नवरा बायकोचे भाडण

Submitted by महेश ... on 3 October, 2012 - 07:27

पहिला मुदा : घरात आइ आनि वडिल आहेत, नवरा असतोच. ते कहितरि ठरवितात अनि नेहमि प्रमाने बाय्कोला ग्रुहित ढरतात. बास झालि सुरुवत. ..... पअन हे अस का होत. नेहमिच बायकाना क ग्रुहित धरतात ? का त्यान अक्कल नसते कि त्या शिकलेल्या नसतात ?
कदाचित बर्याच जनिना हा प्रश्ना पडतो? आनि पुधे काय ? बाय्कोचा पगार पाहिजे, तिने घरकाम करव, नोकरि सम्भलवि, पाहुने आलेकि त्यान्च पहवा, अनि एवधा करुनहि कोनिच विचार्नार नाहि, का तर बायको म्हनुन ??????? का हूत असेल हे सगल ? आज स्त्रि समानता असताना हि परिस्थिति ??
गम्मत काय असते लाग्न झाल्यवर बय्को घर सोडते अनि सासरि जाते. तिथे मुलाचे आइ वडिल हे बर्याच काला पसुन एक्त्र असतात, नेहमि ते त्यन्च थरवत असतात. अनि लग्न झाल कि एक सुन घरि आहे हे ते सर्रास विसर्तात. हा हा हा. अस होत नाहि. खर तर सुने चि निर्नय क्ष्माता त्याना माहित नसते. त्यामुले हे होत असत. ह्यवर झलिम उपाय म्हनजे सुनेने स्वताहुन सहभाग घ्ययच अगदि हे ३ जन गुप चुप कहि ठरवित असले तरिहि न्रिर्लज्जा प्रमाने सहभाग घ्यायचा. सुरुवतिला त्यान बोलु ड्यायच अगडि ते चुकिच थरवत असले तरिहि शात पने ऐकुन घ्यायच. आनि नन्तर नवर किन्वा सासरे ह्य्या ना शान्त पने आपल मत सान्गायच. सुरुवातिला कदचित त्याना पट्नार नाहि पन हे अस २-३ वेला झाल कि आपोआप पतेल. आनि पुढ्च्या वेलेस ते स्वतहुन बोलव्तिल ठरविताना.
ह्य्या च विशयावर नवरयाशि कितिहि भान्ड्ला तर काहिहि होनर नाहि उलत तुम्चे सम्भन्ड ख्रर्आब होतिल

आपल मोउल्यवान मत ढ्य.
लिखान्यात्ल्या चुका लव्करच दुरुस्त करेल. क्ष्मस्व ||||||

*************** सुधारित . *************

पहिला मुद्दा : घरात आई आणि वडिल आहेत, नवरा असतोच. ते काहीतरी ठरवितात आणि नेहमी प्रमाणे बायकोला गृहित धरतात. बस झाली सुरुवात. ..... पण हे अस का होतं. नेहमीच बायकांना का गृहित धरतात ? का त्याना अक्कल नसते कि त्या शिकलेल्या नसतात ?

कदाचित बर्‍याच जणींना हा प्रश्ना पडतो? आणि पुढे काय ? बायकोचा पगार पाहिजे, तिने घरकाम करावं, नोकरी सांभाळावी, पाहुणे आले कि त्यांचं पहावं, आणि एवढं करुनही कोणीच विचारणार नाही, का तर बायको म्हणून??????? का होत असेल हे सगळं ? आज स्त्री समानता असताना हि परिस्थिती ??

