटली विद्यापीठात MBA केलं. तेंव्हापासून Deloitte मधे आहे. शाळेत अगदी पहिल्या इयत्तेपासून ते कॉलेजातल्या TYBA पर्यंत मला भरपूर काय काय करायला मिळालं. असं कधीच वाटलं नाही, हे करायचं होतं पण वाव मिळाला नाही. रुईया कॉलेजमधे असंच "उत्सव" नावाचं एक संमेलन भरतं जे आज ३० वर्षे चालू आहे. इथे BMM मधे आपले एकाच वेळी ३ ट्रॅक्स असणार आहेत. आम्ही ९० करायचो. मी एका वर्षी त्याचं पूर्ण संयोजन संभाळलं होतं. आणि रुईयाच्या इतिहासातली मी पहिला महिला संयोजक होते. परवात गप्पात उल्लेख निघाला की तेंव्हाचे रुईयाचे ट्रस्टी, आर टी साने , हे आपल्या अधिवेशनाचे प्रायोजक असलेल्या कॉसमास बँकेचे चेअरमन श्री बुगदे यांचे खूप चांगले मित्र आहे. It is a small world.

हा लेख वाचणारे जे मायबोलीकर आहेत त्यांच्या कडून काय मदत होऊ शकेल.
मायबोलीच्या माध्यमातून या अधिवेशनाची माहिती आणि अधिवेशनाचं सूत्र "ऋणानुबंध" आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता आलं तर खूप छान होईल. अधिवेशनात उत्तर अमेरिकेतल्या मराठी माणसांसाठी काही खास कार्यक्रम असणार आहेत त्यात मायबोलीकरांनी भाग घेतला तर आपल्या "ऋणानुबंध" या थीमचं ते एक मोठं यश असेल.

बरीच कामं सुरु आहेत, बरेच निर्णय होतायत. त्यात पडल्याशिवाय हे केवढं मोठं शिवधनुष्य आहे हे कळत नाही. या मागे बर्‍याच लोकांची खूप मेहनत आहे. मी मायबोलीकरांना आग्रह करीन की जरूर अधिवेशनाची वेबसाईट मधून मधून बघा. तुमच्या मित्रमंडळीना त्याची माहिती द्या. तुमच्या गावातल्या सारेगम स्पर्धेत भाग घ्या. आधी म्हटल्याप्रमाणे हे अधिवेशन आपणच आपल्या लोकांसाठी करतो आहोत. त्यामुळे स्थानिक पातळीवर (उत्तर अमेरिकेतून) जितका सहभाग मिळेल तितका आपल्याला हवाच आहे.

तुमच्या इतक्या धावपळीतून मायबोलीसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

अधिवेशनाची अधिकृत वेबसाईट.
http://www.bmm2013.org

अधिवेशनाचं अधिकृत फेसबुक पान.
https://www.facebook.com/bmm2013

नव्या बांधुया रेशिमगाठी, जपण्या अपुली मायमराठी !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सग़ळ्यांना धन्यवाद !
आर्च, आपण आतापर्यंत बहुतेक ३-४ अधिवेशनात तरी एकाचवेळी उपस्थित राहिलो असू. पण तुमची अजून भेट झाली नाही. अनेक मायबोलीकर तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत. आता मायबोलीच्या माहेरी असलेल्या अधिवेशनात तरी तुमची भेट व्हावी अशी आमचीही अपेक्षा वाढली आहे Happy

मस्त ओळख. धन्यवाद अजय Happy
कमलेश भडकमकरांचा संच येणार हे फारच ग्रेट. अतिशय सुरेख वाजवतात ही सगळीच मंडळी. गाणं खुलून येतं अगदी. गाणार्‍याचा परफॉर्मन्स अजून वर जातो सुंदर साथ असली की Happy

@आर्च
भेट झाली तर आवडेलच. पण ते भेटावं लागेल म्हणून, "जर तर" असेल तर आधी यायचं नक्की करा. हवं तर अधिवेशनापुरता एक नवीन डूप्लि़केट आयडी घ्या. आम्ही त्या नावाने भेटू. Happy

मस्त ओळख अजय , अधिवेशना साठी खुप खुप शुभेच्छा ..ईथुन काही मदत लागल्यास जरुर कळवा.

अजय, Youth program आणि kids and teen programming बद्दल कधी माहिती देणार आहेत? BMM साईटवरपण ह्याबद्दल काहीच माहिती नाही.