तुफानी वादळात मिणमिणता दिवा !......भाग२

Submitted by Mandar Katre on 22 September, 2012 - 21:43

तुफानी वादळात मिणमिणता दिवा !...........भाग२

कालपासून भारताबाहेरच्या हिंदूंच्या बद्दल एक लेख-मालिका सुरु केली आहे.आज pacific महासागरातील फिजी या देशाबद्दल !

१९ व्या शतकात ब्रिटीश सरकारने भारतीय हिंदू मजूर या बेटावर नेवून तिथे असलेल्या नैसर्गिक साधन-संपत्तीचा व्यापारी तत्त्वावर स्वत:च्या फायद्यासाठी केला , पण कामासाठी आलेल्या हिंदू मजुरांची पुढची पिढी इथेच वाढली आणि त्यांना इंडो-फिजीयन असे नाव दिले गेले .१९७० साली फिजी ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला ,पण तोपर्यंत मेथडीस्त चर्चने आपले हातपाय पसरले होते,अधिकाधिक क्रिश्चन लोकांना या बेटावर आणून फिजीला कॅथोलिक ख्रिश्चन देश घोषित करावे यासाठी चर्च आकाशपाताळ एक करत होते. त्यातून मग पुढे हिंदू-ख्रिश्चन दंगली होऊ लागल्या .

२००० साली लोकशाही प्रक्रियेद्वारा निवडून आलेल्या फिजीयन हिंदू पंतप्रधान महेंद्र चौधरी यांना अपहरण करून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले.हिदू मंदिरांवर सतत हल्ले होत राहिले आहेत. ४० ते ५० % पर्यंत लोकसंख्या असूनही या हिंदुबहुल देशातील हिंदू जनतेला कोणी वाली राहिला नाही.

फिजीतील हिंदू आजही प्रचंड विरोध , हाल-अपेष्टा आणि दू:ख /तिरस्कार झेलूनही आपले दिवाळी/होळी सारखे हिंदू सण ,धर्म आणि परंपरा जपण्याचा निकराचा प्रयत्न करत आहेत. प्रश्न हा आहे कि ते मायभूमी म्हणून आपल्याकडे पाहत असताना आपण त्यांच्यासाठी काय करणार?006-nadi-hindu-temple-x.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रश्न हा आहे कि ते मायभूमी म्हणून आपल्याकडे पाहत असताना आपण त्यांच्यासाठी काय करणार?

फिजीच्या हिंदुंची भारत ही मायभूमी कशी होऊ शकते? बरं, कोणे एके काळी हिंदुस्तान ही मायभूमी होती, हाच बेस मानायचा झाला तर बांग्लादेशी मुसलमानानाही भारताकडे अपेक्षेने पहायचा अधिकार मिळायला नको का?

प्रत्येक देशावर वेगळा मिणमिणता धागा काढण्यापेक्षा एकाच धाग्यात एडिट करुन लिहा. सगळे प्रतिसाद एकत्र राहून एक बलशाली हिंदु धागा होईल ... सगळं विखुरलं तर त्या धाग्यांचीही अवस्था अशाच हिंदु अल्पस्म्ख्य देशांप्रमाणे नगण्य होईल, नै का?

.१९७० साली फिजी ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला ,पण तोपर्यंत मेथडीस्त चर्चने आपले हातपाय पसरले होते,

फिजि बेटावरचे जे मूलनिवासी आहेत, ते सगळे ख्रिश्चनच आहेत.... ख्रिश्चन युरोपियनानी गुलाम म्हणून नेलेले हिंदु मुस्लिम लोक हे इंडो फिजियन ओळखले जातात.

आता गंमत बघा..... हिंदुनी भारतात स्वतःला मूलनिवासी मानून भारत हिंदु राष्ट्र व्हावा असे म्हटले तर ते धर्मप्रेम ठरते.

आणि मूळच्य ख्रिश्चनच असलेल्य देशातील लोकानी तेच स्वप्न पाहिले की ते मात्र आकाशपाताळ एक करणारे ठरतात. गंमतच सगळी ! http://en.wikipedia.org/wiki/Fiji

सचिन गोरे |तुमची ही दुप्लिकेत आय्डि अहे का? नाव-गाव कहिच दिलेत नहि ,अनि तुमाल देश-प्रेम अनि रास्त्र्भक्ति याबद्दल तिरस्कर वाटतो का? तुमी हिन्दु नाहि का?

फक्त २ दिवस झाले अहेत तुमाला इक्दे येवुन्,अनि लगेच लाथा झाडायला सुर्वात?

मी एकदा लॉस-अंजेलिसला गेलो होतो तेव्हा टॅक्सीच ड्रायव्हर कुमार नावाचा होता. मी त्याला तू केरळचा का असे विचारले.

तो म्हणाला आम्ही मूळचे फिजीचे. आता अमेरिकेत पळून आलो. तो भारतात कधीच गेलेला नाही.

त्याने सांगितले की आम्ही घरात हिंदीच बोलतो. त्याच्या नातवानासुद्धा गायत्री मंत्र, आणि इतर श्लोक पाठ आहेत. त्याने मला काही श्लोकसुद्धा म्हणून दाखवले.

काय गम्मत आहे बघा, फिजितल्या हिंदूंनासुद्धा हे श्लोक पाठ आहेत, आणि आपल्या मुलांना नाहीत.

खरे आहे छोटा भीमराव ,या गोष्टींचा विचार प्रत्येक हिंदूने करायलाच हवा,,अन्यथा इतर धर्म जसा जागतिक स्तरावर म्हणून धर्माचा विचार विचार करतात ,तसा न केल्याने हिदू धर्म नामशेष व्हायला वेळ लागणार नाही,,हे जळजळीत वास्तव आहे .