गम्मत काय असते लग्न झाल्यवर बायको घर सोडते आणि सासरी जाते. तिथे मुलाचे आई वडिल हे बर्‍याच काळा पासुन एकत्र असतात, नेहमी ते त्यांचं ठरवत असतात. आणि लग्न झाल कि एक सून घरी आहे हे ते सर्रास विसरतात. हा हा हा. अस होत नाही. खर तर सुनेची निर्णय क्षमता त्याना माहित नसते. त्यामुळे हे होत असतं. ह्यावर जालिम उपाय म्हणजे सुनेने स्वतःहून सहभाग घ्यायचा. अगदी हे ३ जण गुपचुप काही ठरवित असले तरिही निर्लज्जा प्रमाणे सहभाग घ्यायचा. सुरुवातिला त्यान बोलू द्यायच अगदी ते चुकिच ठरवत असले तरिही शांतपणे ऐकुन घ्यायच. आणि नन्तर नवरा किंवा सासरे ह्यांना शान्तपणे आपल मत सांगायचं. सुरुवातिला कदचित त्याना पटणार नाही पन हे अस २-३ वेळा झालं, कि आपोआप पटेल. आणि पुढच्या वेळेस ते स्वत:हुन बोलवतिल ठरविताना.
ह्याच विषयावर नवर्‍याशी कितिहि भान्डलात तर काहिही होणार नाही उलट तुम्चे सम्बन्ध खराब होतील

आपल मौल्यवान मत द्या.

लिखाणातल्या चुका लवकरच दुरुस्त करेन. क्षमस्व ||||||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यां फोटु कुट्ट हायेत नवरा बायकोचे?:हहगलो:

आधी शुद्धलेखन सुधारा, म्हणजे पुढील आयुष्यात म्हणजे वैवाहीक जीवनात भांडणे होणार नाहीत. बायदवे, हे आधी गुलमोहराच्या ललित विभागात ढकला.:फिदी:

मला वाटतं हा जबरदस्त धागा शंभरी गाठ्णार... Happy
लिखान्यात्ल्या चुका लव्करच दुरुस्त करेल. क्ष्मस्व ||||||

बापरे.... लेखन वाचता वाचता घेरी आली.... खरच जर नीट लिहिलेले ( म्हनजे टाइपलेले) नसेल तर एक अक्षर ही धड वाचता येत नाही.....

महेश इथे नियमीत लिहीत जा म्हणजे व्याकरण सुधारेल्.:फिदी:

आधी तुमच्या कंप्युटर वर वर्ड मध्ये लिहा मग इथे टायपा, सवय होईल. माझेही डोळे गरगरले वरचे लिहीलेले वाचुन्.:खोखो:

मस्त जमलाय विनोदी लेख, फारच वैतागलो होतो. तुमच्या लेखन वाचून मनसोक्त हसतोय.....
Rofl Rofl

तेवढा ग्रुप बदलुन "विनोदी लेखन" मध्ये हलवा लेख

आपल मोउल्यवान मत ढ्य. pointing-and-laughing.gif
<<
<<
तुमच लिखाण कळायला तर हवे, मत द्यायला

सुरेख लेखन.
माझ्या आवडत्या दहात. Wink

अनि लग्न झाल कि एक सुन घरि आहे हे ते सर्रास विसर्तात. हा हा हा. अस होत नाहि.

अशुद्धलेखन वगैरे एकवेळ ठीक आहे, पण एवढ्या गंभीर विषयात मधेच हा- हाहाहा वाचून सॉलिड करमणूक झाली.
कसं सुचतं हे?

अशुद्धलेखन वगैरे एकवेळ ठीक आहे, पण एवढ्या गंभीर विषयात मधेच हा- हाहाहा वाचून सॉलिड करमणूक झाली.
कसं सुचतं हे?
>>> Lol

बरं आता.
हे बगा, जन्ता जनार्दन, कुनि अस मन मोकलं कर्तं तेवा लगेच त्याला द्यू आयदी समजून असे हसू नका.
गरातल्या बांदनाने ते इतके त्रस्त आहेत की हा दागा प्रकाशचित्रात ताकावा की ललित लेखनात तेही त्यांना सुदरत नाही, तेवा असे हसू नका, भावना जाना, एकोपा वाडवा...आनि ते म्हनल्याप्रमाने "आपल मोउल्यवान मत ढ्य"

-आपला न.
ओनिअन लीदर.

