विलास नाईक ,लेख,,विचारधन ......

Submitted by vilas naik on 28 September, 2012 - 11:15

बनावट दस्तऐवजाचा तपास
जो फ्रॉड क्लेम करतो त्याला फ्रॉड सिध्द करावा लागतो. करार करताना फसवणुक केली व मा÷या नावाने खोटा करार केला किंवा खोट्या करारावर मा÷या ऐवजी दुसर्याी व्यक्तिने मा÷या खेाटया सहया केल्या. अशा मुख्य तक्रारी असु शकतात. फ्रॉडबाबत व फसवणुकिबाबत दिवाणी कार्यवाही ही करता येते. परंतु तो वेळ खाउ असल्याने अनेकदा अन्यायग्रस्त तक्रारदार हा फक्त चिटींगची केस करण्यासाठी उत्सुक असतो.
फ्रॉड करताना ओरल इवीडन्स, डॉक्युमेंटरी इवीडन्स, सरकमस्टनशियल इवीडन्स व डायरेक्ट इवीडन्स अशा सर्व बाजुने विचार करावा लागतो. फ्रॉडुलन्ट डॉक्युमेंटंस ही पार्टनरशिपच्या बाबतीत ही हक्क गिंळकृत करण्यासाठी केली जातात. कलम 469 आय.पी.सी. प्रमाणे गुन्हा दाखल करून घेताना मुदतीचा विचारही करावा लागतो. गुन्हयाला शिक्षा 6 महिने असताना 5-5वर्षे फसवणुकिचे गुन्हे दाखल होतात. आणि मग कोर्टात अडचणी निर्माण होतात.
बनावट कागदपत्रांचा तपास करताना संबधीत कलमे व त्यातील व्याख्या समजावुन घेणे आवश्यक आहे.
फॉर्जरीमध्ये दस्तऐवज बनावट करताना त्याचा उददे्श पहावा लागतो प्रत्यक्ष सहि करताना मागील तारखेचे दस्तऐवज करताना ही देखील बनावटी करण्याखाली येते त्यामुळे फॉर्जरीचे गुन्हे दाखल करताना त्याची व्याप्ती पहावी लागते.
तसेच या फॉर्जरीमुळे कोणाचे काय गुन्हे झाले त्याचा तपास केार्टात दाखल करणे महत्वाचे असते. तसेच आरोपीचे फॉर्जरी करताना एखादयाचा नुकसान करण्याचा हेतु हेाता हे सिध्द करावे लागते.
हस्ताक्षकक्ष नमुना व तज्ञाचा अहवाल रोजनाम्यामध्ये किंवा सहि शिक्याचे नकला गैरफायदा मिळवण्यासाठी किंवा खाडाखेाड केली जाते ंिकंवा फॉर्जरी हा गंभीर गुन्हा असुन अशा वेळी मुळ रेकॉर्ड तपासणे. मुळ रेकॉर्डमध्येच खाडाखेाड केली असेल किंवा कॉम्प्युटर रेकॉर्ड मध्ये फेरबदल केले असतील पूरावे घेताना काळजी घ्यावी लागते. आय.पी.सी. 466 प्रमाणे सरकारी दस्तऐवज फॉर्जरी शोधताना पंचनामे जबाबदार व्यक्ति कर्मचारी फ्रॉड करण्यामागचे उददेश हे महत्वाचे असते.
काही वेळा नोंदणीकृत दस्तऐवज मृत्युपत्र, एफ.आर.डी, दत्तकविधान पत्र, शेअर सर्टिफिकेट किंवा अन्य महत्वाचे मौल्यवान रोख यामध्ये सुध्दा फेरबदल केल्याचे लक्षात येतात. इतकेच नव्हे तर पैसे अदा न करता पैसे दिल्याच्या पावत्या दस्तऐवज दिले जातात. अशा फॉर्जरीला बनावटगिरीला 10 वर्षेपर्यतची शिक्षा आहे.
मात्र यासाठी मुल्यवान रोख याचा त्या संस्थेकडील मुळ रेकॉर्ड सबरजिस्टार कडील प्रतीलिपी हि सुध्दा तपासावी लागते बराच वेळा मुळ दस्त लाभाथ्र्ाीकडे असतो व बनावटगिरी करणारा आरोपी सहि शिक्यांना नक्कल फेरबदल करतो अशा वेळी मुळ दस्त व फेरबदल केलेला दस्त पडताळुन पाहणे आवश्यक आहे.
काही वेळा गैरफायदासाठी मुळ दस्तातच म्हणजे मुळ खरेदीखतात, मृत्युपत्रात किंवा मौल्यवान दस्तऐवजामध्ये मालमत्तेचा वर्णनात, क्षे़त्रात, बेमालुमपणे फरक केले जातात त्यासाठी या फरकामुळे व बनावटगिरीमुळे कोणाचे काय नुकसान झाले व कोणाचा काय फायदा झाला सिध्द करणे आवश्यक आहे. काही वेळा सरकारी शिक्के, मुद्रांक सरकारी मुद्रा किंवा पदाधिकार्यानचे शिक्के डुप्लिकेट बनवुन खोटया सहया करून दाखले दिले जातात अशा वेळी शिक्के कोणी बनवले. त्यात ते ओरीजीनल कस नाहीत किंवा ओरीजीनल शिक्के आरोपीनी मिळवले व त्याचा गैरफायदा कसा मिळवला हे सिध्द करताना अशा दाखल्याचा गैरफायदा करणारे लाभ मिळवणारे सुध्दा दोषी ठरू शकतात. लाभार्थिनी घेतलेला त्याचा गैरफायदा व अप्रामाणिक हेतु हा सिध्द करावा लागतो तपास कामात बर्यााच वेळा ओपीनीयन मागविला जातो व अक्षम्य उशीर केला जातो.
