तिनिसांजेला उरात माझ्या एक पोकळी वावरते!

Submitted by सतीश देवपूरकर on 11 September, 2012 - 11:27

गझल
तिनिसांजेला उरात माझ्या एक पोकळी वावरते!
आठवणींची गजबज होते, मन माझे अन् गांगरते!!

ताटावरुनी उठून गेले, पोर कधीचे कामाला.....
अजून नाही पत्ता त्याचा, घर केव्हाचे हंबरते!

हवा मोकळी आहे, झुळझुळ झुळूक वाहे वा-याची;
तुझी गंधवार्ताही नाही, अंतरंग हे गुदमरते!

काय फरक पडतो हत्तीला? खुशाल भुंकू दे कुत्री!
जे जे त्याच्या पायाखाली येते, ते ते चेंगरते!!

तुला कशाला हवे निमंत्रण? दारे उघडी तुजसाठी!
माय, मुलासाठी हृदयाच्या पायघड्याही आंथरते!!

निजलेल्या बाळास कुणाची नजर न लागो म्हणून ती....
माय तिच्या बाळावरती त्या पदर स्वत:चा पांघरते!

म्हणून माझ्या संसाराचा गाडा इथवर आलेला!
किती पसारे करतो मी, पण, पत्नी सारे आवरते!!

मूर्तिमंत सौजन्य जणू तो! स्नेहाचा निर्झर आहे!
शब्दाशब्दामधून त्याच्या प्रेम केवढे पाझरते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणून माझ्या संसाराचा गाडा इथवर आलेला!
किती पसारे करतो मी, पण, पत्नी सारे आवरते!!<<<

प्रोफेसर साहेबांनी स्वानुभव गुंफलेला आहेच वरील गझलेत, या शेराद्वारे

@हितचिंतक,

जोर काढला की होतात, बहुधा..!

अनुभूतीनिष्ठा, (लेखन्)गर्भनिष्ठा ई.* असावं लागतं मात्र.

*ई. मध्ये काय काय येतं, हे जाणायचे असेल(च), तर प्रो. साहेबांचा कुठलाही प्रबन्धरूपी प्रदीर्घ प्रतिसाद वाचावा.

पद्यलेखन शतकी होण्यासाठी ते तसेच सशक्त असावे लागते.
उदा. 'मोकलाया दाही दिशा' हे अन्यत्र प्रसिद्ध झालेले महाकाव्य.
गरजूनी गूगलून पहावे.

इब्लिस आणि साती,

योगासने करण्यासाठी सदतीस आठशे दहाच वापरायला हवा असे काही नाही, फिटनेस इतर कित्येक धाग्यांवर येऊ शकतो, तळवलकरांसारख्या जाहिराती करणे निंदनीय आहे

-'बेफिकीर'!

मनोरंजक चर्चा झाली आहे.

१) 'तिनिसांज' किंवा 'तिनि' असा शब्द मराठी भाषेत आहे.
२) 'तिन्हिसांज' हे एकवचन आहे, तर 'तिन्हीसांज' हा अनेकवचनी शब्द आहे.

पहिले विधान खरे दिसतेय.
मोल्सवर्थ मध्ये मला काही संदर्भ मिळाले:
तिनसांज or तिनिसांज (p. 380) [ tinasāñja or tinisāñja ] f तिनसांजा, तिनिसांजा, तिन्हिसांजा pl The time of evening-twilight, the evening.

दुसरे माहीत नाही. पटत नाहीय.

तिन....मूळ संस्कृत शब्द आहे त्रि, जे विशेषण आहे, ज्याचा अर्थ आहे तीन म्हणजेच ३ ही संख्या.
तिनव्या (विशेषण) म्हणजे तिस-या.
तिनसांज / तिनिसांज (एकवचनी).......म्हणजे संध्याकाळी.
तिनसांजा / तिनिसांजा / तिन्हीसांजा (अनेकवचनी).
तिनसांजा / तिनिसांजा / तिन्हिसांजां (क्रियाविशेषण).....संध्याकाळी.
तिनसान......म्हणजे संध्याकाळ.
फुटक्या तिनिसांजा....म्हणजे ऎन संध्याकाळी.
तिनीत्रिकाळ......म्हणजे तिन्ही वेळा......सकाळी, दुपारी व संध्याकाळी.
तिन्ही लोक .......म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ.
तिनतेरा (विशेषण / क्रियाविशेषण).......म्हणजे उधळलेले, नाश पावलेले इत्यादी.

वर दिलेले सर्व नित्य वापरातील शब्द आहेत. कोणताही शब्द मला वृत्तात बसवता आला असता. ते काही कठीण नव्हते.
तिन्हिसांजेला (एकवचनी) असेही म्हणता आले असते.
तिनिसांजेला असे पण म्हणता येते.
तिन्हीसांजा असा अनेकवचनी शब्दप्रयोग आहे.
एकवचनी....तिनिसांज किंवा तिन्हिसांज.
तिन्हीसांज नव्हे.

वरील एकही शब्द आमच्या मनचा नाही! मुद्रित पुरावा(संदर्भ) देत आहोत.....................

संदर्भः आभिनव मराठी-मराठी शब्दकोश......द.ह.अग्निहोत्री.........खंड३रा, पान क्रमांक ९२ डावीकडील स्तंभातील शेवटचा शब्द
टीप: सदर शब्दकोशाचे एकंदर ५ खंड आहेत, प्रत्येक खंड ५५०-६००पानांचा आहे! एकूण ४८००० मराठी शब्द यात आहेत! अग्निहोत्रींची मराठी शब्दांच्या उच्चार शास्त्रात पिएचडी आहे! ते विदर्भातील आहेत व मराठी भाषातज्ञांत त्यांचे नाव आदराने घेतले जाते! प्रत्येक शब्दाच्या उच्चारावरून मात्रा कशा मोजायच्या हेही त्यांनी दिले आहे, जे गझलकाराला वृत्त, लय सांभाळताना अतिशय उपयुक्त आहे!

***********इति कर्दनकाळ

स्पष्टीकरणासाठी आणि माहितीसाठी धन्यवाद.
असे दिसून येते की आपण दिलेले शब्द एक/अनेकवचनासहित मिसकोट केले गेले आहेत.
आपण तिनसांजा / तिनिसांजा / तिन्हीसांजा (अनेकवचन) असे म्हणताय तर प्रश्न 'तिन्हीसांज' हा अनेकवचनी आहे का असा दिसतोय.

असो, धन्यवाद.

आम्ही दिलेला एकेक शब्द मुद्रीत आहे, त्यामुळे आमच्यापुरता तरी प्रश्न संपलेला आहे!

अफाट मनोरंजन झालं...थोडंफार ज्ञानरंजनही झालं....
त्या जाणव्यांच्या गझलेची मला कोणी लिंक देऊ शकेल का लोक्स?

पोकळी वावरते
पोकळी असते,पोकळी निर्माण होते,परंतु पोकळी कधी वावरत नाही. >>>>>>
गझलेत काव्य असु नये का ? जे न देखे रवी या न्यायाप्रमाणे कवी पोकळीला वावरायला लावू शकतो. कल्पनाचमत्कृती अलंकार वगैरे गझलेला मान्य नाहीत की काय ? त्यात विज्ञान असावं लागतं की काय ?

समजा एखाद्याने रस्त्यास मी विचारले अमूक तमूक, तर तुम्ही रस्त्याला प्रश्न विचारले जात नाहीत असं म्हणणार का ?

कृपया या अशा धाग्यांच्या लिंक्स देऊ नयेत. यात काय आहे आवर्जून वाचण्यासारखं हे कळेल का ?

Pages