आवाजातच आहे खरखर!

Submitted by सतीश देवपूरकर on 21 September, 2012 - 05:33

गझल
आवाजातच आहे खरखर!
जणू उभा मी, कुठे दूरवर....!

श्रीमंतीची शाल कशाला?
गरिबीचे मज प्यारे लक्तर!

सात्विकतेचा दरवळ असतो!
सौजन्याचे असते अत्तर!!

जरतारी, भरजरी जरी तू;
तुजला लागे माझे अस्तर!

निजताना मी रोज निरखतो......
आयुष्याचा अस्थीपंजर!

डोळयांच्याही पलीकडे जो.....
तो मज होतो रात्री गोचर

क्षितिज कधीही संपत नाही;
सांग, कसे लंघावे अंतर?

मला माणसे कळू लागली;
कळते मजला आता अंतर!

घे केव्हाही उंच भरारी!
तुजवर माझी असेल पाखर!!

पाय तुझे लागले घराला......
धरणीवर अवतरले अंबर!

स्वार्थासाठी काय धावपळ!
जो तो कसतो त्याची कंबर!!

नका माझिया नादी लागू.....
गझलकार मी एक बिलंदर!

वानरविचका नित्यच झाला!
हझला लिहिती आता वानर!!

धरणी गाते माझ्या गझला!
स्वर्गामध्ये गाती किन्नर!!

मला मिळाले सगळे काही;
मी नशिबाने एक शिकंदर!

तो गझलांचा पाझर होतो....
हृदयी ज्याच्या रुततो खंजर!

गावच विधवा झाले होते!
सौभाग्याचे नव्हते पिंजर!!

तरी मिरवती समाजात ते;
किती फासले त्यांना डांबर!

आत्म्याचे उद्गारच माझ्या!
कलाकुसर ही नाही वरवर!

तरातरा चालशी कुठे तू?
थांब जरासा मधेच क्षणभर!

दु:ख वाटते मजला मणभर!
सुख वाटे मज अवघे कणभर!

ये म्हणशी मरणा, मज भरभर!
मजपाठी जगण्याची घरघर!!

नकोस छाटू पाय चालते;
घे माझे तू पंख हवे तर!

वाट कितीही असेल खडतर;
तुझिया सोबत प्रवास सुखकर!

कुरूपता ही कधी जायची?
कधी व्हायची दुनिया सुंदर?

कसाबसा मी तग धरलेला;
ये धावोनी, आता सत्वर!

वय छोटे पण, दिसतो मोठा!
तारुण्याचा गळला मोहर!!

सगळ्या घटना घडल्या भरभर!
उतार वयही आले लवकर!!

कोण प्रेरणा देतो मजला?
पाझरती या गझला झरझर!

तुझा शेर वाचून वाटते....
घासामध्ये यावा कंकर!

कसली गुर्मी? कुठली मस्ती?
स्थावरजंगम सारे नश्वर!

प्रतिसादांची उलट पावले!
भूतपिशाचांचा हा वावर!!

प्रश्न कितीही भंडावू दे.....
काळच सगळ्यांवरती उत्तर!

पदोपदी पातळी सोडतो!
रोग मनाचा अतिशय दुर्धर!

ढील प्रथम तो देतो, नंतर.....
आवळतोही नाड्या ईश्वर!

हयगय ना नोकरीत केली;
नव्हे नोकरी, ती तर भाकर!

तोच मी! परी, खुर्ची दुसरी;
सलाम करती नोकर चाकर!

यम केव्हाही येवू शकतो....
मला करू दे आवरसावर!

लोक कैक आतून विषारी!
परंतु वाणीमध्ये साखर!!

शोभिवंत मी, तितका नाजुक!
मला जरासे जपून वापर!!

तुझ्याच स्वप्नांची मी चादर!
मलाच अंथर! मलाच पांघर!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह !!

धन्यवाद बेफिजी !
मला वाटलं मी एकटाच पकलो !

(माणसाला कसल्याही गोष्टीत सोबत मिळाल्यासारखं वाटलं, तर लगेच कित्ती हायसं वाटतं.. नाही ?

बेफिजी,

तुम्हाला ड्यु. आय, का काय... ते म्हणायचं आहे का ? तर तो मी नव्हेच - DesiSmileys.com

पण ही 'काफियानुसारी भगिनी कोण आहे, जाणून घ्यायला आवडेल !

कोणत्याही गोष्टीचा रतीब लावला की
असेच होणार,गप्पांचा अड्डाच होणार.....

घ्या..ही जमीन दिलेय आंदण
आता लावा आपापली रोपं Wink

कोणत्याही गोष्टीचा रतीब लावला की
असेच होणार,गप्पांचा अड्डाच होणार.....

अहो, एव्हडे मोठे वाचाय्चे म्हणजे
पोटात मोठा खड्डाच पडणार Proud

मी काल या गझलेवर एक प्रतिसाद दिला होता तो सर्वात पहिला प्रतिसाद होता
आता आश्चर्य म्हणजे माझा प्रतिसाद दिसत नाहीये
विशेष म्हणजे त्यात डिलीट करावे असे आक्षेपार्ह काहीच नव्हते तरी कसा काय दिसत नाहीये आता ..मला काहीच समजत नाहीये !!DesiSmileys.com

अरेच्च्या.....असे आहे होय !!!
याच कवाफीवर काल दिलेल्या गझलेनन्तर आज पुन्हा एक गझल पाडली आहे सरानी !!
ओहो..... सॉरी .....आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली सॉरी !!

चालुद्या .चालुद्या !!!;)

केशवराव खूप दिवसानी आपले दर्शन झाले कसे आहत

आपण या गझलवर व आज अन्यत्र जी मते नोंदावालीत ती नक्कीच शिकण्यासारखी आहेत
धन्यवाद

कळे न काफियांमधेच गुंतलास तू कसा?
हरेक शेर पाहतो तुझ्याकडे पहा कसा!

हरेक शब्द काय सांगतो न ऎकलेस तू;
न एक, कैक अर्थ त्यात का न पाहिलेस तू?

खयाल काय, त्यापलीकडीलही असे इथे;
प्रमाण कोणते तुझे, मला तरी कळो इथे!

असंख्य शेर पाहुनीच दडपलास काय तू?
गणीत अन् गझल न साम्य, विसरलास काय तू?


>..........प्रा.सतीश देवपूरकर