आज पुन्हा त्या रामाची गरज आहे

Submitted by prafullashimpi on 13 September, 2012 - 04:14

आजच फेसबुकवर ही कविता वाचण्यात आली, मला माहितीये की ईथे फक्त स्वतःच्याच कविता पोस्ट करायच्या असतात, पण ही कविता खुप छान वाटली म्हणून पोस्ट केलीय.

सोर्सः फेसबुक, कवीचे नाव माहित नाही

तो एक काळ होता,
राम आई साठी वनवासात
गेला होता,
आज पुन्हा त्या रामाची गरज
आहे..... फेसबुक वर मित्रांच्या स्टेटस
वर १०० कमेंट्स
देणाऱ्या आम्हाला
... ...
घरातल्या आईला "कशी आहेस
गं?" हे विचारायला वेळ नाही.
आज पुन्हा त्या रामाची गरज
आहे. मित्र मैत्रिणीचा वाढदिवस
एक एक
महिना आधी लक्षात
ठेवणाऱ्या आम्हाला
आई
वडिलांच्या साध्या जन्मतारखा माहित नाहीत
आज पुन्हा त्या रामाची गरज
आहे. गर्लफ्रेंड बरोबर एक तास एक
मैल फिरणाऱ्या
आम्हाला आईने सांगितल्या वर
हाकेच्या अंतरावरून दळण
आणायला वेळ नाही
आज पुन्हा त्या रामाची गरज आहे. ऑफिसमध्ये
मित्रांच्या डब्यातले
खाऊन "आईला सांग मस्त झालीय
भाजी"
अशी स्तुती करणाऱ्या आम्हाला
घरातल्या आईने केलेल्या पिठल्याची
स्तुती करायला आमच्याकडे वेळ
नाही.
आज पुन्हा त्या रामाची गरज
आहे........ आजारी मैत्रिणीला हजारवेळा
हॉस्पिटल मध्ये
भेटायला जाणाऱ्या
आम्हाला घरातल्या
बाबांना "आता कसे आहेत पाय
तुमचे?" ह्या पाच शब्दांसाठी वेळ
नाही,
आज पुन्हा त्या रामाची गरज
आहे..." "कोणती नाती कशी सांभाळायची हे
तुमच्याच हातात आहे"..♥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

??

??

छ्या ! अहो आताच्या पिढीला आवडेला का तरी अशी कविता? जरा विचार पोस्टा की राव इथे. कलीयूग आलेय आता. ह्या पोरा सोरीना चमेली, कोंबडी अशी ढिंच्याक गाणी आवडतात. वर यांचे आदर्श म्हणजे इम्रान हाश्मी, सल्लु, शेरुक, कर्रीन्ना, कत्तर्रीना. तर ही मंडळी त्यांच्या तालावर नाचणार.

वेल, लिहीणार्‍याने छानच लिहीलीय. मला आवडली. डोळ्यात काजळ घालणारी आहे.

आतिच होतय हे जरा. राम वनवासात गेला ते वडीलांनी दिलेल वचन अबधित रहाव आणि रघु कुलाची परंपरा सम्भाळली जावी म्हणून. आई ची काळजी होती म्हणून नाही.
मन्जे "रामाची गरज आह" वै ठिक आहे पण कारणं अशी ओढुन ताणुन नको आणुयात त्या साठी.