कॅनडा

Submitted by क्रिशा on 20 May, 2008 - 20:23

Toronto Naigara falls पासून जवळ आहे ना?? किती वेळ लागतो?
काय काय बघण्यासारखे आहे तिकडे??

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१२८ किमी अंतर दाखवतो आहे गुगल. नायगारा बघणे आणि केव्ह ऑफ द विंड, मेड ऑफ द मिस्ट करण्यासारखे आहेत.

नायगारा हून टोरांटो ला जायला ट्रफ़िक नसेल तर एक ते दीड तास लागतो. टोरांटो चं CN Tower, base ball stadium बघण्यासारखं आहे. तिथेच जवळ फ़ेरीने जाण्यासारखं एक आयलंड आहे तेही छान आहे. तिथे सायकली भाड्याने घेऊन फिरता येतं. टोरांटोचा झू देखिल बघण्यासारखा आहे. मी गेले तेंव्हा जिराफांची पिल्लं पाहिली होती. चायनाटाउन एकदम इन्टरेस्टिंग आहे. रस्त्यावरच बाजार भरलेला असतो अन पिन टू पियानो काहीही मिळू शकतं.

नायगरा च्या जवळ एक बटरफ्लाय गार्डन पण बघण्याजोगं आहे.

नायगराच्या कनेडियन साईडला जे Butterfly Garden आहे ते खुप छान आहे. कनेडियन साईडला package tour (सरकारी) मधे हे गार्डन included आहे.

टोरांटो जवळ एक सफारी आहे. तुमच्या गाडीत बसुन किंवा त्यांच्या गाडित बसुन १० किलोमीटर ची सफारी घेता येते.. हा एक छान वेगळा अनुभव घेता येईल...

नायगारा च्या शेजारी Niagara on The Lake हे छोटस गाव आहे. तिथे नायगारा हुन Niagara River Parkway नी जाता येत. दुसराही रस्ता आहे, पण हा नायगारा नदी च्या काठावरुन जातो. सध्या Spring असल्यामुळे एका बजुला फ़ुलांनी बहरलेली झाड नि एका बाजुला नायगारा नदी अस सुंदर द्रुश्य बघायला मिळत.

नायगारा ते टोरोंटो रस्त्यावर अनेक Wineries आहेत. Guided tours ची सोय आहे.

Hamilton चे Royal Botanical Garden पण प्रसिद्ध आहे. http://www.rbg.ca/

Hamilton ला अफ़्रिकन लायन सफ़ारी आहे. http://www.lionsafari.com/home.html
सफ़ारी मधे स्वत: च्या कार मधुन फ़िरायची सोय आहे. वाघ, सिंह आणि इतर अनेक प्राणी जवळुन बघता येतात.

फ़ुलांची आवड असणार्या साठी

Royal Botanical Garden मध्ये सध्या Lilac Festival सुरु आहे.
३१ मे १,७ जुन ला Iris and Peony Festival आहे.

www.rbg.ca

टोरांटो डाउन टाउनहून 'हिप्पो' टूर्सच्या बसेस निघतात. डाऊनटाऊन, आजुबाजूचा भाग, राणीसाहेबांचा थाट सगळं फिरवून लेक ओंटारिओमधे ह्याच बसची बोट करून फिरवतात. मजा येते.

मृण्मयी, 'हिप्पो' म्हणजे बॉस्टन आणि आता SF मधे सुद्धा ती डक टूर्स म्हणून आहेत तसेच काही आहे का?

लोकहो, नायगर्‍याला जाताना खूप अंतराची road trip होत असेल तर विमानाने जाण्याचा पर्याय निवडा. मागच्या आठवड्यात नायगर्‍याला जाणार्‍या ६ भारतीयांच्या अपघाताची बातमी वाचुन वाईट वाटले. ३-४ वर्षांपूर्वी देखील अशीच बातमी ऐकल्याचे आठवते. ड्राईव्ह करणार असाल तरी भरपूर थांबे आणि विश्रांती घ्या. लगोलग परत येणे टाळुन तिथे मुक्काम करा. आपण देसी लोकांना ग्रूप बरोबर असला की लांब रोड ट्रिप किरकोळ बाब वाटते, पण safety first हे लक्षात ठेवा.

सगळ्याना Thanks a lott !! info दिल्या बद्दल.

मी कालच नायगरा, टोरांटो ट्रीपहून आलो, त्यामुळे माझ्याकडे येकदम लेटेस्ट इंफो आहे!

आम्ही नायगरा पासून चालत ५ मिनीटावर असलेल्या Imperial Suites या हॉटेल मधे राहीलो होतो. छान हॉटेल आहे, आणी मुख्य म्हणजे Maid of the Mist वगैरे चालत ५ मिनीटावर असल्यामुळे सोईस्कर आहे. रुम मधे coffee maker, fridge आहे. पार्कींग $ ५ आहे.