बागे ओनिअन लीदर Lol
अशुद्धलेखन वगैरे एकवेळ ठीक आहे, पण एवढ्या गंभीर विषयात मधेच हा- हाहाहा वाचून सॉलिड करमणूक झाली.
कसं सुचतं हे?
>>> Lol

आयला मला वाटले, कुणीतरी खरोखरच नवरा-बायकोच्या भांडणाचे टाकले की काय इथे. पण धागा उघडून बघितले तर फोटो नको पण अशुध्दलेखन आवर अशी अवस्था झाली लेख वाचून. Happy

नवरा बैयकोचे भाडन
<<
<<
धाग्याचे शिर्षक अगदि विनोदी आहे तुमच्या.

भयंकर अशुद्ध लिहिलेलं आहे.
खरंतर टाईप केल्यावर काय उमटतं आहे, याची पर्वा न करता रोमन मराठी टाईप करून इथं ट्रान्सलिटरेशनमुळे त्या गमती झालेल्या दिसत आहेत. पण त्यामुळे वाचताना वाचणार्‍याचे हाल होतात अन बिचार्‍या/रीचा मूळ मुद्दा बाजूला पडतो आहे असे दिसते.

--->
थोडा रिकामा वेळ होता म्हणून टायपिंग (शक्य तितके) सुधारून लिहून दिले आहे, लोकहो वाचा अन जमल्यास करा. चर्चा. Wink (मलाच ३ वेळा नव्या चुका सापडल्या, तितके एडिट करावे लागलेत.)
-->
***धागाकर्ते यांनी दुरुस्ती केल्याने इथून उडविले.

सारिका, जाणीवपूर्वक असेल असे वाटत नाही. कदाचित मोबाईल कीबोर्ड इ. प्रकार असू शकतात. सदस्य जुने दिसत आहेत. (माझे डू आयडि नसावेत. Wink )

@साती Sad काय करू. कठीण प्रकार आहे. तुमचा हा प्रतिसाद येत असताना ३रे संपादन करत होतो. अजून सुटलं असेल कदाचित काहीतरी.

असे अजुन लेख येवुद्यात, मस्त करमणुक झाली.
तुम्ही अशुद्धच लिहा, शुद्ध लिहिणारे बरेच.
पण तुमच्यासारखे तुम्हीच
पुढच्या लेखनाची वाट बघत आहे.

लेख आवडला. सासरचे मला कशातच सामिल करुन घेत नाहीत असे मानुन स्वतःचे आणि नव-याचे आयुष्य भयाण करणा-या बायांनी लेखात दिलेला उपाय आचरणात आणला तर घराचे स्वास्थ्य सुधारेल. Happy

शुद्धलेखन सुधारायचे बघितलेत तर अजुन चांगले होईल. मोझिला फायरफॉक्स वापरत असाल तर त्याला लगेच काडीमोड देऊन इंटरनेट एक्स्प्लोरर वापरायला सुरवात करा. मग शुद्धलेखनाची फारशी काळजी करत बसावी लागणार नाही.

मोझिला फायरफॉक्स वापरत असाल तर त्याला लगेच काडीमोड देऊन इंटरनेट एक्स्प्लोरर वापरायला सुरवात करा. मग शुद्धलेखनाची फारशी काळजी करत बसावी लागणार नाही.

इंटरेस्टिंग ! Happy
हे कसे काय बुवा?

इंटरेस्टिंग !
हे कसे काय बुवा?

गेल्या आठवड्यात माझ्या कॉम्प्युटरची हार्डडिक्स फॉर्मट करायची म्हणुन काढली. तात्पुरता ब्राउजर म्हणुन मोझिला सुरू केले. डोके दुखले माझे त्याने. एक अक्षर टापयले आणि त्याच्या पुढचे जर टापयुन नंतर डिलीट केले तर तो पुर्ण शब्द काहीतरी वेगळेच रुप धारण करतो आणि त्याच्या आधीच्या शब्दाला जाऊन चिकटतो. मी तर कंटाळून प्रत्येक शब्दानंतर एंटर की दाबायला लागले, उगीच पुढच्या शब्दाचा मागच्याला संसर्ग नको म्हणुन. आज सकाळी परत इंटरनेट एक्प्लोरर सुरू झाल्यावर जीव भांड्यात पडला. हात जोडले कायमचे त्या मोझिलाला.

Pages