लेन्स रिव्हर्सल

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

माझ्या कडे निकॉन एफ एम १० ची किट लेन्स आहे. बरेच दिवस कॅनन ३५० डी वर लेन्स रिव्हर्सल साठी ती लेन्स वापराचे ठरवले होते पण मुंबईत मला कॅनन रिव्हर्सल ऍडाप्टर मीळाला नाही. शेवटी माझ्याकडच्या निकॉन ऍडाप्टर ला कॅनन बॉडी कॅप चिकटवली आणि त्या कॅपला भोक पाडुन वापरली.
लेन्स ३५ -७० असल्याने फिक्स फोकस ३ इन्च (३५ फोकल लेंथ्ला)ते साधरण ८ इन्च (७० फोकल लेंथवर) वर मिळतो. कमी शूटींग डिस्टन्स मुळे प्लॅश वापरणे अपिरिहार्य आहे. मात्र डिफ्युजर आवश्यक आहे.त्या साठी मी कॅमेरा फ्लॅश समोर एक सेमीट्रान्स्परंट पांढरा प्लॅस्टीकचा तुकडा अडकवुन वापरला.

spiral rose

याच प्रकारे काढलेले बाकिची प्रकाश चित्र ईथे आहेत
http://www.flickr.com/photos/p_ajay_p/sets/72157602213723487/

माझा लेन्स रिव्हर्सल सेटअप
IMG_2573.jpg

विषय: 

छान आहे रे.
हे लेन्स रिवर्सल प्रकरण कळाले नाही. माहिती मिळेल का????
हे मॅक्रॉ पेक्षा वेगळे आहे का??
एक लेखच का लिहित नाहियेस ह्याबाबत Happy

छान आहे रे त्या तिथे Happy
मला आधी वाटल आहे हीच लेन्स उलटी करुन लावायची (नावावरुन रे)
म्हणुन नाराज होतो की माझ्या कॅमेर्‍यातली लेन्स तर फिक्स आहे मग ती उलटी होणारच नाही Happy
पण तिथे कळाले की माझ्या कॅमेर्‍यातदेखिल हे करु शकतो. (अर्थात त्यासाठी माझ्याकडे लेन्स असाव्या लागतील अन्यथा शक्य नाही)
मला आधी माहितीच नव्हत "मॅक्रो" साठी वेगळा सेट अप आणि वेगळ्या लेन्स असतात ते.
हा गरीबांचा मॅक्रो सेट अप आवडला. Happy
धन्यवाद माहितीबद्दल

अजय,
मला हे lens reversal technique नाहीत नव्हते. तुम्ही दिलेल्या लिंकवर जावुन ते आधी वाचले आणि मग तुम्ही काढलेले फोटो बघीतले
हा गुलाबचा आणि ईतर पण. त्यामुळे काय केलय ते थोडे थोडे कळल्यासारखे वाटतय.
मला गुलाबाच्या पाकळ्यांचा फोटो जास्त आवडला त्यातल्या spiral pattern मुळे.
Flickr वरचा पहिला फोटो कसला ते कळले नाही. मुर्तीचा एखादा भाग असावा बहुतेक.

flickr वरचा तो फोटो करवंदांच्या काट्यांचा आहे. हीरव्या पार्श्वभुंमीवर लालसर काटे उठुन दिसत होते आणि त्यांचा कोनही आवडला होता म्हणुन घेतला तो फोटो.
धन्यवाद

गुलाबाचा फोटो सुरेख आलाय्...,सगळेच फोटो छान आहेत फक्त एका फोटोला तु maarigold नाव दिले तो फोटो बटन शेवंती चा आहे..झेंडु नाही..अस वाटतय.

अजय अप्रतिम आला आहे हा फोटो. Happy मस्तच.

माझं पाना फुलांच ज्ञान तस अगाधच आहे Happy त्यामुळे तू म्हणतेयस ते बरोबर असेल.