हरिश्चन्द्रगड

Submitted by आरती on 27 May, 2008 - 00:00

मी सर केलेला २५ वा गड हरिश्चंद्र्गड असावा असे खुप मनात होते पण अखेर ५८ वा ठरला. थोडा वेगळा अनुभव या ट्रेक ने दिला.

पुण्याहुन संध्याकाळी ७ वाजता निघालेले आम्ही, सकाळी सातास गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

गाडी सुरु झाल्यावर चर्चेअंती (एकमताने) हरिश्चंद्र्गडाला जायचे ठरले. रात्री चढाई करण्याचे पण निश्चीत झाले. मधे एक dinner ब्रेक घेउन साधारण बाराच्या सुमारास पायथ्याच्या गावी, खिरेश्वर ला, पोहोचलो. झटपट बॅगा पाठीला लाउन चालायला सुरुवात केली. थोड्याच वेळात डोंगर पायथा आणि पाठोपाठ घनदाट झाडी लागली. सरळ की डावीकडे ? डावीकडे वळालो आणि चालायला लागलो. GS आणि cool आधी जाउन आलेले असल्याने वाट चुकल्याचे त्यांच्या लगेच लक्षात आले, परत मागे फिरलो आणि दुसरी वाट घेउन त्याच उत्सहात चालू लागलो. आणि परत एकदा वाट चुकल्याचे लक्षात आले. झाडीत थांबणे योग्य वाटे ना म्हणुन अर्धा कीमी मागे मोकळ्या पठारावर आलो. GS आणि cool ने थोडे पुढेपर्यंत जाउन वाट confirm करावी आणि तो पर्यंत मी,तात्या आणि फदी ने आराम करावा (किंवा बोटे मोडावी) असे ठरले.

अखेर योग्य रस्ता सापडला. खात्री दाखल ३ बाण ही दिसले. [तेंव्हा कुठे तात्या पुढे यायला तयार झाले.] बरेच पुढेपर्यत आल्यावर घनदाट झाडी लागली. गप्पांच्या तालावर चढाई चालु होती. आणि एकदम cool ओरडला 'थांबा'. सगळेच स्तब्ध झालो आणि ऐकु लागलो. पानातुन चांगलीच खसखस ऐकु येत होती. चार पावल पुढे टाकली, तर खसखस आमच्या दिशेने सरकु लागली, दोन वेळा प्रयोग केला आणि तिसर्‍या वेळेस तात्यांनी जोरात हुकुम सोडला, मागे फिरा ....

आणि या वेळेस, पहील्यांदाच असेल कदाचीत, बहुमताने आम्ही मागे वळालो

दोन तासांचा मस्त night walk मात्र झाला.

गाडी पाशी येई पर्यंत, उद्या सकाळी किती वाजता चढायला सुरुवात करायची, झोप किती तास होईल वगैरे चर्चा चालू होती. इतक्या उशीरा झोपल्यावर आम्ही सकाळी उठणार नाही याची खात्रीच असल्याने GS ने पाचनई गावातुन चढुया असे सुचवले. पडत्या फळाची आज्ञा समजुन आम्ही लगेच गाडीत बसलो, कारण पाचनई कडुन चढायला २ च तास लागतात असे ऐकुन माहीती होते.

आम्ही सगळे गाडी चालु झाल्या बरोबर झोपलो. प्रश्न फक्त GS चा होता. संध्याकाळी ७ ते दुसर्‍या दिवशी सकाळी ७ असे सलग १२ तास driving करुन त्याने आम्हाला सुरक्षित पोहोचवले. नंतरही विश्रांती साठी थांबण्याचा आग्रह नाही.