अशा गुन्हयामध्ये असे बनावट दस्ताऐवज वापरले गेले त्याचा तपास करणे व योग्य पंचनाम्याचे आधारे बनवले गेलेले कागदपत्र त्या कपंनीकडुन येाग्य पंचनाम्याने हस्तगत केले जातात. अशा वेळी लाभार्थिलाही त्याचा हेतु बघुन सहआरोपी केला जातो. पण त्याचीच फसवणुक झाली असेल तर तो उत्तम साक्षीदार ठरू शकतो. अशा लवचिक प्रकरणात सहआरोपीला त्याचा प्रामाणिकपणा पाहुन साक्षीदार बनवायचे का त्यावर त्याचे केसचे भवितव्य अवलंबुन असते. बदनाम झालेल्या आयपीसी 411 प्रमाणेच हा सुध्दा विषय असल्याने आपली सद्सद् विवेकबुध्द्ी उपयोगात आणावी.
विमा कंपन्याचे क्लेम किंवा अन्य सरकारी लाभ तोतये माणसे उभी करून आपण लाभाथ्र्ाी आहे असे दाखवीले जाते व तसा लाभ गैरफायदा मिळवला जातो अशा वेळी ज्या व्यिक्तीची तोताया म्हणुन सही आहे. त्याला पुढे करून व लाभ मिळवणारा असे दोघेही आरोपी असतात पण अनेक वेळा काही विशिष्ट हेतुने मुके पडदयामागचे सुत्रधार व लाभाथ्र्ाी शाबीत होवुन हि किंवा दिसत असुनही आरोपी दाखवला जात नाही अशा वेळी खाकी वर्दीच्या विश्वासाला तडा जातो. दोषारोप पत्र विशेषत: हा तुम्ही केलेल्या कामाचा आरसा असतो. त्यात तुमचे काम आरोपी विरूध्द लावलेली क्लेम सह आरोपीच्या यादीत केलेले फेरबदल मुद्देमालामध्ये हस्तगत केलेल दस्तऐवज तपासातील पुरावे, उदद्ेशाबाबतचे व अंतीम ध्येयाबाबतचे व लाभाथ्र्ाीला गैर फायदयाने मिळालेलया लाभाचे
खेाटी प्रतिज्ञापत्र बनवणे किंवा फसवणुक करण्यासाठी खोटी दस्तऐवज बनवणे, दुसर्याेच्या नावाने खोटे कागदपत्र व व्यवहार शॉर्टकटमध्ये उरकणे व सर्वसामाजिक मानसीकता अशा गुन्हयामध्ये निर्माण झालेले आहे याचे गुन्हा मिळणारे राजाश्रय व आर्थिक लाभाला मिळणारा सन्मान याच बरेाबर न्यायालयीन प्रकिया व पोलीस तपासातील दिंरगार्इ हि सुध्दा करणे आहे हे विसरून चालणार नाही. 420 सोबत 467 आणि 468 गुन्हयातही वाद होत चालले आहेत. याचे कारण हे सामुदायीक अपप्रवृत्तीमध्ये आहे. बनावट कागदपत्र बनावट आहेत हे असुनही ओरीजीनल आहेत हे भासवणे व त्यातुन गैरफायदा मिळवणे हाही तपासाचा मुख्य भाग ठरतो. एखादया दस्तऐवजामध्ये एखादया विशीष्ट भागामध्ये फॉर्जरीमध्ये केली तरी ते संपुर्ण डॉक्युमेंट फ्रॉडयुलंट ठरते आणि त्यातुन फायदा घेणारे हे दोषी ठरतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री विलास नाईक साहेब,
तूम्ही अनेक लेख इथे लिहिले आहेत, पण काही बाबी मुद्दाम सांगावाश्या वाटताहेत.

१) शीर्षकात तूमचे नाव लिहायची गरज नसते, ते आपोआप मुखपृष्ठावर दिसतेच, त्यापेक्षा लेखाला योग्य असे शीर्षक द्यावे.

२) तूमच्या लेखावर, बर्‍यावाईट प्रतिक्रिया इथल्या सभासदांकडून येतीलच, त्याची वाट पहावी. स्वतःच प्रतिक्रिया देणे, मला अनुचित वाटले.

३) प्रतिक्रिया तूम्हीच दिली आहेत, याचा अर्थ मूळ लेख तूम्ही लिहिलेला नाही, असा आहे का ? तसे असल्यास तो इथे देणे योग्य नाही.