नायगरा River Road वरुन पुर्ण दिसतो, आणी तिथेच खाली Maid of the Mist आहे, आणी जवळच Journey Behind the Falls आहे. या दोन्ही ठिकाणी चालत जाता येतं.

तिथून कारने ५~१० मिनीटावर White Water Walk आहे, तिकडे नायगरा नदीच्या कडेने चालत जायला एक Trail आहे. तिथून अजून पुढे गेल्यावर Butterfly Conservatory आहे, तिथे २५०० फुलपाखरे पहायला मिळतात.
Rides चे दर असे आहेत~

Maid of the Mist : $14.50
Journey Behind the Falls : $12.00
White Water Walk : $8.50
Butterfly Conservatory : $11.00

ही सर्व ठिकाणे पहाण्यासारखी आहेत. सगळी वेगवेगळी तिकीटे घेण्यापेक्षा तिथे Adventure Pass मिळतो $ ३९ ला, त्यात ही सर्व ठिकाणे included आहेत, आणी एक दिवसाचा बसचा पासपण मिळतो. ( White Water Walk आणी Butterfly Conservatory थोडं लांब आहे, त्यामुळे तिथे जायला बस लागते, किंवा कारने गेलं तर पार्कींग free आहे.)

टोरांटोला जायला आम्हाला Traffic मुळे दिड तास लागला. टोरांटो जवळ आल्यावर CN Tower दिसतोच, त्याच्या जवळपास Paid Parkings आहेत (दिवसाला $ १० साधारणपणे). इथे कार पार्क केल्यावर CN Tower आणी शेजारीच Rogers Center बघून झालं, की जवळच Harbourfront Center आहे, तिथून Boat Rides घेता येतात. बोटीतून टोरांटो च्या skyline चा मस्त view मिळतो. या Harbourfront Center ला CN Tower पासून चालत जायला १०~१५ मिनीटं लागतात, आणी जर कार नी गेलं तर परत Pay n Park मधे $ १० देउन पार्क करावी लागेल.

त्यानंतर Downtown मधे कार मधून फिरायला मजा येते. मग Baldwin Street आणी Henry Street यांच्या Intersection ला रस्त्यावर मिटर पार्कींग आहे, आणी २-३ देशी रेस्टॉरंट आहेत, तिथे खाउन कार तिथेच ठेवून चालत ५ मिनीटात China Town ला जाता येतं (On Spadina Avenue) . या व्यतिरिक्त आम्हाला तरी टोरांटो मधे काही विशेष दिसलं नाही.

हुश्शऽऽऽ जेवढं आठवलं तेवढं लिहून झालं, अजून काही आठवलं तर परत लिहीन!

नमस्कार !
आम्ही मे महिन्याच्या अखेरीस कॅनडा ट्रीप करायचं बघत आहोत. बोस्टन वरून कार ने जाणार आहोत. Quebec आणि Montreal बद्दल खूप ऐकलं आहे. तिकडे जायचा प्लान करत आहोत.
आमच्याकडे साधारण ४ (४.५) दिवस आहेत ह्या ट्रीप साठी.
आम्हाला खूप डिटेल मधेही नाही आणि खूप ओझरते देखील नाही असं पाहायचे आहे..म्हणजे या सिटींमधील अमुक अमुक ठिकाणं पाहणे मस्ट आहेत किंवा ही नाहीत असा काही सल्ला मिळाला तर फार बरं होईल.. !
४ दिवस पुरतील का ह्यासाठी? खूप हेक्टिक होईल का? तसं वाटलं तर १ दिवस आम्ही वाढवू शकू पण जास्तीच जास्त ५ दिवस करू शकू..
कॅनडा मध्ये अजून काय काय बघण्यासारख आहे ह्या व्यतिरिक्त ??(बोस्टन वरून करण्याजोगं ..कॅनडा कडून नायगारा बघून झाला आहे आणि खूप काही म्युझिअम्स बघायची आहेत अस पण नाही....पण एखादं खूपच मस्त असेल तर मे बी बघू...:)
बोस्टन वरून आधी Montreal ला जाण्याचा विचार आहे आणि मग तिथून पुढे Quebec ला.
आम्ही गुगल करतच आहोत. पण तुम्हाला कुणाला ह्या बद्दल काही माहिती असेल किंवा तुम्ही प्रत्यक्ष गेला असाल तर तुमचे सल्ले ऐकायला जरूर आवडेल. Happy कृपया सांगा Happy

पल्लवी मला वाट्ले तुम्ही व्रुत्तांत लिहिला आहे म्हणून इथे वाचायला आले. आता ट्रिप झाली कि इथे लिहा बरे का. प्रवासासाठी शुभेच्छा.