पायऊतार होउन लगेच आम्ही चालायला सुरुवात केली. हा रस्ता खरच खुपच छान - सुखद आहे. सुरुवातीला विरळ झाडी आहे, मग कातळाच्या कडे-कडेने traverse आहे आणि नंतर पुर्ण रस्ता दाट झाडीतुन आहे. सुरुवातीचा अर्धा तास सोडला तर आपण पुर्णवेळ छान सावलीतुन चालत असतो, आणि बाजुला उंचच ऊंच कडे आणि पाउस - वार्‍या मुळे तयार झालेल्या असंख्य गुहा आणि खळगे. नैसर्गीक चमत्कार बघत बघत कधी गडावर दाखल झालो समजलेच नाही.

आम्ही पोहोचेपर्यंत तात्यांनी 'भगवानला', लींबु सरबत - पोहे, order देउन ठेवली होती. बरेच ग्रुप आलेले असल्याने आम्ही आपले गुहा book करण्याच्या कामाला लागलो. बरीचशी प्रशस्त अशी आणि शेजारीच पाण्याचे टाके असलेली 'गणेश' गुहा निवड्ली आणि पथार्‍या पसरल्या. तो पर्यंत पोहे-लिंबु सरबत पण आले. ताव मारला आणि आडवे झालो.

ट्रेक ला जाउनही आम्ही हा week end अगदी घरच्या सारखा आरामात घालवला. २ तास झोप, भर दुपारी आंघोळ, गरम - गरम शेव भाजी-भाकरी चे जेवण, पत्ते, परत अर्धा तास झोप आणि मग संध्याकाळचे आवरुन सावरुन निघालो कोकण कड्याकडे.

कोकण कड्याची भव्यता, थरार, वारा, सुर्यास्त हे सगळे अनुभवण्या साठी एकदा तरी हरिश्चंद्र गडावर जायलाच हवे. दोन - तिन तास तिथेच रेंगाळलो. सुर्य पुर्ण अस्ताला गेल्यावर परत यायला निघालो. भरपुर फोटो काढले, कड्याचे, सुर्याचे आणि अर्थातच स्वताचे

दुपारी मधे शिवलिंगाला प्रदक्षीणा पुर्ण केली. पाणी थंड होते, पण २ डिगरी नाही जाणवले. कदाचीत बाहेर उन्हाळा असल्याने असेल. संपुर्ण ताजेतवाने मात्र झालो.

दुसर्‍या दिवशी सकाळीच, रोहीदास आणि तारामती केले. शिखराच्या टोकावरुन पलीकडे दिसणारे द्रुश्य डोळ्यात साठवुन घेत बराच वेळ तीथेच बसलो.

कड्याच्या मध्यावर डोंगराच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत बाहेर आलेला अर्धवर्तुळाकार एक भु भाग घनदाट झाडांनी व्यापलेला. त्याच्या वर खाली सगळा कातळच कातळ. पलीकडे खोल दरी. भर उन्हाळ्यातती तीच्यातुन वर येणारे धुक्याचे - ढगांचे लोट च्या लोट. अप्रतीम द्रुश्य होते.

साधारण साडेचार हजार फुट उंचीवर भगवा झेंडा फडफडत होता. त्याच्या समोरच महाराजांचा जयजयकार केला, काही स्तोत्रांची उजळणी केली. संघाची प्रार्थना म्हंट्ली आणि परत फिरलो.

बरोबर आणेलेले, कैरी, लिंबु, कांदा, फरसाण आणि मुरमुरे आमची वाटच बघत होते. मस्त भेळ केली, पोटभर खाल्ली आणि उतरायला सुरुवात केली. GS पाठोपाठ स्फुर्ती गीते म्हणत nonstop खाली आलो.

जेंव्हा जेंव्हा आम्ही ट्रेक ला जातो, तेंव्हा निसर्गाच्या सहवासा मुळे जेव्हडे refresh होतो, तेव्हडेच एकमेकां बरोबर घालवला वेळ आम्हाला refresh karato.

