Submitted by सुप्रिया जाधव. on 30 August, 2012 - 09:48
भर दिवसा-ढवळ्या
गच्च अंधारुन आल
तुझ्या आठवात सख्या
मन वेड-पिसं झाल
को-या अंगणात सरी
अश्या अश्या कोसळल्या
बांध बांधल्या मनाचा
जागो-जागी ढासळला
थेंब-थेंब झेलावया
रंध्र-रंध्र आसावला
जणु साजणाचा स्पर्श
ओल्या सरीतुन झाला
तुझ्या विरहात सख्या
खोळंबली रात्र-रात्र
ओली झुळुक वा-याची
सुखावते गात्र-गात्र
जशी-जशी पावसाशी
गट्टी जमली जमली
तना-मनाची धरेच्या
लाही शमली शमली
निथळत्या काळजाला
तू ही- मी ही टिपू नये
सख्या मिलनाचा ॠतू
अर्ध्यावर संपू नये
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
को-या अंगणात सरी अश्या अश्या
को-या अंगणात सरी
अश्या अश्या कोसळल्या
बांध बांधल्या मनाचा
जागो-जागी ढासळला
थेंब-थेंब झेलावया
रंध्र-रंध्र आसावला
जणु साजणाचा स्पर्श
ओल्या सरीतुन झाला<<<
मस्त आहे
आवडली कविता
आवडलीच
आवडलीच
मनाला स्पर्शून गेली कविता !
मनाला स्पर्शून गेली कविता !
खुप खुप आभार मंडळी.
खुप खुप आभार मंडळी.
सुर्रेख...
सुर्रेख...
सुप्रिया, छाsssन जमून
सुप्रिया, छाsssन जमून आलीये..
शुभेच्छा!!
सुंदर!आवडली.
सुंदर!आवडली.
भारीच गं सुप्रियातै
भारीच गं सुप्रियातै
सुप्रिया..सुप्पर्ब गं!!!
सुप्रिया..सुप्पर्ब गं!!! नि:शब्द करतेस तू नेहमी.. नेमके शब्दच सुचत नाही तुझ्या उत्कृष्ट कवितेला साजेसे..
असंच गोड मानून घे
पुरंदरे
पुरंदरे शशांक,
बागेश्री,
विभाग्रजजी,
मयुरी
वर्षू नील....:-)
धन्स !
सुंदर...
सुंदर...
व्वा!! मस्तच!
व्वा!! मस्तच!
सेना, के अंजली
सेना, के अंजली
मस्तं...
मस्तं...
मस्तचं.. !!
मस्तचं.. !!
छान जमलेय कविता. "थेंब-थेंब
छान जमलेय कविता.
"थेंब-थेंब झेलावया
रंध्र-रंध्र आसावला
जणु साजणाचा स्पर्श
ओल्या सरीतुन झाला" >>> हे अधिक आवडलं.
खूप छान! शब्दांच्या
खूप छान! शब्दांच्या रिपीटीशनमुळे एक वेगळीच लय मिळालीये आणि पावसासाठीची ओढ जशीच्या तशी व्यक्त झालीये. मस्त!
आवडली. इंदिरा संतांच्या
आवडली.
इंदिरा संतांच्या कवितेची आठवण झाली.
'नको नको रे पावसा'
छान अमेलिया +१
छान
अमेलिया +१
को-या अंगणात सरी अश्या अश्या
को-या अंगणात सरी
अश्या अश्या कोसळल्या
बांध बांधल्या मनाचा
जागो-जागी ढासळला
थेंब-थेंब झेलावया
रंध्र-रंध्र आसावला
जणु साजणाचा स्पर्श
ओल्या सरीतुन झाला
तुझ्या विरहात सख्या
खोळंबली रात्र-रात्र
ओली झुळुक वा-याची
सुखावते गात्र-गात्र
क्लास !!
छानच. हळुवारपणाला उदासीची
छानच.
हळुवारपणाला उदासीची किनार असलेली कविता वाटली.
शेवटच कडवं बदलून...धन्स
शेवटच कडवं बदलून...धन्स मंडळी.
मस्तच.....
मस्तच.....
क्लास !
क्लास !
dhanyavaad !
dhanyavaad !
फारच छान.. मस्त लय आहे
फारच छान.. मस्त लय आहे कवितेला
वर्षू नील+१ खरंच निःशब्द करते
वर्षू नील+१
खरंच निःशब्द करते तुमची प्रतिभा दरवेळी!
अभिनंदन...शुभेच्छा!
सुंदरच!
सुंदरच!
पाऊसावर कविता म्हणली म्हणजे
पाऊसावर कविता म्हणली म्हणजे पाऊस कसाही पडो!, कविता मात्र छानच उभारुन येते.त्याच मुख्य कारण म्हणजे त्या पाऊसाने आणलेल्या आठवणीतली "ती" असते.
माझ्या ही मनात पाऊसाच्या काही वेगळ्या आठवणी.......
https://meghvalli.blogspot.com/2024/03/blog-post_14.html?m=1
अजय सरदेसाई (मेघ)