ढापलेली बर्फी

Submitted by बन्या on 27 September, 2012 - 03:36

तरीच म्हटल.. आपल्या बोल्लीवूड वाल्याना एवढी अक्कल कुठून आली..
सगळा पिक्चर ढापून बनवलाय.. हि लिंक पहा..

https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=TGfo4ZV4xTs#!

जागो ग्राहक जागो

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व चित्रपट (स्टोरी) काही ढापून बनविला नाही, तर काही हॉलिवूड चित्रपटातील (चार्ली चॅपलीन, जॅकीचॅन) प्रसंग जसेच्या तसे उचलून सिनेमात घातले आहेत. तरिही ऑस्करच्या लायकीचा नाहीच हा सिनेमा, त्याऐवजी "देऊळ" ह्या मराठी सिनेमा चालला असता.

आज सकाळीच म टा मध्ये हि बातमी वाचली.. साले खरेच.. काळिमा फसणार आहेत हे bolliwood वाले.. १०० % छापतात
आणि हा पिक्चर ऑस्कर ला सुद्धा जाणार आहे म्हणे..
कठीण आहे

ढापायला पण अक्कल लागते

खिक.. हे म्हणजे परीक्षेत कॉपी करायला पण हिम्मत लागते या धाटणीच वाक्य वाटल
जे चूक ते चूकच

संगीत नक्कीच वेगळ्या फ्रेंच धाटणीचे आहे म्हणून पूर्ण सिनेमा भर मला छान वाटले होते ऐकायला.
बॅक ग्राउंड स्कोअर पण. ते अ‍ॅकॉर्डिअन वगैरे फार टिपिकल फ्रेंच वाटले होते. कारण घरी तश्या टाइपची गाणी कायम ऐकली जातात व अमेली सिनेमा फार वेळा व बारकाईने पाहिल्याने ते संगीतही एकदम ओळखीचे वाटले होते. कसं काय बाई ह्यानं इतका सुरेख ओरिजिनल स्कोअर दिला असा अगदी प्लेझंट धक्का बसला होता. मिस्टर बीन व इतर चार्ली चॅप्लिन टाइप पण कळलेले पण
कदाचित त्याने ही आपल्यासारखे टीव्ही वर बघितले असेल अशी स्वतःची समजूत घातलेली.

अरेरे शिळा खवा वाटतं.

खरच वाईट वाटलं पण...एवढी सुंदर कलाक्रुती तयार झालीय, पण अक्शरशः हुबेहुब सिन उचलले आहेत Sad

च्च च्च ! त्याला चोरी म्ह्णत नाहीत तर कला़कृती म्हणतात , Proud , अशी कलाकृती बनवायची , जसेच्या तसे सीन उचलायचे आणि वरताण परत ते ऑस्करला पाठवायचे , म्हणजे सगळ्या जगाने भारतीय चोर आहेत म्हणुन नाचक्की केली पाहीजे. ऑस्कर निवड समितीत बसणार्‍यांना एवढी साधी समज पण नाही का ?

कल हो न हो मध्येही लगानचे गाणे होतेच की. पण त्याला ढापले म्हणत नाहीत. त्याला पॅरॉडी असे म्हणतात.

बर्फीतील सीनही पॅरॉडी आहेत, असे समजल्यास, ये अदालत बर्फी को बाइज्जत बरी करती है . और ऑस्कर के लिये शुभकामना देती है.

काय पण उत्साह असतो एकऐकाचा, एक "आयडी" डीलीट होऊन तास, दोन तास नाही उलटले, तोच दुसरा "आयडी" घेऊन हजर!! Proud
लगे रहो. जोरे. Proud