या ट्रेक च्या बाबतीतच, निघाल्या बरोबर एकमेकांचे हाल्-हवाल [एरवी फारश्या भेटी गाठी, फोन होत नसल्याने] विचारुन झाले. आणि खास तयार करुन घेतलेली 'कभी-कभी, सिलसिला, love-story etc. ' अशी mix गाणी ऐकली, रात्री जगजित सिंग आणि सकाळी जाग आल्या बरोबर 'अभंगवाणि'. आमचा प्रवासातला वेळ आम्ही सगळेच एक सारखे enjoy करतो.

या वेळी प्रवास लांबचा होता, आणि नंतर तो अजुनच लांबल्या मुळे जाताना 'पावन खिंड' आणि येताना 'अफजलखानाचा पराभव' अशा दोन लढायां ऐकता आल्या [CD पुरंदरे प्रकाशन].

गुहेत बसुन 'बाळासाहेब' ऐकले. इतिहासावर चर्चा केली. तात्यांकडुन management tips घेतल्या. कोकण कड्यावर 'सांज ये गोकुळी' ऐकले आणि शांत पणे बसुन सुर्यास्त अनुभवला.

यातली कुठलीच गोष्ट आठवडाभर करणे शक्या नसते. त्यामुळेच एक सारख्या आवडी निवडी असलेले मित्र-मैत्रीणी बरोबर असल्याचा एक वेगळाच आनंद मिळतो.

असो, तर असा हा हरिश्चंद्र्गड आणि तिथे असलेल्या गुहा, week end home म्हणुन एकदम योग्य ठिकाण आहे Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वसाधारणपणे कोकणकड्यासारखी २ ३ दिवसांची चढाई करताना पिटॉन्सना टांगण्याच्या hamocks वापरल्या जातात. त्यात झोपतात लोक. किंवा जर वर चित्रात दिली आहे तशी ridge असेल तर तिथे दोरीच्या सहाय्याने बांधून घेऊन झोपतात. परत पुर्णपणे तळाला खाली येण्याचा मार्ग शेवटचा असतो. कारण जुमारिंग करायचे म्हटले तरी कष्ट असतातच. आणि हातातली ताकद परत ७ ८ शे फूट चढायला वापरणे हितावह नसते. विशेषत्: नंतर overhang चढायचा असेल तर.
टण्या, त्या फोटोमधली रिज फेमस आहे. कोकणकडा चढणारे जवळपास सगळेच ती वापरतातच.

कोकण कड्याची भव्यता, थरार, वारा, सुर्यास्त हे सगळे अनुभवण्या साठी एकदा तरी हरिश्चंद्र गडावर जायलाच हवे. पटेश... आरती वृतांत छान आणि सुंदर....

आयुष्यात एकदा तरी कोकण कड्याला जावे... वरून पाहताना एकच ईच्छा मनात येत होती... 'जर देवाने एका उडीचे वरदान दिले असते तर....'

आम्ही २६ जानेवरी २००८ला कोकण कड्यावर होतो.
संध्याका़ळी कडयाची रपेट करताना चढाईचे दृष्य पहायला मिळाले... ५ दिवस लागतात चढाईला अशी माहीती त्यांच्या लिडरने दिली.

तोलार खिंडीतून दिसणारा खिरेश्वरचा परिसर
Tolaar_Khind.jpg

आपला कोकण कडा तो आपलाच म्हणा, पण असे अनेक कडे, अदिस अबाबा (इथिओपियाची राजधानी ) च्या आजुबाजुला आहेत. तासाभराच्या हवाई सफरीत मस्त दर्शन झाले. त्या भागाची भटकंती करायची आहे आता.

दिनेश तुम्ही म्हणताय ती इथियोपियामधील पर्वतरांग अतिशय प्रसिद्ध आहे.. त्या उंच डोंगरकड्यांवर एक विशिष्ट माकडांची प्रजाती विकसित झाली आहे.. ही माकडे नैसर्गिकच अतिशय उत्कृष्ट गिर्यारोहक असतात.. बीबीसी प्लॅनेट अर्थच्या 'माउंटेन्स' च्या सिरीज मध्ये ही पर्वतरांग चित्रित केली आहे.